जागेवरच कुजवा सेंद्रिय घटक

जागेवरच कुजवा सेंद्रिय घटक
जागेवरच कुजवा सेंद्रिय घटक

मी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळात पिकांचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र १९९० च्या दरम्यान पीक उत्पादन पातळी घसरू लागली. सर्व प्रयत्न करूनही उत्पादन योग्य पातळीवर मिळेना. जमीन परत पूर्वपदावर येण्यासाठी नेमके काय केले पाहिजे? या प्रश्‍नाचे उत्तरासाठी भू-सूक्ष्मजीवशास्त्र या शाखेचा अभ्यास सुरू केला. या जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी घसरली आहे, ती वाढविणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीबाहेर न कुजविता जमिनीमध्येच सतत कुजविले पाहिजेत, हे शिकलो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी उसाचे पाचट जागेलाच कुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. पंधरा वर्षातील प्रयोगातून ऊस उत्पादतेमध्ये मला अपेक्षित वाढ मिळाली नाही. नंतर खोडकी कुजवून त्याचे खत करण्याविषयी चिंतन सुरू केले. खोडवे कुजवण्यासाठी जागेवरच तणनाशकाने मारून टाकून शून्य मशागतीवर भात लागवड करणे गरज लक्षात आली. याप्रमाणे जुन्या सरी वरंब्यावरच भाताचे पीक घेतले. या प्रयोगातून भात उत्तम पिकले. आता परत उसाची लावण करण्यासाठी जुन्या सरी वरंब्यावर लागवड केली. त्यासाठी सरीच्या तळात एक नांगरांचे तास मारून फक्त कांडी पुरण्यापुरती मशागत केली. ऊस उगवून चांगला वाढला. या प्रयोगातून उसाचे एकरी ६० टन उत्पादन मिळाले.   सर्वात हलके खत पानांचे. तर मुळाचे खत उत्तम दर्जाचे, हा नवीन नियम लक्षात आला. हाच नियम रानातील तणांना लावला. प्रयोगादाखल मुख्य पिकाला त्रास होणार नाही असा पद्धतीने पिकाच्या दोन ओळीमध्ये तण वाढविल. जूने झाल्यावर तणनाशकाने मारून कुजवले. मुख्य पिकाच्या जमिनीखालील अवशेषाला तणांच्या अवशेषांची जोड मिळाली. जमीन पन्नास वर्षापूर्वीप्रमाणे उत्पादनक्षम झाली. चार बांधांच्या आत फुकट मिळणाऱ्या सेंद्रिय पदार्थातून जमीन फुकटात सुपीक करण्याचे तंत्र विकसित झाले. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विविध पिकांमध्ये या तंत्राचा अवलंब केला जात आहे. या तंत्राने सेंद्रिय कर्बाव्यतिरिक्त सुपिकतेच्या संदर्भातील सर्व गुणधर्मात सुधारणा होत राहाते. प्रतिवर्षी सुपीकता वाढवणारे हे तंत्र आहे. संपर्क  ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com