agricultural stories in marathi, AGROWON, technowon, Co-Adaptive Strategies to Manage Sodicity and Climate Risks: Lessons for Policy Intervention | Agrowon

सोडियम क्षारांचे अाधिक्य असलेल्या जमिनींच्या सुधारणेतून उत्पादनवाढ
वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून, त्यामध्ये पिकांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अधिक धोरणात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. २००९ पासून पतियाळा जिल्ह्यातील बुधमौर आणि जोधपूर येथील काही शेतकरी गटांनी व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञानी एकत्र येत जमीन सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून भात व गहू पिकांत १० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ मिळवणे शक्य झाले.

जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून, त्यामध्ये पिकांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अधिक धोरणात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. २००९ पासून पतियाळा जिल्ह्यातील बुधमौर आणि जोधपूर येथील काही शेतकरी गटांनी व भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञानी एकत्र येत जमीन सुधारणेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यातून भात व गहू पिकांत १० ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ मिळवणे शक्य झाले.

वाढत्या सोडियम क्षारामुळे भूजलामध्ये अल्कली गुणधर्म वाढतात. अशा पाण्याचा सिंचनासाठी सातत्याने वापर केल्याने जमिनीमध्ये पिकांमध्येही त्याचे प्रमाण वाढते. या घटकाच्या अधिक्यांमुळे पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत जाते. पतियाळा जिल्ह्यातील बुधमौर आणि जोधपूर भागामध्ये भात आणि गहू पिके प्राधान्याने घेतली जातात. यात रोपे मरणे, पाने पिवळी पडणे, पुनरुत्पादकता कमी होणे, दाणे न भरणे या लक्षणांसह उत्पादनामध्ये सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होते. यावर मात करण्यासाठी कर्नाल येथील ‘सेंट्रल सॉइल सॅलानिटी रिसर्च इन्स्टिट्यूट’ येथील आंतरशाखीय संशोधकांनी काम सुरू केले. या गावातील सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाद्वारे नेमकी समस्या आणि स्वरूप समजून घेतले. त्याच प्रमाणे माती आणि सिंचनाच्या पाण्याचे नमुने तपासून विश्लेषण केले गेले. योग्य त्या शास्त्रीय उपाययोजना शेतकऱ्यांना सुचवण्यात आल्या.

जोधपूर आणि बुधमौर गावातील मातीचा पोत (सिल्ट अधिक क्ले चे प्रमाण) ८० टक्के, सामू अधिक (८.५ ते ९.५), मध्यम क्षारता (०.७ ते ०.९) असे आढळले. भूजलामध्ये सोडियम कार्बोनेटचे अंश (RSC) ३.५ ते ४.१ meq L-१ होते.
मातीमध्ये सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी होते.

अभ्यासक्षेत्रातील मातीचे भौतिक - रासायनिक गुणधर्म
मातीचे नमुने (०-१५ सें.मी.) (नमुने = २८)
पाण्याचे नमुने (n= ९)

मातीचा सामू २ - ८.५-९.५
मातीची ईसी (dS m-१) - ०.७-०.९
सेंद्रिय कर्ब (%) - ०.४-०.५ (कमी)
उपलब्ध नत्र (kg/ha) - १४३.९ (कमी)
उपलब्ध P२O५ (kg/ha) - २१.२ (कमी)
उपलब्ध K२O (kg/ha) - २२८.८ (मध्यम)
सोडियम कार्बोनेट अंश RSC meq L-१ -३.५-४.१ (अधिक)
सामू - ७.८-८.२
क्षारता (dSm-१) - ०.७-०.८

