agricultural stories in marathi, agrowon, turmeric advice | Agrowon

हळद पीक सल्ला
डॉ. मनोज माळी, डॉ. दिलीप कठमाळे
बुधवार, 14 मार्च 2018

वाफेच्या साह्याने हळद शिजवणे ः

वाफेच्या साह्याने हळद शिजवणे ः

 1. वाफेच्या साह्याने हळद शिजविण्याच्या यंत्राचा फायदा होतो, यास बॉयलर म्हणतात. या सयंत्रामध्ये चारही दिशेला साधारणतः २५० किलो हळद सामावली जाईल एवढ्या क्षमतेचे चार लोखंडी ड्रम असतात.
 2. यंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी दोन टाक्‍या आहेत. पाणी उकळण्यास दीड तासाचा अवधी पुरेसा होतो. पाणी उकळल्यानंतर नंतर तयार झालेली पाण्याची वाफ पाइपद्वारे चारही लोखंडी ड्रममध्ये आत सोडली जाते.
 3. योग्य पद्धतीने हळद शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालील बाजूने असलेल्या नळाद्वारे पाणी टिपकण्यास सुरवात होते. पाणी येऊ लागताच हळद शिजली आहे हे समजते किंवा शिजलेले हळकुंड मध्यभागी हलकेच मोडले असता बारीक तारा दिसल्या पाहिजेत.

फायदे ः

 • ड्रममधील संपूर्ण हळद योग्यरित्या शिजते.
 • हळदीचा दर्जा योग्य राखला जातो, कुरकुमीनचे प्रमाण हळदीत आहे तसे साठविले जाते.
 • एका बॅचमध्ये साधारणपणे २०० किलो कंद आणि दररोज ८ तासांत ४० क्विंटल हळद कंद उकळता येतात.
 • हळद कंदाची २०० किलोची एक बॅच उकळण्यासाठी सुमारे २५ ते ३० किलो सरपणाची आवश्‍यकता असते.
 • केवळ तीन माणसे एका दिवसात ४० क्विंटल हळद कंद शिजवू शकतात.
 • या कामासाठी कुशल मजुरांची आवश्‍यकता नसते. घरातील लोक हे काम करू शकतात. परिणामी, मजुरांच्या खर्चात बचत होते.
 • शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या यंत्राचा आकार वाढविता किंवा कमी करता येतो.
 • केवळ वाफेवर उकळल्यामुळे कंद कमी प्रमाणात पाणी शोषून घेतात आणि लवकर वाळतात. पारंपरिक पद्धतीत कंद वाळण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. परंतु या सुधारित पद्धतीत कंद वाळण्यासाठी एक आठवडा पुरेसा होतो.
 • या सुधारित पद्धतीत सलग उकळण्याच्या पद्धतीमुळे इंधन व वेळ कमी लागतो.

हळद वाळविणे ः-

 • शिजवलेली हळद ८ ते १० दिवस चांगली वाळवावी. हळद वाळत घालताना पहिले चार दिवस दोन इंचापेक्षा जाड थर देऊ नये. ओली हळद सायंकाळी एकत्र गोळा करू नये.
 • लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० मिनिटांसाठी परसविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. परिणामी हळकुंडांची तुट होत नाही.
 • हळद वाळत घालताना कठीण जागेवरती किंवा ताडपत्रीवर वाळवावी. काळ्या मातीत जमीन सपाट करून पसरू नये. त्यामुळे अनावश्‍यक मजुरी खर्च वाढतो. शिवाय मालाची प्रत खराब होते. हळद वाळत घातल्यानंतर आवश्‍यकतेनुसार एक दोन वेळा हलवून घ्यावी. माती, काडीकचरा, चुकून आलेले जेठे गड्डे, बगल गड्डे वेळोवेळी काढून टाकावेत.
 • शिजवलेली हळद ८ ते १० दिवस उन्हात चांगली वाळविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत पाणी अथवा पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्ण वाळलेली हळद व अर्धवट वाळलेली हळद एकत्र मिसळून देऊ नये.
 • मधून मधून हात देताना कमी शिजलेली, जादा फुगीर दिसत असलेली हळकुंडे त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान चार वेळा जास्त ऊन असलेली हळकुंडे त्वरित वेचून बाजूला काढावीत. अशा हळकुंडांना किमान चार वेळा जास्त ऊन द्यावे लागते.

हळद पॉलीश करणे ः

 • हळद शिजविताना काहिलीतील पाण्यातील मातीचा थर हळदीवर बसलेला असतो. तसेच जातीपरत्वे हळदीची साल कमी जास्त जाडीची असते. ही साल हळद शिजवल्यानंतर काळपट दिसते अथवा चिरते. ही साल पॉलीश करून काढल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. परिणामी हळदीला बाजारभाव मिळत नाही. म्हणून हळद पॉलीश करणे गरजेचे असते.
 • हळद पॉलीश करण्यासाठी लोखंडी ऑईलचा बॅरल वापरावा. हे बॅरल एका स्टॅंडवर ठेवावे. हळद भरण्यासाठी बॅरेलला ६x९ इंचाचे तोंड ठेवावे. या बॅरेलवर १० ते १५ से.मी. अंतरावर ३ ते ६ सेमी लांबीची व १ ते १.५ सेमी रुंदीची भोके छन्नीने पाडून घ्यावीत. भोके पडलेला आतील भाग खडबरीत होतो. पिंपाच्या मधून एक लोखंडी दांडा बसवून त्याला पिंपाच्या बाहेर गेल्यानंतर दोन्ही बाजूला हॅन्डलसारखा आकार दिल्यावर दोन व्यक्तींना ड्रम स्टॅंडवर ठेवल्यावर गोलाकार फिरवता येतो. अशा पिंपात पॉलिश करावयाची हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी अणुकुचीदार ५ ते ७ दगड टाकून ड्रम फिरवल्यास आतील हळद जलदगतीने पॉलीश होते. या पद्धतीत दोन मजूर एका तासात २५ ते ३० किलो हळद पॉलीश करतात.
 • इलेक्‍ट्रीक मोटारीवर चालणारे २ ते १० क्विंटल क्षमतेपर्यंतचे हळद पॉलीश ड्रम बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या २० ते २५ टक्के इतके मिळते.

हळदीची प्रतवारी ः
हळद पॉलीश केल्यानंतर हळकुंडांची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करावी.
१. जाड, लांब हळकुंडे.
२. मध्यम जाड हळकुंडे.
३. लहान आकाराची हळकुंडे.
४. लहान माती व खडे विरहीत कणी.

संपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७७३६१४
हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,जि. सांगली.

इतर ताज्या घडामोडी
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...