agricultural stories in Marathi, agrowon, technowon, Tomatoes could become the new chili peppers | Agrowon

टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणा
वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे असतो. या कॅपासिसीनमुळेच आपल्या जिभेला मिरचीच्या उष्णतेची किंवा तिखटपणाची जाणीव होते. भविष्यामध्ये हा तिखटपणा टोमॅटोमध्ये आणणे शक्य होणार असल्याचे मत ट्रेण्ड्स इन प्लॅंट सायन्स या मासिकामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

मिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे असतो. या कॅपासिसीनमुळेच आपल्या जिभेला मिरचीच्या उष्णतेची किंवा तिखटपणाची जाणीव होते. भविष्यामध्ये हा तिखटपणा टोमॅटोमध्ये आणणे शक्य होणार असल्याचे मत ट्रेण्ड्स इन प्लॅंट सायन्स या मासिकामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

संशोधकांच्या मते, टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मिती करण्यासाठी सर्व घटक उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे टोमॅटोमध्ये ही क्षमता आणणे फारसे अवघड नाही.
मिरची आणि टोमॅटो ही दोन्ही पिके एकमेकांच्या जवळची असून, सुमारे १९ दशलक्ष वर्षापूर्वी एकाच पूर्वज वनस्पतीपासून तयार झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जनुकीय साम्य आहे. टोमॅटोमध्ये कॅपासिसीन निर्मितीचे सर्व जनुके उपलब्ध आहेत. मात्र, ती कार्यान्वित होण्यासाठीची मूलद्रव्यीय यंत्रणा उपलब्ध नाही. आधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे ती नक्कीच विकसित करता येऊ शकते, असे मत ऑगस्टीन झसोगोन यांनी व्यक्त केले. त्यासाठी अत्यंत थोड्या संशोधनाची आवश्यकता आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उपयुक्तता ः

  • कॅपसिसीनमध्ये जिवाणूंना रोखण्याची क्षमता असून, वैद्यकीयदृष्ट्या त्यांचा वापर वेदनाशामक म्हणूनही केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॅपसिसीनच्या निर्मितीसाठी टोमॅटोद्वारे त्यांचे उत्पादन उपयुक्त ठरू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
  • मात्र, मिरची किंवा मिरीच्या स्प्रेचा उपयोग संरक्षणासाठीही केला जातो. सामान्य स्थितीमध्ये अशा घटकांच्या तीव्र फवारणीमुळे श्वसन यंत्रणा आणि डोळे यांना इजा पोचू शकते. या कारणांसाठी अनेक देशामध्ये अशा स्प्रे वापराला बंदी आहे.
  • तिखटपणा असलेल्या भाज्यांची निर्मिती करणे शक्य होईल.

 

इतर टेक्नोवन
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादनेभारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे...
ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचालकाची कार्यक्षमता...ट्रॅक्टरसाठी उपग्रह मार्गदर्शक आणि प्रकाश कांडी...
तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणातणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि...
फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी...
गहू बीजोत्पादनातून साधली उद्योजकताशिक्षण कमी असतानाही सातत्यपूर्ण कष्ट आणि...
जमीन सुधारणेसाठी मोल नांगरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
टोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
धान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...
शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...
गव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...
पाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...
शाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
बटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...
केळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...