 • आलेले निष्कर्ष शेतकऱ्यांना समजावतानाच, भूजलातील सोडियम क्षारांचे प्रमाण आणि त्यामुळे मातीची सुपीकता कमी होत असल्याचे समजावण्यात आले. २००९ ते २०१२ या डॉ. रंजय के. जोशी यांच्यासह आंतरशाखीय शास्त्रज्ञ डॉ. आर. के. यादव, डॉ. सत्येंद्र कुमार, डॉ. अंशुमन सिंग, डॉ. अरविंद कुमार, डॉ. अवतार सिंग यांनी चार वर्षांचा कार्यक्रम ठरवला. प्रति वर्ष शेतांमध्ये उपाययोजना राबवण्याचे ठरवले.
 • चार वर्षांमध्ये भाताच्या बासमती सीएसआर३० चे उत्पादन ८ टक्के, तर पुसा ४४ चे उत्पादन १० टक्क्यांनी वाढले.
 • लेसर तंत्रज्ञानाच्या साह्याने जमीन समतोल करण्यात आल्याने सीएसआर ३० च्या उत्पादनामध्ये १२ टक्क्यांनी, तर पुसा ४४ च्या उत्पादनामध्ये १५ टक्के वाढ झाली.
 • अधिक सोडियम क्षार असलेले पाणी खास तयार केलेल्या जिप्समच्या बेडमधून (ट्यूबवेलच्या चेंबरमधून) सोडण्यात आले. या तंत्रामुळे सीएसआरच्या उत्पादनामध्ये ३७ टक्के. पुसा ४४ च्या उत्पादनामध्ये २९ टक्के वाढ झाली.

भातातील यश

 • शेतकऱ्यांना सुधारित आणि क्षार सहनशील भात जाती (सीएसआर ३६ आणि सीएसआर ३०) आणि गहू जाती (केआरएल २१०) घेण्याचे सुचवण्यात आले. यामुळे पाणी व मातीमध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असण्याच्या स्थितीमध्येही उत्पादनामध्ये शाश्वतता आणणे शक्य झाले.
 • शेतकऱ्यांना शेतीमध्ये जिप्समचा वापर, लेसर तंत्रज्ञानाच्या साह्याने समतल जमीन करणे, चिझलिंग आणि पाण्याचे उदासिनीकरण करण्यासाठी जिप्सम बेड तंत्रज्ञान अशा विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या.
 • एकूण ३५ शेतकऱ्यांपैकी ६० टक्के शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जिप्समचा वापर केला. ४० टक्के शेतकऱ्यांनी लेसर तंत्रज्ञानाने जमीन समतल केली. १५ टक्क्यांनी चिझलिंग केले, तर ५ टक्के शेतकऱ्यांनी पाण्याच्या उदासिनीकरणासाठी जिप्सम बेड तंत्राचा वापर केला.
 • या सर्व उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या सीएरआर ३६ च्या उत्पादनामध्ये ४.४ टन प्रतिहेक्टर आणि पुसार ४४ च्या उत्पादनामध्ये ४ टन प्रतिहेक्टर वाढ झाली.
 • पूर्वी २००७ आणि २००८ मध्ये यापैकी काही शेतकऱ्यांनी भाताच्या बासमती प्रकारीतल सीएसआर ३० चे उत्पादन घेतले होते. मात्र, वरील उपाययोजनांचा अवलंब केलेला नसल्याने चांगले उत्पादन मिळू शकले नाही. अगदी २०१० पर्यंत या शेतकऱ्यांचे भातउत्पादन हेक्टरी २.१ टन इतके कमी होते.

