कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने

कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने
कडधान्यांपासून पोषक बेकरी उत्पादने

भारतीय आहारामध्ये प्रथिनाच्या पूर्ततेचे कार्य हे प्रामुख्याने कडधान्यांच्या माध्यमातून होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातून कडधान्यांचे प्रमाण प्रतिदिन कमी होत चालले आहे. पूर्वी भारतीय आहारामध्ये डाळीपासून बनवलेल्या पापड, लाडू व अन्य खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ती अलीकडे कमी झाली असून, बिस्किटे आणि बेकरी उत्पादनांनी त्यांची जागा घेतली आहे. बेकरी उत्पादनामध्ये कडधान्याचा वापर केल्यास अशी उत्पादने भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रिय होऊ शकतात. कॅनडा येथील अल्बेर्टा पल्स ऑर्गनायझेशन यांनी अशी काही उत्पादने विकसित केली आहेत, त्यांची माहिती घेऊ.

बिस्किट्स घटक : १ ३/४ (पावणेदोन) कप मैदा, एक चमचा बेकिंग पावडर, एक चमचा दाणेदार साखर, मीठ, १/४ पाव कप मिठ नसलेले मार्गारीन, २/३ कप मसूर प्युरी, २/३ कप दूध. मसूर प्युरी बनविण्याची पद्धत : पूर्वतयारी ः मसूर शिजवून घ्यावे. ते थोड्या पाण्यासह फूड प्रोसेसरमध्ये एकजीव घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. न वापरलेली प्युरी हवाबंद भांड्यामध्ये एक ते तीन दिवस फ्रिजमध्ये आणि फ्रिजरमध्ये ६ महिन्यांपर्यंत साठवता येते. पद्धत ः  ओव्हन २२० अंश से. इतका तापवून घ्यावा. मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये पीठ, बेकिंग पावडर, साखर, मीठ मिसळून घ्यावे. त्यात मार्गारीन मिसळून मसूरीची प्युरी मिसळावी. त्यात दूध टाकून चांगल्या प्रकारे एकजीव करावे. त्याचा गोळा बनवून हलक्या कोरड्या पीठ टाकलेल्या पृष्ठभागावर ४ ते ५ सेंमी जाडीचे लाटून घ्यावे. त्याचे कुकी कटरच्या साह्याने बिस्किटासारखे तुकडे करून घ्यावेत. ही बिस्किटे बेकिंग शीटवर एकमेकांपासून २.५ सेंमी दूर ठेवत १४ ते १५ मिनिटांसाठी सोनेरी होईपर्यंत बेक करून घ्यावीत. मळण्याशिवाय मसुरी ब्रेड घटक : १ कप शिजवलेले मसूर, ३ कप पीठ किंवा मैदा किंवा संपूर्ण गहू, अर्धा चमचा कार्यरत कोरडे यीस्ट, १ चमचा मीठ. पद्धत ः अर्धा कप (१२५ मिलि) पाण्यासह मसूर घेऊन फूड प्रोसेसरमध्ये फिरवून मऊ प्युरी तयार करावी. मोठ्या भांड्यामध्ये पीठ, यीस्ट आणि मीठ एकत्र करावे. त्यात एक पाण्यासह मसूर चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावेत. त्याची कणीक मळून, प्लॅस्टिक किंवा प्लेटने झाकून सामान्य तापमानाला १८ ते २४ तास भिजत ठेवावी. या पिठाचा पृष्ठभाग ओलसर आणि बुडबुड्यांनी युक्त झाल्यानंतर तो गोळा बाहेर काढावा. त्यावर पीठ टाकून चांगले मळून गोळा करून घ्यावा. त्यावर पीठ भुरभुरून सुती कपड्याने घाकून एक तास मुरू द्यावे. हे मिश्रण मुरत असताना ओव्हन २३० अंश से. तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. हे झाकलेले भांडे ओव्हनमध्ये ठेवावे. गोळा तयार झाल्यानंतर तो ओव्हनमधून बाहेर काढावा. तो फिरवून पुन्हा ३० मिनिटांसाठी बेक करावा. त्यानंतर त्यावरील भाग काढून चांगला कुरकुरीत होईपर्यंत १० ते १५ मिनिटांसाठी बेक करावा.

