कुक्कुटपालन सल्ला

कुक्कुटपालन सल्ला
कुक्कुटपालन सल्ला

हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक तापमानाची गरज असते. कोंबडी जेव्हा अंडी उबवते, त्या वेळी तापमानाची सरासरी ही ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असते. अंडी फुटल्यानंतर पिलू ज्या वेळी बाहेर येते ती वेळ आणि त्यानंतरच्या काही तासांपर्यंत पिलांना ३४ अंश सेल्सियस तापमान लागते.

  • पिल्लांचे वय एक एक आठवड्याने वाढते, त्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यात लागणाऱ्या सुयोग्य तापमानाची पातळी दोन  अंश सेल्सियसने कमी होते. पिलांच्या शरीराचे तापमान १३ अंश सेल्सियस पेक्ष्या कमी असते. या शास्त्रीय कारणामुळे शेडमध्ये पिले असताना अधिक प्रमाणात विद्युत दिवे लावून उष्णता निर्माण केली जाते.
  • वातावरणातील तापमान जेव्हा १८ ते २४ अंश सेल्सिअस असते तेव्हा कोंबड्या उत्साही असतात. त्यांच्या शरीरातील क्रिया सामान्यपणे चालू असतात. कोंबड्यावर या तापमानाचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. कोंबड्याची योग्य वाढ होते. कोंबड्या निरोगी राहतात. खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते आणि मरतुकीचे प्रमाण कमी होते, परंतु वातावरणातील तापमान १ अंश सेल्सियस ने वाढते तेव्हा प्रत्येक अंश सेल्सिअस तापमानाला १.५ टक्के खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
  • जशी जशी पिलांची वाढ होते तशी दिव्यांची संख्यादेखील कमी केली जाते. जर वातावरणात जास्त प्रमाणात थंडी असेल तर हिटिंग कॉइल वापरले जाते, यातून सूक्ष्म वातावरणीय बदल कृत्रीमरित्या घडवून आणतात. त्यासाठी शेडचा दरवाजा छोटा आकाराचा ठेवणे तसेच शेडच्या खिडक्यांना गोणपाटाने झाकणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात.
  • हिवाळ्यात शेडमधील वातावरण सुयोग्य ठेवण्यासाठी सापेक्ष आर्द्रतेचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे, कारण इतर पक्षांपेक्षा कुक्कुटपालनासं कोरडे हवामान चांगले मानवते यामुळे शेडमधील सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के असावी. कोंबड्यामध्ये वातावरणाशी जुळवून घेण्याची, प्रादेशिक हवामानाशी समरूप होण्याची क्षमता जास्त असते.
  • काही जाती या बदलत्या हवामानाला अधिक प्रमाणात जुळवून घेणाऱ्या असतात तर काही जाती अल्प प्रमाणात स्थानिक वातावरणाशी एकरूप होतात.
  • कोंबड्यांतील आजार
  • मांस, अंड्याचे उत्पादन दर्जेदार व चांगल्या प्रतीचे होण्यासाठी कोंबड्यांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारचे होणे गरजेचे आहे.
  • फाउल कॉलरा
  • उष्ण प्रदेशातील कोंबड्यांना फाउल कॉलरा जास्त प्रमाणात होतो. या रोगाचे जीवाणू १६.६ अंश सेल्सिअस तापमानात सलग दोन वर्षे जगतात. या रोगाची लागण झाल्यामुळे ६० टक्क्यांपर्यंत मारतुकीचे प्रमाण वाढते. या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो.  कोंदट ठिकाणी या रोगाची लागण जास्त प्रमाणात होते.
  • कॉक्सिडीओसीस
  • हा रोग प्रामुख्याने लिटरमधील ओलसरपणा वाढल्यामुळे होतो. त्यामुळे वेळच्या वेळी गादी हालवणे किंवा बदलवणे गरजेचे असते.
  • कोंबड्यांवर वाढत्या तापमानाचा होणारा परिणाम

  • श्वसन क्रियेचा वेग वाढतो. कोंबड्या शेडमध्ये थंड बाजूने जास्त बसलेल्या दिसतात.
  • आतड्याचा दाह, रक्ती हगवण, शरीर पोकळीत पाणी साठणे, गाऊट यासारख्या आजाराचे प्रमाण वाढते.
  • कोंबड्यावर ताण आल्यामुळे ज्या ठिकाणी लिटर जास्त असते त्या ठिकाणी त्या आडव्या पडतात.
  • पाणी पिण्याचे प्रमाण १ ते ३ पटीने वाढते.
  • उपाययोजना

  • कोंबड्यांना नियमित थंड पाणी द्यावे. पाण्यामध्ये प्रती लिटर ५ ग्रॅम या प्रमाणात गूळ मिसळावा. यामुळे थकवा जाणवणार नाही आणि कोंबड्या जास्त प्रमाणात पाणी पितात.
  • खाद्याची भांडी १० टक्के प्रमाणात वाढवावीत, त्यामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.  
  • कोंबड्याना सकाळी ९ वाजेपर्यंत व दुपारी चारच्या नंतर खाद्य मुबलक प्रमाणात द्यावे, त्यामुळे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून मरतुक टाळता येते.
  • अल्फाटॉक्झीन बुरशीमुक्त खाद्य द्यावे.
  • ३ ते ३.५ टक्के कॅल्शियमचा खाद्यातून पुरवठा करावा.
  • खाद्यातील पोषणतत्त्वाची घनता वाढवावी. जेणेकरून कमी खाद्य खाल्ले तरी कोंबड्यांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण करता येईल.
  • दुपारच्या वेळी खाद्यावर थोडे थोडे पाणी शिंपडावे, जेणेकरून कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढेल.
  • मेल : डॉ. कल्याणी सरप, ishasarap@gmail.com (विषयतज्‍ज्ञ (पशुसंवर्धन), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com