agricultural stories in Marathi, agrowon, psb use in grapes | Agrowon

स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर
अर्चना ढोले, हर्षा शेलट, डॉ. एस. डी. रामटेके
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे.

फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे.

पिकांच्या योग्य पोषणासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांपैकी स्फुरद हा आवश्‍यक घटक आहे. पिकांमध्ये प्रथिने, जनुके आणि ऊर्जानिर्मितीसाठी स्फुरद हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु, जमिनीत स्फुरद हे विरघळण्यासाठी अतिशय कठीण असते. कारण ते विविध कॅल्शियम, सोडियम बरोबरीने जोडले जाते. त्यामुळे त्याचे अनुपलब्ध स्वरूपात रूपांतरण होते. त्यामुळे शिफारशीनुसार, दिलेल्या स्फुरदयुक्त खतांचा उपयोग पूर्णपणे होऊ शकत नाही. यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर फायदेशीर ठरतो.

 • हे जिवाणू स्फुरद पिकांना उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविण्यासाठी जिवाणू विविध प्रकारचे आम्ल तयार करतात. यामध्ये प्रामुख्याने असेटिक ॲसिड, प्रोपायनीक ॲसिड, ब्युटॅरिक ॲसिड, इन्डॉल ॲसेटिक ॲसिड, जिब्रेलिक ॲसिड यांचा समावेश असतो. हे घटक स्फुरद विरघळविण्याबरोबरच संप्रेरकांचेही काम करतात. संप्रेरके पिकांची वाढ, फुलधरणा व फळधारणा वाढवण्याचे काम करतात.
 • फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. या पिकांसाठी रासायनिक खतांच्या बरोबरीने जिवाणू खतांचा योग्य वापर फायदेशीर ठरतो. स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक हे पावडर व विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे.

जिवाणू संवर्धकाचा वापर ः

 • पावडर ः बीजप्रक्रियेसाठी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवावे. सुकल्यानंतर पेरणी करावी.
 • विद्राव्य ः ३ ते ५ मि.लि. प्रतिकिलो बियाणे. याचा वापर बीजप्रक्रिया, रोपप्रक्रिया आणि ठिबक सिंचनामध्ये करता येतो.
 • रोपप्रक्रियेसाठी ३ ते ५ मि.लि. जिवाणू संवर्धक प्रतिलिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात कांदा, मिरची, टोमॅटो रोपे १५ मिनिटे बुडवून ठेवावीत. त्या नंतर लागवड करावी. रोपप्रक्रिया केल्यामुळे रोपे लवकर जमिनीत रूजतात. त्यांची चांगली वाढ होते.
 • ठिबकसाठी एक लिटर विद्राव्य स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक प्रती २०० लिटर पाण्यात मिसळावे. ठिबक सिंचनाद्वारे पिकांना द्यावे.

फायदे ः

 • स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्यामुळे प्रतिहेक्‍टर ३० ते ५० किलो स्फुरद पिकांना उपलब्ध होते.
 • फळभाज्या, पालेभाज्यांची वाढ होते. फळधरणा वाढते.
 • उत्पादनामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते.
 • स्फुरदाबरोबर विविध संप्रेरके उपलब्ध झाल्यामुळे मिरची, कांदा, टोमॅटो, वांगी फळांची गुणवत्ता वाढते.
 • स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक वापरल्याने शिफारशीप्रमाणे अगोदरच्या पिकाला वापरलेले स्फुरद नंतरच्या पिकाला उपलब्ध होते. जमिनीचे प्रदूषण कमी होते. जमिनीची सुपीकता टिकून रहाते.

संपर्क ः अर्चना ढोले, ७७७८०१३७४१
(आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात)

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...