तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव

तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव
तुरीवर पिसारी पतंगाचा प्रादुर्भाव

किडीचे शास्त्रीय नाव ः इक्झेलॅस्टीस ॲटोमोसा १) कळी, फुलोरा आणि शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कळ्या, फुले आणि व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. २) पूर्ण वाढ झालेल्या अळ्या प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरवडून खातात व नंतर शेंगांच्या बाहेर राहून आतील दाणे खातात व शेंगांवर अथवा शेंगावरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात. आर्थिक नुकसानकारक पातळी : - ५ अळ्या प्रती १० झाडे किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा नियंत्रण : प्रतिलिटर पाणी १) पहिली फवारणी ः - फूलकळी येताना अ‍ॅझाडिरेक्टीन ०.०३ टक्के (३०० पीपीएम) ५ मि.लि. २) दुसरी फवारणी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना ः - एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मि.लि. किंवा - बॅसीलस थुरीनजेंसीस २ ग्रॅम ३) तिसरी फवारणी ः - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी - इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मि.लि. किंवा - इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा - क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल ०.३ मि.लि. संपर्क : चांगदेव वायळ,९९७५५४१९६७ (कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com