पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे.
सेंद्रिय शेती
यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती आहे. ते १९९४ पासून सेंद्रिय शेती करतात. जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले की, रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.
भाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत, गोमूत्र व बायोमासचा वापर करतात. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा, बाजरी, बरबटी या पिकांची लागवड करतो.
यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती आहे. ते १९९४ पासून सेंद्रिय शेती करतात. जमिनीच्या व्यवस्थापनाबाबत ते म्हणाले की, रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.
भाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत, गोमूत्र व बायोमासचा वापर करतात. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून धैंचा, बाजरी, बरबटी या पिकांची लागवड करतो.
तीन वर्षांतून एकदा ५ ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळतो. त्याचबरोबरीने दरवर्षी एक ट्रॉली ‘अलौकिक’ खत (एक ट्रॉली शेणखत, तीन क्विंटल तळ्यातील गाळ, ३० किलो तुरीची चुरी, २ किलो भुईमूग तेल, पाच किलो गूळ याचा वापर करून तयार केलेले खत) आणि ३०० लिटर गोसंजीवक (३० किलो गाईचे ताजे शेण, ३ लिटर गोमूत्र, एक किलो गूळ यांचे मिश्रण) याचा जमिनीत वापर केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. लागवड प्रामुख्याने सरी वरंब्यावर केली जाते. प्रत्येकी आठ फुटांवर वरंबा बंद केला जातो, त्यामुळे वाफ्यात पाणी साचते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ इंची डवऱ्याला दोर बांधून सऱ्या पाडल्या जातात. या पद्धतीने ओलावा कायम राहतो. या सर्व प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरून २.१ वर पोचला आहे.
रासायनिक घटकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. अशा पोषक घटकांची उपलब्धताच कमी असलेल्या जमिनीतून उत्पादित झालेले अन्नधान्य आपल्या आरोग्यासाठी पोषक कसे असणार, असा रास्त सवाल सुभाष शर्मा उपस्थित करतात.
जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी अनुभवजन्य सूत्रे ः
- रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये सेंद्रिय शेती पद्धतीत सुपीकता जपण्यासोबतच पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे.
- एकरी किमान एक जनावर असावे. त्यांच्याकडे २० एकर शेतीसाठी २० जनावरे आहे. या जनावरांचे शेण, गोमूत्र यांचा वापर सातत्याने केला जातो.
- शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड ः पक्षी कीड नियंत्रण प्रभावीपणे करतात. कृत्रिम पक्षी थांबे उभारण्याऐवजी शेताच्या बांधावर स्थानिक वृक्षांची लागवड उत्पन्नासाठी फायदेशीर ठरते. उदा. करवंद, आवळा, शेवगा व निंब. शर्मा यांच्या शेतात लिंब, फणस व आंबा झाडे लावली.
हिरवळीचे खत ः
- सुभाष शर्मा हे साठिया मका, इंदोरी धने, काळीभेर कोहळे अशा देशी बियाण्यांचे संगोपन करतात.
- भाजीपाला व सोयाबीनसह पारंपरिक पिके घेताना रासायनिक खत व कीडनाशकांचा अजिबात वापर करत नाहीत. जमिनीच्या सुपीकतेसाठी शेणखत व बायोमासचा वापर करतात. सोयाबीनचे एकरी दहा ते बारा क्विंटल, हरभरा दहा ते बारा क्विंटल उत्पादन मिळते.
- हिरवळीच्या खत पिकांच्या लागवडीसाठी तुरीच्या दोन तासांत चार फूट, त्यानंतरच्या दोन तासात आठ फूट ठेवले जाते. या भागामध्ये भेंडी, चवळी, तीळ, मका अशी कमी कालावधीची पिके घेतात. जमिनीच्या सुपीकतेबरोबरच तुरीसह अन्य पिकांचे उत्पन्न मिळते.
- जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी सहा किलो बोरू किंवा धैंचा, चार किलो बाजरी, सहा किलो बरबटी याप्रमाणे १६ किलो धान्याची लागवड करतात.
- तुरीनंतर मूगाचे उत्पादन घेतात. मुगाच्या शेंगा तोडल्यानंतर संपूर्ण झाडे रोटाव्हेटरने जमिनीत गाडली जातात.
- या प्रयत्नातून गेल्या चार वर्षांत मातीचा सेंद्रिय कर्ब ०.४ वरुन २.१ वर पोचला आहे.
- सेंद्रिय खतांची निर्मिती व वापर ः
- तीन वर्षांतून एकदा ५ ट्रॉली शेणखत, दरवर्षी एक ट्रॉली ‘अलौकिक’ खत, दरवर्षी ३०० लिटर गोसंजीवक याप्रमाणे दिले जाते.
- अलौकीक खत ः एक ट्रॉली शेणखत, तीन क्विंटल तळ्यातील गाळ, ३० किलो तूरीची चुरी, २ किलो भुईमूग तेल, पाच किलो गुळ याचा वापर करुन हे तयार होते.
- गोसंजीवक खत ः ३० किलो गोवंशाचे ताजे शेण, ३ लिटर गोमूत्र तसेच एक किलो गूळ याप्रमाणे तयार होते.
ग्रीड लॉकिंग ः लागवड ही प्रामुख्याने सरी वरंब्यावर करतात. त्यातही प्रत्येकी आठ फुटांवर हा वरंबा लॉक केला जातो, त्यामुळे वाफ्यात पाणी साचते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात १४ इंची डवऱ्याला दोर बांधून सऱ्या पाडल्या जातात. त्यानंतर दुसऱ्यांदा फेर देत ग्रीड लॉकिंग होते. ओलावा कायम राहतो.
संपर्क ः सुभाष शर्मा, ९४२२८६९६२०.
- 1 of 3
- ››