agricultural stories in Marathi, agrowon, Weather based agricultural advice for better agriculture | Agrowon

हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध घेणे आवश्यक
प्रमोद शिंदे, डॉ. कैलास डाखोरे, पांडुरंग कानडे
शनिवार, 23 मार्च 2019

सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, तापमानवाढ अशा स्वरूपात दिसत आहे. जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा शोध आवश्यक आहे.

सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट, पाऊस, थंडी, तापमानवाढ अशा स्वरूपात दिसत आहे. जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा शोध आवश्यक आहे.

जा गतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) या संस्थेची स्थापना २३ मार्च १९५० रोजी जिनिव्हा येथे झालेल्या सभेत झाल्यामुळे दर वर्षी हा दिवस “जागतिक हवामान दिन” म्हणून पूर्ण जगभर साजरा केला जातो. या सभेत आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेचे (आयएमओ) रूपांतर जागतिक हवामान संघटनेमध्ये (डब्ल्यूएमओ) करण्यात आले. हवामानविषयक सर्व यंत्रसामग्रीच्या तांत्रिक बाबी हीच संघटना ठरवते, म्हणून या संघटनेला महत्त्व आहे. आज या संस्थेचे भारतासह सुमारे १९१ देश सदस्य आहेत. ही संस्था हवामानाविषयी सर्व बाबींवर विश्वव्यापी कार्य करत आहे. या विशेष दिवसासाठी दरवर्षी एक थिम निवडली जाते, या वर्षीच्या जागतिक हवामान दिनाचे ब्रीद ‘सूर्य, पृथ्वी आणि हवामान’ असे आहे.

जागतिक तापमानवाढ व परिणाम
औद्योगिक क्रांतीनंतरच्या म्हणजेच मागील अडीचशे वर्षाच्या काळात मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे (आयपीसीसी २०१८ च्या अहवालानुसार तापमानात १.५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे). हवामानामध्ये बदल होण्यामागे अनेक कारणे आहेत, उदा. हरितगृह वायूंचे वाढते प्रमाण, झाडांची तोड, वाढते प्रदूषण यामुळे ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी “संयुक्त राष्ट्र संघटना” जगभरामध्ये कार्यरत आहेत.  
तापमानवाढीमुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन अनेक जीव प्रजातींचा ऱ्हास होईल, हवेच्या वेगामध्ये वाढ होईल. बरेचसे समुद्रकिनारे आणि कमी उंचीवरील बेटे पाण्याखाली जातील. अनेक नैसर्गिक अधिवास नष्ट होतील. दुष्काळाची वारंवारता वाढेल. जलपुरवठ्यात घट होईल.

हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम  
तापमानवाढ, किमान व कमाल तापमानातील तफावत, हवेतील आर्द्रता, अनियमित पाऊस, गारपीट, वारंवार घडणा­ऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवरील कीड-रोगांच्या प्रादुर्भावात मोठी भर, नवीन कीड-रोगांची उत्पत्ती इत्यादी.
हवामान बदलामुळे पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होत आहेत, यामध्ये कोंबड्यांतील मरतूक वाढणे, गाय, म्हैस, शेळ्या मेंढ्या व कोंबड्या यांच्यात थंडीची लाट, उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे आजारांचा प्रसार होतो.
गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे पिकांचे, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान होते. पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे भूजल पातळीत घट झाली असून, दुष्काळी स्थितीत वाढ होत आहे.

उपाययोजना
भविष्यात हवामानाशी सुसंगत उपाययोजना व तंत्रज्ञानाचा शोध व त्याकडे वळणे गरजेचे झाले आहे.हवामानाचा अंदाज, त्याचा पिकांवर होणारा परिणाम व त्यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाशी जुळवून घेत शेती करणे शक्य होईल. याच उद्देशाने १३२ केंद्रांमार्फत संपूर्ण देशामध्ये ग्रामीण कृषी मौसम सेवा ही योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत चार केंद्रे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत दोन केंद्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाअंतर्गत दोन तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीअंतर्गत एका केंद्रामार्फत कृषी हवामान सल्ला सेवेचे काम चालते. यामधून दिल्या जाणाऱ्या­ हवामान सल्ल्याचा उपयोग शेतकऱ्यांबरोबरच पर्यटन, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनासाठी होतो.

 ः प्रमोद शिंदे, ७५८८५६६६१५
(शिंदे हे संशोधन सहयोगी तर डॉ. डाखोरे हे मुख्य प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत.)

इतर ताज्या घडामोडी
कृषी भूसुक्ष्मजीवशास्त्रातील तथ्येमागील भागामध्ये उल्लेख आलेल्या डॉ. रंगास्वामी...
योग्य वेळी करा कडधान्य पेरणीमूग, उडीद :     मध्यम ते...
नियोजन चारा पिकांचे...सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
नाशिकमध्ये वांगी ३००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
दोषी कंपनीलाच शासनाचे १५ कोटींचे...मुंबई : केंद्र सरकारच्या ‘आयएलएफएस’ या...