agricultural stories in Marathi, agrowon, technowon, innovative trailar by capulum engineering | Agrowon

सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे प्रमाण
सतीश कुलकर्णी
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण महाराष्ट्रातले अगदी परिचयाचे दृश्य आहे. त्याचप्रमाणे उसाने भरगच्च भरलेल्या ट्रेलरला होणारे अपघात हेही नवीन नाहीत. या अपघातामुळे होणारी जीवित व   शेतीमालाची हानी अत्यंत दुर्दैवी असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या समस्या कमी करण्यासाठी भोसरी (जि. पुणे) येथील कॅप्युलम इंजिनिअरिंग या कंपनीने प्रयत्न केले असून, ट्रेलरमध्ये  सुधारणा केल्या आहेत.

ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण महाराष्ट्रातले अगदी परिचयाचे दृश्य आहे. त्याचप्रमाणे उसाने भरगच्च भरलेल्या ट्रेलरला होणारे अपघात हेही नवीन नाहीत. या अपघातामुळे होणारी जीवित व   शेतीमालाची हानी अत्यंत दुर्दैवी असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या समस्या कमी करण्यासाठी भोसरी (जि. पुणे) येथील कॅप्युलम इंजिनिअरिंग या कंपनीने प्रयत्न केले असून, ट्रेलरमध्ये  सुधारणा केल्या आहेत.

आजच्या परंपरागत ट्रेलरमध्ये दोन महत्त्वपूर्ण कमतरता असतात. एक म्हणजे ट्रेलरला ब्रेक नसतात. दुसरी कमतरता म्हणजे मालाने भरलेल्या ट्रेलरचा गुरुत्वमध्य खूपच उंच असतो. या दोन्ही गोष्टींमुळे ट्रेलर पलटी होण्याची शक्यता वाढते. या समस्येवर मात करण्यासाठी कॅप्युलम कंपनीने ट्रेलरमध्ये सुधारणा केल्या आहेत.
कॅप्युलम कंपनी गेल्या २५ वर्षापासून औद्योगिक ट्रेलर निर्मितीच्या व्यवसायात आहे. संरक्षण क्षेत्राला लागणारे विशेष ट्रेलर निर्मिती करणाऱ्या थोड्या कंपन्यापैकी कॅप्युलम ही एक आहे. औद्योगिक व संरक्षण क्षेत्रातील अनुभव वापरून कॅप्युलम कंपनीने हा सुरक्षित ट्रेलर बनवला असल्याचे कार्यकारी संचालक योगीराज गदो यांनी सांगितले.

सध्याच्या ट्रेलरची रचना व समस्या
 ट्रेलरला कोणत्याही प्रकारचे ब्रेक नसतात. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाने जर ब्रेक लावला तर त्याला जोडलेल्या मालाने भरलेल्या व वेगात असलेल्या ट्रेलरचा सर्व भार जोडभागांवर येतो. अचानक लागलेल्या ब्रेकमुळे ट्रेलरची दिशा बदलते व ट्रेलर पलटी खातो. त्याचप्रमाणे चढावर किंवा उतारावर ट्रॅक्टरने ब्रेक लावल्यावर सर्व भार ट्रॅक्टरवर देऊन ट्रेलर पलटी होतो.
 सध्याच्या ट्रेलरला प्लेट स्प्रिंग किंवा पाटे वापरले जातात. या पाट्यांच्या रचनेमुळे शेतीमाल भरल्यावर ट्रेलरचा गुरुत्वमध्य हा ट्रॅक्टरपेक्षा उंचावर जातो. या अंगभूत दोषामुळे ट्रेलर पलटी होण्याची शक्यता वाढते.
 स्प्रिंग पाटे फक्त एकाच दिशेन म्हणजे वरून येणारे वजन घेऊ शकतात. बाजूने येणारे धक्के घेऊ शकत नाहीत. त्यामुळे रस्त्याने जाताना ट्रेलर हेलखावे खात जातो. त्यातून दोन ट्रेलर एकत्र जोडून जात असल्यास हे हेलकावे भीतीदायक ठरतात. कित्येक वेळा ट्रेलर पलटी होऊन जिवघेणे अपघात होतात.

या समस्यांवर केलेली उपाययोजना
 कॅप्युलम कंपनीने तयार केलेल्या ट्रेलरला चारही चाकांना हायड्रालिक ब्रेकची योजना केलेली आहे. ही ब्रेकची यंत्रणा ट्रॅक्टरच्या ब्रेकच्या यंत्रणेला जोडलेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाने ब्रेक लावला की त्याच प्रमाणात ट्रेलरच्या चारही चाकांचे ब्रेक लागतात. मालाने भरलेल्या ट्रेलरचा कोणत्याही प्रकारचा भार पुढील ट्रॅक्टरवर येत नाही. यामुळेच अपघाताची शक्यता जाते. या ट्रेलरला डिस्क ब्रेक लावले आहेत. त्यामुळे शेतातून जाताना लागणाऱ्या चिखलामुळे ब्रेकची कार्यक्षमता कोणत्याही प्रकारे कमी होत नाही.

 कॅप्युलम कंपनीने ट्रेलरला स्प्रिंग पाट्यांऐवजी वैशिष्ट्यपूर्ण ‘रबर टॉर्शन बार’ ही यंत्रणा वापरली आहे. यात  विशेष प्रकारचे रबराचे बार वापरले असून, भार आल्यावर हे रबर बार काही प्रमाणात फिरून लवचिकतेच्या गुणधर्मामुळे पुन्हा पूर्ववत होतात. या क्षेत्रातील ४० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या माधव बांदिवडेकर यांनी या यंत्रणेचे खालील फायदे सांगितले.

a. या रबर टॉर्शन बार यंत्रणेचे आयुष्य खूप चांगले असते. त्यामुळे स्प्रिंग पाटे तुटणे, बदलणे याचा त्रास व खर्च वाचतो.  

b. रबर टॉर्शन बार या यंत्रणेमुळे ट्रेलरची उंची कमी राहत असली तरी ग्राऊंड क्लिअरन्स कमी होत नाही. त्याच प्रमाणे गुरुत्वमध्य खाली राहतो. परिणामी ट्रेलर पलटी होण्याची शक्यता खूप कमी होते.

c. रबर टॉर्शन बार यंत्रणा ही कोणत्याही बाजूने येणारे धक्के घेऊ शकते. त्यामुळे रस्त्यावरून जाताना ट्रेलर हेलकावत नाही. अपघाताची शक्यता कमी होते.

श्री. गदो यांनी सांगितले की या सुधारित ट्रेलरमध्ये अंतर्गत माल वाहतूकीच्या जागेमध्ये सुमारे ३०% पर्यंत  वाढ होते. प्रत्येक फेरीत अधिक माल नेणे शक्य होते.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चा नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा पुरस्कार
ट्रॅक्टर ट्रॉली चालवताना येणाऱ्या विविध समस्या तंत्रज्ञान व आरेखनातून सोडवण्यात यश आले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होणार असून, प्रति फेरी ३० टक्क्यांपर्यंत अधिक शेतीमाल वाहून नेणे शक्य होणार आहे. या उत्पादनासाठी कॅप्युलम इंजिनिअरिंगला मराठा चेम्बर ऑफ कॉमर्सचे या वर्षीचे नावीन्यपूर्ण उत्पादनाचे हरी मालिनी जोशी हे पारितोषिक देऊन गौरव केला आहे.

ः ०२० -२७१३०१४४/४५
 ः योगीराज गदो, ९३७३७३७३०१

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...