agricultural stories in marathi, AGROWON, PRUNINIG IN DRUMSTICK | Agrowon

तंत्र शेवगा पिकातील छाटणीचे...
अंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

लागवडीनंतर योग्य छाटणी तंत्रज्ञानाकडे लक्ष दिल्यास शेवग्यापासून उत्तम उत्पादन मिळवता येते. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे.

पूर्वी राज्यामध्ये शेताचा बांध किंवा परसदारापुरती असलेली शेवगा लागवड आता शेतामध्ये होऊ लागली आहे. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांत शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या क्षेत्रावर होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, मिरज जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर शेवगा लागवड वाढली आहे.

छाटणीचे प्रकार ः  

लागवडीनंतर योग्य छाटणी तंत्रज्ञानाकडे लक्ष दिल्यास शेवग्यापासून उत्तम उत्पादन मिळवता येते. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या पिकामध्ये आहे.

पूर्वी राज्यामध्ये शेताचा बांध किंवा परसदारापुरती असलेली शेवगा लागवड आता शेतामध्ये होऊ लागली आहे. तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांत शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या क्षेत्रावर होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, मिरज जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर शेवगा लागवड वाढली आहे.

छाटणीचे प्रकार ः  

  •  जमिनीलगत खरड छाटणी
  •  जमिनीपासून अडीच ते तीन फुटांवर छाटणी
  •  झाडांच्या शेंड्याकडील ३० टक्के कात्रीने अथवा कोयत्याने फांद्या कापणे.

छाटणी तंत्रज्ञान

  • शेवग्याचे रोप लावल्यानंतर चांगले व्यवस्थापन असल्यास २ ते ३ महिन्यांत ३ ते ४ फुटांपर्यंत उंची वाढते.
  •  शेवग्याचे रोप २.५ ते ३ फूट वाढल्यानंतर त्याचा शेंडा छाटावा. रोपाचा शेंडा छाटल्याने त्याला फांद्या फुटतात. अन्यथा ते सरळ उंच वाढते. सर्वसाधारपणे प्रत्येक खोडावर ४ ते ५ फांद्या ठेवाव्यात.
  •  खोडावर ठेवलेल्या ४ ते ५ फांद्या वाढल्यानंतर १.५ ते २ फुटांवर परत शेंडा खोडावा. म्हणजे झाडाला आकार मिळतो. झाड कमी उंचीचे आणि डेरेदार करून घ्यावे.
  •  शेवग्याची लागवड केल्यानंतर सहा महिन्यांनंतर फुले येण्यास सुरवात होते. झाड लहान असून, शाखीय वाढीचे प्रमाण अधिक असल्याने सुरवातीची फुले गळतात. क्वचित एखाद्या फुलाचे रुपांतर शेंगांत होते. अर्थात नंतरच्या फुलाचे रुपांतर शेंगांमध्ये होते. फुलाचे रुपांतर शेंगांमध्ये होताना त्यांचा आकार लहान असल्याचे लक्षात येत नाही. बारकाईने बघितल्यास लहान तलवारीच्या आकाराच्या शेंगा फांदीवर दिसतात. विशेषत: फूलधारणा होत असताना फांदीवर प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छ येतो आणि त्यापासून फळधारणा होते. फुलापासून शेंगा होण्याचे प्रमाण ३ ते ५ टक्के असते. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन असल्यास सहा महिन्यांनी शेवग्याला फुले येऊन एक वर्षाच्या आत पहिले उत्पादन मिळते.
  •  जून– जुलैमध्ये लागवड केलेल्या झाडाचा पहिला बहार मार्च-एप्रिल या महिन्यात संपतो. त्यानंतर झाडाची छाटणी केली पाहिजे. छाटणी लवकर किंवा उशिरा करून बाजारपेठेच्या मागणीनुसार शेंगांचे उत्पादन घेता येते. वर्षातून एकदाच छाटणी करावी. गरजेनुसार फांदीचा शेंडा काढून उंची नियंत्रणात ठेवावी. छाटणी केल्यानंतर खोडावर बोर्डो पेस्ट (मोरचूद + चुना मिश्रण) लावावे. त्यामुळे खोड कुजणार नाही. लवकर फुटवे येण्यास मदत होते.

 ः अंबादास मेहेत्रे, ९५४५३२३९०६
 ः डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११

(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...