प्रति काप मिळणारे पोषक घटक ः २०० कॅलरी, फॅट ० ग्रॅम, संपूक्त मेद ० ग्रॅम, कोलेस्टेरॉल ० मि.ग्रॅ., ४० ग्रॅम कर्बोदके, ४ ग्रॅम फायबर, १ ग्रॅम साखर, ७ ग्रॅम प्रथिने, ३१५ मि.ग्रॅ. सोडियम, ५३ मि.ग्रॅम पोटॅशिअम, ९२ मायक्रोग्रॅम फोलेट. नट ब्रेड घटक ः २/३ कप लोणी, २ कप साखर, ४ अंडी, २ कप तूरडाळीची प्युरी, २/३ कप पाणी, ३ १/३ कप सर्वोपयागी पीठ, २ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा मीठ, १/२ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी पावडर, १/२ चमचा लवंग पावडर, १/२ चमचा जायफळ पावडर, १ कप अक्रोडचे तुकडे. तूरडाळीची प्युरी करण्याची पद्धत ः एक कप तुरीची डाळ वाहत्या पाण्यामध्ये धुवून घ्यावी. ती मध्यम आकाराच्या सॉसपॅनमध्ये अडीच कप (६२५ मिली) पाणी मिसळावे. त्याला उकळी आल्यानंतर उष्णता कमी करावी. त्यावर झाकण ठेवून कमी आचेवर ४५ मिनिटे शिजू द्यावे. सावकाश थंड होऊ द्यावे. त्यातील पाणी तसेच ठेवून फूड प्रोसेसर, ब्लेंडर किंवा मॅशरच्या साह्याने बारीक मऊ करून घ्यावी. त्यात एकेक चमचा पाणी वाढवून योग्य तितकी पातळ करून घ्यावी. प्रक्रिया ः ओव्हन १८० अंश से. इतका प्रीहिट करून घ्यावा. लोणी आणि साखर एकत्र मिसळून एकजीव करावे. अंडे फोडून त्यात मिसळून घ्यावे. त्यात तुरीच्या डाळीची प्युरी आणि पाणी मिसळावे. एका वेगळ्या भांड्यामध्ये अक्रोड वगळता सर्व कोरडे घटक एकत्र करावेत. चांगल्या प्रकारे मिसळून त्यात अक्रोड घालावेत. हे मिश्रण तेल लावलेल्या ५ बाय ९ इंच आकाराच्या दोन पॅनमध्ये ६० ते ७० मिनिटे बेक करावे. त्यात टूथपीक काडी खुपसल्यानंतर ती स्वच्छ बाहेर आल्यास ब्रेड तयार झाल्याचे समजावे. थंड झाल्यानंतर हे ब्रेड हवाबंद प्लॅस्टिक पिशवीत साठवावे. प्रति काप पोषक घटक ः २१९ कॅलरी, ९ ग्रॅम मेद, ३ ग्रॅम संपूक्त मेद, ३९ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल, ३२ ग्रॅम कर्बोदके, १ ग्रॅम फायबर, १६ ग्रॅम साखर, ५ ग्रॅम प्रथिने, १७२ मिग्र सोडियम, ११९ मिग्रॅम पोटॅशिअम, ८३ मायक्रोग्रॅम फोलेट, १ मिग्रॅ लोह. चॉकलेट कपकेप घटक : १ ३/४ कप पीठ, १ कप ब्राऊन साखर पॅकेटमधील, ३/४ कप कोकोआ, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा  बेकिंग सोडा, १/४ चमचा मीठ, १ चमचा शिजवलेले मसूर, १/२ कप कॅनोला तेल, २ मोठी अंडी, १ १/२ कप दूध, २ चमचा व्हॅनिला अर्क, १ चमचा इन्स्टंट कॉफी. प्रक्रिया : ओव्हन १८० अंश से. तापमानाला प्रीहिट करून घ्यावा. मोठ्या भांड्यामध्ये पीठ, तपकिरी साखर, कोकोओ, बेकिंग पावडर. बेकिंग सोडा, मीठ चांगले मिसळून घ्यावे. त्यातील साखर आणि कोकोआच्या गुठल्या फोडून घ्याव्यात. फूड प्रोसेसरमध्ये मसूर, तेल आणि अंडी टाकून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावी. त्यात दूध, व्हॅनिला आणि इन्स्टंट कॉफी टाकून पुन्हा ब्लेंड करावे. त्यात कोरडे घटक टाकून एकजीव करावेत. मफीन टिन्समध्ये आतील बाजूला पेपर लावून त्यात हे बॅटर तीन चतुर्थांशपर्यंत भरावे. वरील बाजूला स्पॉन्जी स्पर्श येईपर्यंत २५ मिनिटे बेक करावे. त्यानंतर पॅनवर हलकेसा दाब देऊन त्यातील वाफ बाहेर पडू द्यावी. यामुळे केक थंड होण्यास मदत होते.   