agricultural stories in marathi, AGROWON, probiotics for fodder | Agrowon

चाऱ्याची पचनियता, पाैष्टिकता वाढविण्यासाठी प्रोबायोटिक्स
डॉ. पवनकुमार देवकते, डॉ. प्रफुल्लकुमार पाटील
बुधवार, 30 मे 2018

उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जवळपास सर्वत्र पौष्टिकता कमी असलेला निकृष्ट दर्जाचा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांची शारीरिक वाढ कमी होते, दूध उत्पादन घटते, विविध प्रकारचे कमतरतेचे आजार उद्‌भवतात. हे होऊ नये म्हणून खाद्यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास निकृष्ट चाऱ्याची पचनियता वाढून पोषणतत्त्वांची उपलब्धता वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जवळपास सर्वत्र पौष्टिकता कमी असलेला निकृष्ट दर्जाचा चारा दिला जातो. त्यामुळे जनावरांची शारीरिक वाढ कमी होते, दूध उत्पादन घटते, विविध प्रकारचे कमतरतेचे आजार उद्‌भवतात. हे होऊ नये म्हणून खाद्यामध्ये प्रोबायोटिक्सचा वापर केल्यास निकृष्ट चाऱ्याची पचनियता वाढून पोषणतत्त्वांची उपलब्धता वाढण्यास मदत होते.

प्रोबायोटिक्स ः
प्रोबायोटिक्स शरीराला घातक नसणाऱ्या सूक्ष्मजिवांपासून बनवले जाते. त्यामुळे कोठीपोटामध्ये पचनक्रियेसाठी लागणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजिवांची संख्या वाढते व शरीराचे कार्य वाढते. प्रोबायोटिक हे चुर्ण किंवा द्रवरूप स्वरूपात जनावरांना पशुखाद्यामध्ये मिसळून द्यावे लागते.
निकृष्ट चाऱ्याची पाैष्टीकता वाढविण्यासाठी चव वाढवणारे घटक जसे गूळ, मीठ, मळी अाणि पचनियता वाढवणारे घटक जसे प्रोबायोटिक, प्रीबायोटिक इ. घटक वापरले जातात. यापैकी प्रोबायोटिक्स हे उपयुक्त सूक्ष्मजिवांपासून बनलेले असते. प्रोबायोटिक्स जनावरांच्या पोटामध्ये पचनासाठी आवश्‍यक वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजिवांची संख्या वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते.

प्रोबायोटिक्समधील जनावरांना पचनक्रियेसाठी उपयुक्त असलेले सुक्ष्मजिव
लॅक्‍टोबॅसीलस, अॅस्परजिलस, स्ट्रेप्टोकोकस, सॅकरोमायसीस इ. प्रकारचे सूक्ष्मजीव प्रोबायोटिकमध्ये उपलब्ध असतात. हे सूक्ष्मजीव जनावरांच्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. लॅक्‍टोबॅसीलस हे लॅक्‍टीक आम्ल तयार करण्यास मदत करते तसेच अमायलेज विकर जे कर्बोदकांच्या पचनासाठी आवश्‍यक असते ते तयार होण्यासाठी लॅक्‍टोबॅसीलस मदत करतात. अॅस्परजिलस सूक्ष्मजिव हे सेल्युलोज विकर तयार करतात. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यामधील सेल्युलोज हा कठीण घटक पचण्यास मदत होते.

गुणधर्म

 • पोटामध्ये जास्त वेळ जिवंत राहून पचन नलिकेत कार्यशील राहते
 • प्रोबायोटिक्‍समधील सूक्ष्मजीव हे विषारी नसतात.
 • प्रोबायोटिक्‍समधील उपयुक्त जिवाणू पोटामध्ये लगेच चिकटून जास्त गतीने कार्य करतात.
 • प्रोबायोटिक्‍समधील सूक्ष्मजीव हे खूप दिवस सजीव म्हणून टिकून राहू शकतात.

फायदे

 • खाद्य व चाऱ्याची प्रत सुधारते तसेच खाद्यास रूचकर बनवते.
 • जनावरांची उत्पादकता वाढवण्यास तसेच जनावरांचे वजन वाढवण्यास मदत करते, शरीरावरील ताण कमी करते.
 • दुधाचे प्रमाण, मासांचे प्रमाण (शेळी, मेंढीमध्ये) इ. वाढण्यास मदत करते.
 • कमी किमतीमध्ये पोषक प्रथिनांचा पुरवठा होतो, त्यामुळे पशुपालकांचा उत्पादन खर्च कमी होतो.
 • प्रोबायोटिक्‍सचा उन्हाळ्यामध्ये पशू आहारात वापर केल्यास जनावरांच्या शरीरावरील ताण कमी होऊन निकृष्ट चाऱ्यामधून पोषक घटकांची उपलब्धता वाढण्यास मदत होते.
 • कोटीपोटामध्ये पचनक्रिया जलद करण्यासाठी लागणारे सूक्ष्मजीव हे प्रोबायोटिक्‍सपासून मिळतात व जनावरांची पचनक्रिया वाढून दूध उत्पादन वाढते.
 • जनावरे चारा आवडीने खातात. त्यामुळे चारा वाया न जाता चाऱ्याची पचनियताही वाढते.

प्रोबायोटिक्‍सचा वापर पशुआहारात कधी करावा

 • जनावरांची पचनक्षमता कमी असल्यास.
 • पोटाचे आजार उद्‌भवल्यास. पोटाची शस्रक्रिया केल्यास.
 • जनावरांच्या आहारात कमी प्रतीच्या चाऱ्याचा वापर असल्यास.
 • जनावरांवर शारीरिक ताण असल्यास.
 • उन्हाळ्यामध्ये आणि उष्ण तापमानात.
 • केवळ चारा जास्त प्रमाणात असेल तर, किंवा जनावरांना पुरेशा प्रमाणात पशुखाद्य, खुराक, चंदी मिळतनसेल तर.
 • वासरांची वाढ कमी असेल तर.
 • रवंथ प्रक्रिया बंद असल्यास, पशू आहारात प्रोबोयोटिक्‍सचा वापर करावा. यामुळे निश्‍चितच पचनियता वाढून उत्पादकता वाढण्यास मदत होते.

संपर्क : डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४
(पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...