विद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र

विद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र
विद्यार्थ्यांनी बनवले स्वस्त, कार्यक्षम फवारणी यंत्र

शेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते. सिद्धिविनायक टेक्निकल कँम्पसमधील स्कूल ऑफ इंजीनिअरिंग अँड रिसर्च टेक्नॉलॉजीमधील गणेश रामेश्वर गळस्कार, कृष्णा रवींद्र महारखडे, निशिकांत दत्तात्रय बोंडे, अंकित बळीराम खोंदले, अतुल दिलीप रावणकार या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शेतामध्ये फवारणीदरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा अभ्यास केला. त्यावर मात करण्यासाठी सुलभ अशा फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. या यंत्राचा विविध उंचीच्या पिकामध्ये व फळबागेमध्येही फवारणीसाठी होऊ शकतो. अाधी केली यंत्रांची चाचणी बाजारामध्ये उपलब्ध विविध फवारणी यंत्रांचे प्रकार, त्यांची फवारणी क्षमता यांचा प्रथम अभ्यास करण्यात आला. फवारणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून, यंत्राची निर्मिती करण्यात आला. या अंतिम वर्षाच्या प्रकल्पाला यंत्र अभियांत्रिकी विभागाचे सहा. प्रा. अनुप गावंडे यांनी मार्गदर्शन केले असून, प्राचार्य डॉ. अनंत कुलकर्णी यांनी प्रोत्साहन दिले. कृषी महोत्सवांमध्ये ठरले अाकर्षण

  • अमरावती येथे एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान झालेल्या कृषी महोत्सवात या यंत्राचे प्रदर्शन केले होते. त्या वेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, अामदार सुनील देशमुख यांनी भेट देऊन कौतुक केले.
  • खामगाव येथे १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या कृषी महोत्सवातही यंत्राने शेतकऱ्यांना अाकर्षित केले. या वेळी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, अामदार आकाश फुंडकर यांनी या यंत्राविषयी माहिती घेतली.
  • यंत्राची वैशिष्ट्ये

  • तीन चाकांवर उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर ४० लिटर टाकी बसवली आहे. तिथे टू स्ट्रोक (२५ सीसी) पेट्रोल इंजिन आणि सिंगल पिस्टन एचटीपी (१ एचपी) क्षमतेचा पंप बसवला आहे. दिशा देण्यासाठी त्याला एक हॅण्डल बसवला आहे.
  • आडव्या पाइपवर गरजेनुसार सहापासून १० पर्यंत नोझल बसवता येतात. तसेच हे नोझल असलेले पाइप आडवे किंवा उभे करता येते.
  • लागवड चाकांतील अंतर कमी जास्त करता येते.
  • पिकाच्या उंचीनुसार प्लॅटफॉर्मची उंची १० फुटापर्यंत कमी अधिक करता येते.
  • गणेश गळस्कार, ९९२१८८८८७४ प्रा. अनुप गावंडे, ९७६४००८९७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com