तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त

तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त
तण काढण्यासाठी पॉवर वीडर उपयुक्त

लहान शेतकऱ्यांची गरज ओळखून बाजारपेठेत आता पॉवर वीडर, उपलब्ध झाले आहेत. या अवजारांमुळे मजुरी तसेच वेळेत बचत होते. कामाचा दर्जा चांगला राहतो. पिकातील आंतर मशागतीवरील खर्च कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारची स्वयंचलित अवजारे उपलब्ध आहेत. मजुरांची उपलब्धता कमी झाल्याने तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे पिकांवर थोड्याफार प्रमाणात पण जमिनीवर दीर्घकालीन परिणाम होतो, म्हणून पॉवर वीडर हे अवजार वापरणे योग्य ठरेल.

  • पॉवर वीडर हे ओळ पद्धतीने लावल्या जाणाऱ्या पिकात, फळपिके आणि भाजीपाला पिकात निंदणी करण्यासाठी वापरले जाते.
  • ज्या पिकांच्या सरींमधील अंतर ६०-७० सें.मी.पेक्षा जास्त आहे अशा पिकांमध्ये तण काढण्यासाठी पॉवर वीडरचा वापर उपयुक्त ठरू शकतो. उदा. नारळ, केळी, कपाशी, ऊस, डाळिंब, संत्री, द्राक्षे इ.
  • विविध प्रकारचे पॉवर वीडर तीन ते सहा अश्वशक्तीपर्यंत उपलब्ध आहेत.
  • पॉवर वीडरमध्ये इंजिन, इंधन टाकी, ब्लेड, चेन किंवा बेल्ट ट्रान्समिशन, हॅन्डल विथ स्पीड कंट्रोल इ. भाग आहेत. वैशिष्ट्ये (तपशील)
  • पॉवर वीडर ची रुंदी (इंच)---१२-३९
  • अश्वशक्ती---२-७
  • ब्लेड संख्या--- ८-२४
  • इंधन---पेट्रोल किंवा डिझेल
  • पॉवर ट्रान्समिशन---चेन किंवा बेल्टद्वारे
  • वजन {किलो}---५०-६०
  • स्टिअरिंग उंची---आवश्यकतेनुसार बदलता येते
  • इंधन क्षमता---८०० मिली ते १ लिटर /तास
  • कार्य खोली {इंच}---४-६
  • पॉवर वीडरची वैशिष्ट्ये • बहुपयोगी, • वजनाने हलके, • आकाराने लहान, • वापरायला सोपे • उत्कृष्ट कार्यक्षमता संपक ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ (कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com