काकडीच्या फुलांचा खाद्यपदार्थ सजावटीसाठी वापर

बातम्या
बातम्या

खाद्य पदार्थांच्या बाजारपेठेत कंपन्या वेगवेगळ्या संकल्पना राबवित असतात. फ्रान्समधील फळे, भाजीपाला आणि सॅलेडचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने खाद्य पदार्थ सजवण्यासाठी काकडीच्या फुलांचा पुरवठा सुरू केला आहे. या बाबत माहिती देताना कंपनीचे अधिकारी म्हणाले, की आम्ही फ्रान्स तसेच अन्‍य देशांतील विविध हॉटेल्सला हंगामानुसार ताजी फळे, भाजीपाल्याचा पुरवठा करतो. याचबरोबरीने आम्ही विशेष मागणी लक्षात घेऊन खाद्य पदार्थांच्या सजावटीसाठी काकडीच्या फुलांचा पुरवठादेखील सुरू केला आहे. या हॉटेल्सला मध्यम आकाराची फुले लागतात. आमची कंपनी सुवासिक औषधी वनस्पती, खाद्यमध्ये उपयोगी फुले, सॅलेडसाठी लागणारा भाजीपाल्याचा पुरवठा करते. याचबरोबरीने आम्ही रंगीत फळे, भाजीपाला, विदेशी फळे, भाजीपाल्याचा मागनीनुसार पुरवठा करतो. सध्या खाद्यपदार्थ निर्मिती आणि सजावटीसाठी फळे, फुले आणि भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. समुद्रात औषधी वनस्पती, भाजीपाल्याची लागवड येत्या काळात वाढत्या लोखसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी पीक उत्पादन वाढ, नवीन जाती तसेच उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या माहितीनुसार सध्या पृथ्वीवरील उपलब्ध जागेचा विचार करता अकरा टक्के जागा पीक उत्पादनासाठी उपलब्ध आहे. ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. वाढत्या लाेकसंख्येमध्ये उपलब्ध जागेवर नागरीकरणाचा दबाव आहे. त्यामुळे लागवड क्षेत्रावर देखील मर्यादा येत आहेत. येत्या काळातील पौष्टीक अन्नधान्याची मागणी लक्षात घेता समुद्रातील काही वनस्पती पोषक आहाराचा स्राेत होऊ शकतील का? याबाबत इटलीमधील तज्ज्ञांचा गट अभ्यास करत आहे. या गटातील तज्ज्ञ सध्या समुद्रातील पाण्यामध्ये औषधी वनस्पती आणि भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेता येईल याबाबत संशोधन करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com