एका कपकेकमधील पोषक घटक : १८० कॅलरी, ७ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, २० मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, २६ ग्रॅम कर्बोदके, २ ग्रॅम फायबर, १४ ग्रॅम साखर, ४ ग्रॅम प्रथिने, १५० मिलि ग्रॅम सोडियम, १४१मिलि ग्रॅम पोटॅशिअम, ३८ मायक्रोग्रॅम फोलेट, १.५ मायक्रोग्रॅम लोह. गाजराचे मसालेदार मफिन्स घटक : १/२ कप तपकिरी साखर, ३/४ कप दाणेदार साखर, १ चमचा व्हॅनिला, १/३ कप कॅनोला तेल, २ अंडी, १ कप मसूर प्युरी, १ कप बारीक केलेले गाजर, १ कप पीठ, ३/४ कप संपूर्ण गहू पीठ, चिमूटभर मीठ, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी, १ चमचा अक्रोड. पद्धत ः ओव्हन १८० अंश से. तापमानापर्यंत प्रीहिट करून घ्यावे. मफिनमध्ये हलकासा तेलाचा फवारा मारावा. दोन्ही साखर, व्हॅनिला, कॅनोला तेल आणि अंडी एका मध्यमा आकाराच्या भांड्यामध्ये चांगले मिसळून घ्यावेत. त्यात मसूर प्युरी आणि बारीक केलेले गाजर टाकावे. एका वेगळ्या भांड्यामध्ये पीठ, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी आणि अक्रोड मिसळून घ्यावेत. हे कोरडे घटक मसूक, गाजराच्या मिश्रणात ब्लेंड करून घ्यावेत. हे तयार झालेले मिश्रण मफिन पॅनमध्ये टाकून, २० ते २५ मिनिटे बेक करावे. टूथपीक त्यात बुडवून बाहेर काढल्यास स्वच्छ बाहेर आल्यास मफिन्स तयार झाल्याचे समजावे.ते ओव्हनमधून बाहेर काढून काही मिनिटांसाठी थंड होऊ द्यावे. त्यानंतर पॅन कुलिंग रॅकमध्ये ठेवावेत.    एका मफिन्समधील पोषक घटक ः २२१ कॅलरी, ७ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, ३२ मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, ३४ ग्रॅम कर्बोदके, २ ग्रॅम फायबर, १६ ग्रॅम साखर, ६ ग्रॅम प्रथिने, १६६ मिलि ग्रॅम सोडियम, १६३ मिलि ग्रॅम पोटॅशिअम, ८९ मायक्रोग्रॅम फोलेट, २ मायक्रोग्रॅम लोह. काळ्या वालाची ब्राऊनी १/२ कप तपकिरी साखर, ३/४ कप दाणेदार साखर, १ चमचा व्हॅनिला, १/३ कप कॅनोला तेल, २ अंडी, १ कप मसूर प्युरी, १ कप बारीक केलेले गाजर, १ कप पीठ, ३/४ कप संपूर्ण गहू पीठ, चिमूटभर मीठ, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा दालचिनी, १ चमचा अक्रोड. घटक ः २/३ कप पीठ, चिमूटभर मीठ, १/२ चमचा बेकिंग पावडर, १/२ कप कोकोआ पावडर, १/२ कप मार्गारीन, १ १/२ कप साखर, १ कप शिजवलेले काळे वाटाणे, ४ अंडी, १ चमचा व्हॅनिला. पद्धत ः ओव्हन १७५ अंश से. पर्यंत प्रीहिट करून घ्यावे. ९ बाय १३ इंच आकाराच्या पॅनमध्ये हलकेसे तेल लावून घ्यावे. एका भांड्यामध्ये पीठ, मीठ आणि बेकींग पावडर एकत्र मिसळून घ्यावी. फूड प्रोसेसरमध्ये कोकोआ, मार्गारीन, साखर, काळे वाल, अंडी आणि व्हॅनिला एकत्र मिसळून बारीक करून घ्यावेत. त्यात वाल बारीक पीठ (किंवा पोताच्या आवश्यकतेनुसार अत्यंत लहान तुकड्यात) व्हावेत. हे ओले मिश्रण कोरड्या मिश्रणासाठी चांगले मिसळून घ्यावे. हे मिश्रण पॅन टाकून ३० मिनिटांसाठी बेक करावेत. यात चाकू बुडवल्यास तो स्वच्छ बाहेर येतो. ही किंचित ओलसर ब्राऊनी हवाबंद भांड्यामध्ये फ्रिजमध्ये ठेवावी. एका ब्राऊनीमधील पोषक घटक ः ९५ कॅलरी, ४ ग्रॅम मेद, १ ग्रॅम संपृक्त मेद, २४ मिलि ग्रॅम कोलेस्टेरॉल, १४ ग्रॅम कर्बोदके, १ ग्रॅम फायबर, १० ग्रॅम साखर, २ ग्रॅम प्रथिने, ५८ मिलि ग्रॅम सोडियम, ५४ मिलि ग्रॅम पोटॅशियम, २२ मायक्रोग्रॅम फोलेट, ०.५ मायक्रोग्रॅम लोह. ई-मेल ः ramabhau@gmail.com (लेखक लुधियाना येथील सिफेट संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com