agricultural stories in Marathi, agrowon, WEATHER FORECAST BY DR. SABALE | Agrowon

थंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहील
डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश भागांवर १०१६ हेप्टापास्कल तर वायव्येस राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढणार असून जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा किमान व कमाल तापमानात घट होऊन तापमान घसरते आणि थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या आठवड्यात थंडीचे प्राबल्य राहील. मात्र अरबी समुद्र व हिंदी महासागरच्या पश्‍चिमेकडील भागावरील हवेचे दाब कमी होत असून ते १०१२ हेप्टापास्कल इतके कमी राहण्यामुळे तेथे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अधिक राहील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल.

महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश भागांवर १०१६ हेप्टापास्कल तर वायव्येस राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब वाढणार असून जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा किमान व कमाल तापमानात घट होऊन तापमान घसरते आणि थंडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे या आठवड्यात थंडीचे प्राबल्य राहील. मात्र अरबी समुद्र व हिंदी महासागरच्या पश्‍चिमेकडील भागावरील हवेचे दाब कमी होत असून ते १०१२ हेप्टापास्कल इतके कमी राहण्यामुळे तेथे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान अधिक राहील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. २५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह उत्तर भारतातील हवेचे दाब १०१६ हेप्टापास्कल इतके समान राहण्यामुळे थंडीचे प्राबल्य कायम राहील. थंडीत वाढ होईल. मात्र हिंदी महासागरावरील व अरबी समुद्रावरील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र विरून जाईल.

२६ नोव्हेंबर रोजी तीच स्थिती कायम राहील आणि पुन्हा हिंदी महासागरावरील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. २७ नोव्हेंबर रोजी मुंबई, रायगड पासून संपूर्ण महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होऊन ते १०१२ हेप्टापास्कल राहतील त्यामुळे थंडी कमी होईल. कमाल व किमान तापमानात अल्पशी वाढ होईल. २८ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढेल. त्यामुळे थंडी वाढेल. तापमानात घट होईल. काश्‍मीर व दिल्ली तसेच उत्तर प्रदेश भागावर १०१८ हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब वाढतील आणि वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येतील व थंडी वाढेल. २९ नोव्हेंबर रोजी तीच स्थिती कायम राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान विषववृत्तीय भागात ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे आगामी काळात पुन्हा अवकाळी पावसाची शक्‍यता कायम राहील. १ डिसेंबर रोजी केरळ, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटकात पाऊस होईल. सध्यातरी महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता या आठवड्यात नाही.

१. कोकण
सिंधदूर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ठाणे जिल्ह्यात राहील तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६६ टक्के राहील आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात ती ७३ टक्के राहील. सिंधुदूर्ग जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ टक्के तर रत्नागिरी, रायगड व पुणे जिल्ह्यांत ३० ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

२. उत्तर महाराष्ट्र
जळगाव व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक जिल्ह्यात ते १६ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ३८ ते ३९ टक्के राहील. तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४६ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा सध्या ईशान्येकडून राहील. त्यामुळे थंडीत वाढ होईल.

३. मराठवाडा
नांदेड व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व बीड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस परभणी व जालना जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस तर औरंगाबाद जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर उर्वरित जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५२ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ते २९ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत ती अग्नेयेकडून राहील तर परभणी जिल्ह्यात ती पूर्वेकडून आणि अग्नेयेकडून राहील.

४. पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम व अकोला जिल्ह्यांत ते ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. बुलढाणा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस तर वाशीम जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ ते २७ टक्के राहील व बुलढाणा जिल्ह्यात ५५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

५. मध्य विदर्भ
मध्य विदर्भात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. यवतमाळ जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ टक्के राहील. तर नागपूर व वर्धा जिल्ह्यांत ती ५५ ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

६. पूर्व विदर्भ
चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ते १२ अंश सेल्सिअस राहील व भंडारा जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ७० टक्के राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४३ टक्के राहील. तसेच गोंदिया जिल्ह्यात ४२ टक्के राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५५ टक्के राहील. गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते २० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. तर चंद्रपूर जिल्ह्यात ती २५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर नगर जिल्ह्यात ते ३३ अंश व पुणे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५१ ते ५४ टक्के राहील. तर पुणे जिल्ह्यात ५८ टक्के राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते २८ टक्के राहील. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील आणि वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील तर सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला
१. फळबागेत झाडांच्या आळ्यात आच्छादन करावे.
२. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी ओट, लसूण घास, बरसीम, ज्वारी, मका या चारा पिकांची पेरणी करावी.
३. जमिनी समपातळीत करून बांध बंदिस्ती करावी.
४. जनावरे सावलीत शेडमध्ये बांधावीत.

(ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....