ऊस पीक सल्ला

ऊस पीक सल्ला
ऊस पीक सल्ला
  1. आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम जमिनीत १०० सें.मी. व भारी जमिनीत १२० सें.मी. ठेवावे. ठिबक सिंचनाखाली जोडओळ पद्धतीसाठी मध्यम जमिनीत ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीत ९०-१८० सें.मी. जोडओळ पद्धतीचा अवलंब करावा.
  2. रोगग्रस्त किडग्रस्त शेतातील व खोडव्याचे व बेणे लागवडीस वापरू नये. ऊस बेणे मळ्यातीलच बेणे वापरावे.
  3. आडसाली लागवड करताना को. ८६०३२, को.एम. ०२६५ आणि व्हीएसआय ८००५ या शिफारशीत जातींचा वापर करावा.
  4. ऊस बेणे प्रक्रिया ः लागवड करण्यापूर्वी खवले कीड, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा, पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी ३०० मिलि मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) आणि १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये दहा मिनिटे बुडवावे. प्रति १०० लिटर पाण्यात १० किलो ॲसेटोबॅक्‍टर डायऍझोट्रॉपिकस आणि १.२५ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक मिसळून या द्रावणात रासायनिक प्रक्रिया केलेले बेणे ३० मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर बेणे लागवडीसाठी वापरावे.
  5. वाळवी, खोडकीड व मूळ पोखरणारी अळी
  6. क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ लिटर प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून ऊस लागवडीनंतर वाफसा असताना सरीतून प्रतिहेक्‍टरी द्यावे.
  7. लागवडीसाठी एक डोळा (६,५०० टिपरी) किंवा दोन डोळा (१०,००० टिपरी) टिपरीचा वापर करावा.

खत मात्रा ः

  1. आडसाली उसाला लागवडीचे वेळी शिफारशीतील मात्रेच्या १० टक्के नत्र (४० किलो नत्र), ५० टक्के स्फुरद (८५ किलो), ५० किलो (८५ किलो) पालाशयुक्त खताची मात्रा घ्यावी.
  2. को. ८६०३२ या जातीसाठी हेक्‍टरी ५०० किलो नत्र,२०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश ही खतमात्रा घ्यावी तर को.एम. ०२६५ या जातींसाठी हेक्‍टरी ४०० किलो नत्र, १७० किलो स्फुरद, १७० किलो पालाश खतमात्रा द्यावी.
  3. माती परीक्षणाच्या आधारे जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास प्रतिहेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅग्नीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्‍स ही सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चांगल्या कुजलेल्या शेणखतात १०ः१ प्रमाणात मिसळून २ ते ३ दिवस मुरवून सरीमध्ये चळी घेऊन मातीआड करावीत.
  4. स्फुरदयुक्त खतांसाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.

कीड, रोग नियंत्रण ः नदीकाठचा भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये हुमणी कीड आणि पोक्का बोइंग व शेंडा कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

हुमणी ः

  1. रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे सामुदायिकरीत्या २ ते ३ वेळा गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत..
  2. मर झालेली रोपे उपटावीत. मुळाशेजारील जमिनीतील अळ्या गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात.
  3. बेणे लागवड करताना जमिनीत मेटारायझियम ॲनिसोप्ली २५ किलो किंवा बिव्हेरिया बॅसियाना २५ किलो शेणखत किंवा शेणकाला करून प्रतिहेक्टरी मिसळल्यास हुमणीवर बुरशीची वाढ होऊन प्रादुर्भाव कमी होतो.
  4. हेटेरो-हॅब्डीटीस सूत्रकृमीचे शेतात संवर्धन हुमणीच्या नियंत्रमासाठी उपयुक्त ठरते.
  5. निंबोळी पेंड चुरा २टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळावा.
  6. हुमणीग्रस्त शेतात फिप्रोनिल (०.३ जीआर) २० किलो प्रतिहेक्टरी शेणखतात मिसळून द्यावे, त्यानंतर हलके पाणी द्यावे.

पोक्का बोइंग रोग ः ३ ग्रॅम मॅन्कोझेब प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी. १० ते १२ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या.

तण नियंत्रण ः आडसाली लागवड केल्यानंतर जमिनीत वापसा आल्यानंतर (साधारण ३ ते ४ दिवसांनी) तण नियंत्रणासाठी मेट्रिब्यूझीन ६०० ग्रॅम हे ४०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. संपर्क ः ०२१६९-२६५३३४ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com