agricultural stories in Marathi, agrowon, soyabean pest management | Agrowon

सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व अॅंथ्रक्नोज रोगांचे नियंत्रण
डॉ.व्ही.एम.घोळवे, डॉ. आर. एस. जाधव
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व काही ठिकाणी शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास २१ दिवसांचा पडलेला खंड व त्यानंतर पुढील १० दिवसांत अंदाजे २५० मिमी झालेल्या जोरदार पावसामुळे अनुक्रमे जास्त उष्णता व जास्त आर्द्रता निर्माण झाली. मराठवाडा विभागात डॉ. आर. एस. जाधव, डॉ. व्ही. एम. घोळवे, डॉ. एस. पी. म्हेञे यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून अाले की, पॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा) या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले.

सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व काही ठिकाणी शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळपास २१ दिवसांचा पडलेला खंड व त्यानंतर पुढील १० दिवसांत अंदाजे २५० मिमी झालेल्या जोरदार पावसामुळे अनुक्रमे जास्त उष्णता व जास्त आर्द्रता निर्माण झाली. मराठवाडा विभागात डॉ. आर. एस. जाधव, डॉ. व्ही. एम. घोळवे, डॉ. एस. पी. म्हेञे यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून असे दिसून अाले की, पॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा) या रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्याच बरोबर विविध पाने खाणाऱ्या अळ्यांचादेखील प्रादुर्भाव काही भागात झाल्याचे दिसून येत आहे.

पॉड ब्लाईट / अंथ्रॅक्नोज (शेंग करपा)

 • जास्त तापमान व जास्त आर्द्रता या रोगास पोषक ठरते.
 • पीक फुलेाऱ्यात असताना पानावरती लहान अकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसून त्या भोवती पिवळया रंगाची छटा दिसते व नंतर खोड व लागलेल्या शेंगावर विविध आकाराचे लालसर, गडद तपकिरी रंगाचे ठिपके चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीजांडकोशांचे काळ्या रंगाचे अावरण चढते.
 • प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरवातीस पिवळसर-हिरव्या दिसतात व नंतर वाळतात. शेंगामध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान, सुरकुतलेले दिसतात. पाने पिवळी तपकिरी होणे, वाकडी होणे व गळणे ही सुद्धा या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रण

 • टॅब्युकोनॅझोल १० टक्के + सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर हे संयुक्त बुरशीनाशक पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडाचे उत्पादन पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरल्यास रोपे लगेच मरून जातात.

पाने खाणाऱ्या अळ्या

 1. तंबाखूवरील पाने खाणारी अळी- स्पोडोप्टेरा
 2. उंटअळी- प्रादुर्भाव पीक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होतो.
 • गेसोनिया गेमा या प्रजातीचा सोयाबीनच्या सुरवातीच्या अवस्थेत व सर्वात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होताना आढळून येत आहे.
 • लहान अळ्या फक्त पानांचे हरितद्रव्य खरवडून खातात त्यामुळे पानांवर पातळ पारदर्शक खिडक्या तयार होतात (पूर्ण पान पारदर्शक होत नाही).
 •  मोठया अळ्या पानांना वेगवेगळ्या आकराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.
 • पक्वशेंगावर दाण्यांच्या वरच्या बाजूने खातात.
  3. अळी

कीड आर्थिक नुकसान पातळी

 • तंबाखूवरील पाने खाणारी अळी ः १० अळ्या / मीटर ओळीत पीक फुलो-यावर येण्यापूर्वी.
 • उंट अळी ः ४ अळ्या / मीटर ओळीत पीक फुलो-यावर असताना अाणि ३ अळ्या / मीटर ओळीत पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना.
 • घाटे अळी ः ५ अळ्या / मीटर ओळीत पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असताना.
 • केसाळ अळी ः १० अळ्या / मीटर ओळीत पीक फुलोऱ्यावर येण्यापूर्वी.

एकात्मिक कीड नियंत्रण

 • तणांचा बंदोबस्त करावा. बांध व शेत स्वच्छ ठेवावे.
 • तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि केसाळ अळयांची अंडी व समूहातील अळया जाळीदार पानासह काढून नष्ट करावीत.
 • घाटे अळी व तंबाखू वरील पाने खाणा-या अळींच्या सर्व्हेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे वापरावेत.
 • पिकाचे नियमित सर्वेक्षण करून व किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्याची खाञी करुनच शिफारशीनुसारच रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.

जैविक नियंत्रण
पाने खाणाऱ्या अळ्या (तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी, केसाळ अळी, घाटे अळी)
प्रमाण प्रती लीटर पाणी
बिव्हेरिया बॅसियाना ः ४ ग्रॅम
एस एल एन पी व्ही (५०० एल ई) ः २ मिली
अॅझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) ः २.५ मिली
बॅसिलस थुरिंजिएनसिस ः २ ग्रॅम

रासायनिक नियंत्रण
प्रमाण प्रती १० लीटर पाणी
पाने खाणाऱ्या अळ्या
डायक्लोरोव्हास (७६ ईसी) ५.६४ - ७.५२ मिली
तंबाखूवरील पाने खाणारी अळी
इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ६.६६ मिली
हिरवी उंट अळी
इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ६.६६ मिली
लॅबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी एस) ६ मिली
प्रोफेनोफॉस (५० ईसी) २० मिली

डॉ. आर. एस. जाधव, ७५८८०५३९३९
(कीटकशास्त्र विभाग, अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...