agricultural stories in Marathi, agrowon, vegetable advice | Agrowon

भाजीपाला सल्ला
डॉ. एस. एस. घावडे
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, प्लॉवर, कांदा, लसूण, गाजर, मुळा, पालक मेथी या पिकांची ठरावीक क्षेत्रावर लागवड करावी. या पिकांपासून ठरावीक कालावधीत उत्पादन मिळत राहील या पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

सध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोबी, प्लॉवर, कांदा, लसूण, गाजर, मुळा, पालक मेथी या पिकांची ठरावीक क्षेत्रावर लागवड करावी. या पिकांपासून ठरावीक कालावधीत उत्पादन मिळत राहील या पद्धतीने लागवडीचे नियोजन करावे. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

कोबी, प्लॉवर ः
१) कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये लवकर येणाऱ्या अाणि उशिरा येणाऱ्या जाती उपलब्ध आहेत.
२) प्लॉवर पिकाच्या अर्ली कुवारी, पुसा दीपाली या लवकर येणाऱ्या जाती आहेत. पुसा सिंथेटिक ही हळवी जात आहे. स्नोबॉल १, स्नोबॉल १६ या जाती उशिरा येणाऱ्या जाती आहेत.
२) कोबी पिकाच्या गोल्डन एकर, प्राईड आॅफ इंडिया, पुसा ड्रम हेड, अर्ली ड्रम हेड या जातींची निवड करावी.
३) हेक्टरी ६०० ते ७५० ग्रॅम प्लॉवर आणि ४०० ते ५०० ग्रॅम कोबीचे बियाणे लागते. गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास एक ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीज प्रक्रिया करावी.
४) साधारणपणे ४० दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. रोपांची लागवड ४५ सें.मी बाय ४५ सें.मी. किंवा ६० सें.मी. बाय ६० सें.मी. अंतराने करावी.

कांदा आणि लसूणः
१) कांदा बीजोत्पादनासाठी ४० ते ६० ग्रॅम वजनाचा कांदा निवडावा. अानुवंशिकदृष्ट्या शुद्ध असणाऱ्या जातींची निवड करावी. लसूण आणि कांद्याची आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करावी.
२) लसणाची लागवड १० सें.मी. बाय १० सें.मी. आणि कांद्याची लागवड ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतराने करावी. लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या कार्बेन्डाझिमच्या (२.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) द्रावणात बुडवाव्यात.
3) बीजोत्पादनासाठी हेक्टरी २२ ते २५ क्विंटल कांदे लागतात. लसणाच्या पाकळ्या ५ क्विंटल लागतात. लसणाच्या जी-४१,जी.३२३, श्‍वेता, गोदावरी या जातीची निवड करावी. पांढरा कांद्याची अकोला सफेद, लाल कांद्याची बसवंत ७८०, फुले समर्थ या जातींची निवड करावी.

गाजर, मुळा लागवड
१) गाजराच्या पुसा केसर, पुसा मेघाली या जातींची निवड करावी.
२) मुळा पिकाच्या जापनीज व्हाईट, पुसा केतकी, पुसा देशी या जातींची निवड करावी.
३) पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.
४) प्रतिहेक्टरी मुळ्याचे ८ ते १० किलो आणि गाजराचे ५ किलो बियाणे लागते.
५) मुळा, गाजराची लागवड ४५ सें.मी. बाय १० सें.मी. अंतरावर करावी.

पालक, मेथी लागवड ः
१) पालकाच्या आॅलग्रीन, जॉबनेर ग्रीन, पुसा हरित या जातींची लागवड करावी.
२) मेथीच्या कस्तुरी, पुसा अर्ली बंचिंग या जातीची लागवड करावी.
३) प्रतिहेक्टरी पालकाचे ४० किलो आणि मेथीचे ३० किलो बियाणे लागते.
४) लागवड सपाट वाफ्यात ३० सें.मी. ओळीत अंतर ठेऊन करावी.
५) ही पिके ४० दिवसांत तयार होतात. या पिकाच्या २५ दिवसाने कापणी करावी. दोन ते तीन कापण्या करता येतात.

संपर्क ः डॉ. एस. एस. घावडे ः ७०२०५७५८६७
(भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...