गहू पिकातील यश

 • भात पिकातील यश पाहता, तसाच प्रयोग गहू पिकामध्येही करण्यात आला. पूर्वी २००८ ते २०१२ या काळात हे शेतकरी गव्हाच्या पीबीडब्यू ३४३ या जातीचे सरासरी ३.८ टन प्रतिहेक्टर उत्पादन घेत असत. २०१३ ते २०१७ या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी एचडी २९६७ या सुधारित जातीची लागवड केली. त्याचे उत्पादन सरासरी ४.४ टन प्रतिहेक्टर मिळाले.
 • २०१५ मध्ये क्षार सहनशील गहू जात केआरएल २१० चे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या जातीमुळे पीबीडब्ल्यू ३४३ आणि एचडी २९६७ पेक्षा अधिक उत्पादन (सरासरी ४.९ टन प्रतिहेक्टर) मिळाले. हे प्रमाण पारंपरिक जातीच्या पीबीडब्ल्यू ३४३ आणि एचडी २९६७ तुलनेमध्ये अनुक्रमे २९ टक्के व टक्के अधिक होते.
 • जिप्सम बेड बनविण्यासाठी प्रति युनिट सुमारे ३५ हजार खर्च येतो. यासाठी शासनाच्या वतीने कोणतेही अनुदान मिळत नाही. पर्यायाने लहान शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोठी ठरत असून, शासनाच्या वतीने त्यावर काही प्रमाणात अनुदान मिळाल्यास तंत्रज्ञानाचा प्रसार होईल.
 • त्याच प्रमाणे लेसर लॅंड लेव्हलिंग तंत्रज्ञानासाठी मोठा खर्च असून, दर तीन वर्षानी तो करावा लागणार आहे. सध्या भाडे तत्त्वावर हेक्टरी ३००० रुपये खर्च येत असल्याने अनेक शेतकरी या तंत्राद्वारे शेती समतल करू लागले आहेत.

या प्रकल्पातून पुढे आलेल्या बाबी ः
जिथे जमिनीची सुपीकता, सिंचनाच्या पाण्यामध्ये सोडियम क्षारांचे अधिक प्रमाण आणि हवामानातील तीव्र बदल अशा तीन समस्यांचा सामना करताना केवळ एकाच तंत्राचा वापर उपयोगी ठरणार नाही. दोन किंवा त्यापेक्षा अधिक तंत्राचा एकत्रित वापर करावा लागणार आहे. यासाठी होणारा खर्च अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये १० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते. असेच प्रकल्प वेगाने राबवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शासनाने एकत्रितरीत्या प्रयत्न करण्याची गरज यातून अधोरेखित झाली.

इतर टेक्नोवन
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्तलहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर...
गुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा...गुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या...
डेअरी उत्पादनातील साखर कमी करण्याची...जगभरामध्ये डेअरी उत्पादनांची लोकप्रियता मोठी असून...
ट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची...मजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह...
इलेक्ट्रीक ट्रॅक्टरमध्य फ्रान्स येथील ॲलेक्झांड्रे प्रेवॉल्ट (वय ३०...
ताणस्थितीतही मिळतील अधिक चवदार टोमॅटोतुर्कस्तान येथील इझमीर तंत्रज्ञान संस्थेतील...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
जमीन व्यवस्थापनातून जागतिक तापमानवाढीचा...कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जमिनीच्या...
योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापरपिकांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून...नेदरलॅंड येथील पिएट जॅन थिबाऊडीअर (वय ३१ वर्षे)...
ड्रॅगन फ्रूटपासून आरोग्यवर्धक जेली, जॅम...कमी शर्करा असलेल्या फळांमध्ये ड्रॅगन फ्रूट हे...
काकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ...खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या...
टाकाऊ घटकांपासून दर्जेदार ‘...बुद्धीचा कल्पक व कार्यक्षम वापर करून जयकिसन...
खते देण्यासाठी ब्रिकेटस टोकण यंत्रसध्या विदर्भातील भात उत्पादक पट्ट्यामध्ये भाताची...
कंपोस्ट खतनिर्मिती यंत्राचे तयार केले... स्वयंपाक घरातील ओला कचरा हा कचरा कुंडीत न...
वनस्पतीयुक्त भिंती सांगतील घराचे आरोग्यवनस्पतिशास्त्र आणि इमारत आरेखनशास्त्र या दोहोंचा...
ट्रॅक्टरचलित कुट्टी यंत्र, खड्डे खोदाई...मजूर टंचाई लक्षात घेता विविध यंत्रांची निर्मिती...