agricultural stories in marathi, AGROWON, water soluble fertiliser grades | Agrowon

विद्राव्य खतांच्या ग्रेड्स अन् कार्य
रवींद्र जाधव, दीपाली मुटकुळे
बुधवार, 27 जून 2018

ठिबक सिंचनामुळे विद्राव्य खतांचा वापर वाढत आहे. अशा स्थितीमध्ये बाजारातील उपलब्ध विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून योग्य वेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. योग्य वेळी वापर केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये फायदा होतो.

१९:१९:१९, २०:२०:२० -
या खतांना ‘स्टार्टर ग्रेड’ म्हणतात. यामध्ये नत्र अमाईड, अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

ठिबक सिंचनामुळे विद्राव्य खतांचा वापर वाढत आहे. अशा स्थितीमध्ये बाजारातील उपलब्ध विविध खतांच्या ग्रेड्स व त्यांचे कार्य जाणून योग्य वेळी वापर करण्याची आवश्यकता आहे. योग्य वेळी वापर केल्यास पिकांच्या उत्पादनामध्ये फायदा होतो.

१९:१९:१९, २०:२०:२० -
या खतांना ‘स्टार्टर ग्रेड’ म्हणतात. यामध्ये नत्र अमाईड, अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

१२:६१:०० -
या खतास ‘मोनो अमोनियम फॉस्फेट’ म्हणतात. यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो, तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांची वाढ आणि जोमदार शाकीय वाढीसाठी उपयुकक्त असते. फुलांची योग्य वाढ व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

००:५२:३४ -
या खतास ‘मोनो पोटॅशियम फॉस्फेट’ म्हणतात. यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

१३:००:४५ -
या खतास ‘पोटॅशियम नायट्रेट’ म्हणतात. यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून, पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

००:००:५०+१८ -
या खतास ‘पोटॅशियम सल्फेट’ म्हणतात. पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक ही असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. हे खत फवारणीद्वारे वापरल्यास भुरीसारख्या रोगाचे नियंत्रणाासाठी उपयुक्त ठरते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

१३:४०:१३ -
कपाशीमध्ये पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. अन्य शेंगावर्गीय पिकांत शेंगाची संख्या वाढते.

कॅल्शियम नायट्रेट -
वाढीच्या सुरवातीच्या काळात मुळांची वाढ होण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. पुढे पीक काटक होण्यासाठी व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

२४:२४:०० -
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१
(सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड.)

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...