agricultural stories in marathi, AGROWON, problems of drifing in cattles | Agrowon

बैलामधील खांदेसुजीची कारणे, लक्षणे अोळखून उपचार करा
डॉ. गिरीश यादव, डॉ. दिनेश लोखंडे
मंगळवार, 29 मे 2018

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला नांगरणी, कुळवणी अशी मशागतीची बरीच कामे बैलाकडून केली जातात. त्यामुळे बैलांमध्ये खांदेसूज अाढळून येते. खांदेसुजीवर वेळीच पशुवैद्यकाकडून उपचार करून बैलांना सतत कामाचा ताण देऊ नये.

उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरवातीला शेतीतील कामासाठी बैलाचा वापर केला जातो. शेतकामासाठी जनावरे वापरल्यामुळे ते यंत्राला पर्याय ठरतात. परंतु कामाच्या अती ताणामुळे बैलांमध्ये खांदेसूज अाढळून येते.

 खांदेसुजीची कारणे

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला नांगरणी, कुळवणी अशी मशागतीची बरीच कामे बैलाकडून केली जातात. त्यामुळे बैलांमध्ये खांदेसूज अाढळून येते. खांदेसुजीवर वेळीच पशुवैद्यकाकडून उपचार करून बैलांना सतत कामाचा ताण देऊ नये.

उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरवातीला शेतीतील कामासाठी बैलाचा वापर केला जातो. शेतकामासाठी जनावरे वापरल्यामुळे ते यंत्राला पर्याय ठरतात. परंतु कामाच्या अती ताणामुळे बैलांमध्ये खांदेसूज अाढळून येते.

 खांदेसुजीची कारणे

 • मानेवरील जू मानेस सतत घासन्यामुळे बैलाचे खांदे सुजतात.
 • शेतकाम करताना मानेची कातडी जू व जुला असणारी खीळ यामध्ये चेंगरते व खांदेसूज होते.
 • काही वेळा जुचा मानेवर टेकणारा पृष्ठभाग हा अत्यंत खडबडीत असतो.
 • काहीवेळा बैलजोडी कमीजास्त उंचीची असल्यामुळे जनावरांच्या मानेवर ठेवले जाणारे जू हे समांतर राहात नाहीत परिणामी जू तिरकस ओढले जातात. त्यामुळे दोन्ही बैलांचे खांदे सुजतात.   
 • तरुण वयातील जनावरांना व सतत कामाचा ताण असणाऱ्या जनावरांना खांदेसूज जास्त होते.
 • जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेत कामास जुंपल्याने.
 • बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लावल्याने.कच्च्या व खराब रस्त्स्यावर जास्त वजन असणारी बैलगाडी ओढायला लावल्यास

लक्षणे

 • खांद्यावरील भागावर सूज येते. खांद्याची कातडी व त्याखालील त्वचेच्या भागावर सूज येते.
 • जू ओढताना खांद्याची कातडी ही मागच्या बाजूस जोराने ओढली गेल्यामुळे कातडीखालील पडदा वेगळा होऊन त्वचेखाली रक्त साचते.
 • खांद्यावरील सूज गरम व अत्यंत वेदनादायी असते.
 • सुजेचा आकार हा लिंबा एवढा ते फुटबाॅल एवढा असतो.
 • ही सूज मऊ, पाणी असणारी ते कडक लागणारी असू शकते.
 • सुजलेला भाग फुटून पाणी येऊ शकते .
 • खांद्यावर अशी सूज आल्यामुळे जनावर काम करू शकत नाहीत व त्यामुळे शेतकामाचा खोळंबा होतो. बहुधा खांदेसूज झालेले जनावर विनाउपचार कामास जुंपल्यास कातडीवर लहान जखम होऊन गळूब / बेंड येतात.
 • खांद्यावर मोठी जखम झाल्यास त्यात रोगजंतूचा शिरकाव होऊन असाडी पडते. अनेकदा प्रथम खांद्यावर लहान आकाराच्या गाठी येतात व त्या वाढून खांद्याचा कर्करोगसुद्धा होतो.
 • मानेवर कातडी गुंडाळली जाते किंवा सुरकुत्या पडतात.
 • जनावरास कामास जुंपल्यास प्रचंड वेदना होतात.

उपचार

 • अशा प्रकारची लक्षणे आपल्या जनावरात दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकाकडून खालीलप्रमाणे उपचार करावा.
 • नुकत्याच झालेल्या खांदेसुजीत सुजलेल्या भागावर ४ ते ५ दिवस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खांदेसूज कमी करणारा मलम लावावा.
 • पहिल्यांदाच सूज अाली असेल तर बर्फाने ३ - ४ दिवस शेकावे.
 • मॅग्नेशियम सल्फेट ग्लिसरीन मध्ये मिसळून खांद्यावर लावल्याससुद्धा नुकतीच आलेली सूज कमी होते.
 • जुन्या सुजेत गरम वाळू कपड्यात गुंडाळून खांद्यास ४ - ५ दिवस शेक द्यावा, गरम पाण्यानेसुद्धा शेक दिला तरी चालतो.
 • शेक देताना जनावरास भाजणार / पोळणार नाही याची खात्री करून घ्यावी अन्यथा त्वचा भाजण्याची शक्यता असते. गरम पाणी किंवा भुसा याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानाच्या पेक्षा थोडे जास्त असावे. यासाठी गरम पाणी, वाळू किंवा भूशास प्रथम आपण स्पर्श करून पाहावे म्हणजे त्याचे तापमान कमी आहे याची खात्री होईल.
 • खांद्यावर आलेल्या गाठी या मऊ पू असणाऱ्या असतील तर पशुवैद्यकाकडून छोटी शस्त्रक्रिया करून घेऊन त्यातील पू काढून टाकावा व त्याचे रोज ड्रेसिंग करावे.  उपचार चालू असताना जनावरास अजिबात कामास जुंपू नये व पूर्ण पणे आराम द्यावा. औषधोपचाराने जर खांद्यावरील गाठी कमी होत नसतील तर खांद्यावर पशुवैद्यकाकडून छोटीशी शस्त्रक्रिया करून त्या काढून टाकाव्यात व त्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याप्रमाणे योग्य औषधोपचार व काळजी घ्यावी.

खांदेसूज कशी टाळता येईल

 • खडबडीत पृष्ठभाग असणारे जू बदलावेत.
 • समान उंचीची बैलजोडी कामास जुंपावी. दोन्ही बैलांच्या खांद्यावर पडणारे वजन हे समान असावे. बैलांना भरपूर काम न देता थोड्या थोड्या विश्रांतीने काम द्यावे. जनावरांना सतत कामाचा ताण देऊ नये.
 • जनावरांना अचानक जास्त प्रमाणात शेत कामास जुंपू नये.
 • बैलगाडीत जास्त वजन भरून ओढायला लाऊ नये.  कच्च्या व खराब रस्त्यावर जास्त वजन असणारी गाडी ओढायला लावू नये.

 संपर्क : डॉ. गिरीश यादव, ७६६६८०८०६६
(मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, परळ, मुंबई)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...