राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची शक्‍यता

राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची शक्‍यता
राज्यात ढगाळ वातावरण; तर कोकणात पावसाची शक्‍यता

भारतीय भूखंडावरील हवेचा दाब कमी होत आहेत. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचे उपसागरावर 1006 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे मॉन्सूनचे आगमनास गती प्राप्त होत नाही. कन्याकुमारीजवळ 1004 हेक्‍टॉपास्कल, मध्य भारतावर 1002 हेक्‍टॉपास्कल, उत्तर प्रदेशवर 1000 हेक्‍टॉपास्कल आणि राजस्थान, काश्‍मीर व गुजरात, पंजाब, हरियानावर 1002 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब या आठवड्यात राहील. हे हवेचे दाब मॉन्सून उत्तर भारतात वेगाने जाण्यास अत्यंत अनुकूल ठरतील. 27 मे रोजी हीच स्थिती कायम राहील. 28 मे रोजी हवामानात वेगाने बदल होतील. दिल्ली, उत्तर प्रदेशवर केवळ 996 हेक्‍टॉपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्याच वेळी केरळजवळ 1002 हेक्‍टॉपास्कल तसेच काश्‍मीरवर 1000 हेक्‍टॉपास्कल इतके हवेचे दाब होणे शक्‍य आहे. संपूर्ण भारतावरील हवेचे दाब आणखी कमी होतील. "मेकुणू' चक्रीवादळाची निर्मितीला 24 मेपासून केरळजवळ प्रारंभ झाला. 27 मेपर्यंत त्याचा चक्रीवादळाचा पसारा थोडा वाढेल. दिनांक 28 मे रोजी वादळी वारे आणि पावसाला केरळ व त्या परिसरात सुरवात होईल. 29 मेपासून वादळ पूर्व किनारपट्टीवर उत्तरेचे दिशेने जाण्यास सुरवात होईल. 29 मे पासून दक्षिण कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होईल. वादळीवारे उत्तरेचे दिशेने झेपावतील. 30 मे रोजी दक्षिण व उत्तर कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊस होईल. त्यानंतर वादळीवारे 31 मे रोजी मुंबईपर्यंत पोचून पाऊस होईल. त्यानंतर 1 व 2 जूनला दक्षिण कोकणात अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. 29 ते 31 मे या काळात संपूर्ण कोकणात दक्षिणेकडून उत्तरेकडे वादळाचा प्रभाव वाढत जाईल. याच काळात उर्वरित महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. परभणी, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, वाशीम, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील.

1) कोकण ः

  • कमाल तापमान ठाणे जिल्ह्यात 38 अंश, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 35 ते 36 अंश, रायगड जिल्ह्यात 37 अंश सेल्सिअस राहील.
  • किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 अंश, रायगड जिल्ह्यात 29 अंश, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड जिल्ह्यात 66 टक्के, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत 70 ते 75 टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 84 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात 28 टक्के, रायगड जिल्ह्यात 48 टक्के, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 52 ते 53 टक्के राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व रायगड जिल्ह्यांत 3 ते 9 कि.मी., सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत 14 कि.मी. ठाणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कोकणात या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता आहे.
  • 2) उत्तर महाराष्ट्र ः

  • कमाल तापमान धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत 44 अंश, नाशिक जिल्ह्यात 39 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात 24 अंश, नंदुरबार जिल्ह्यात 26 अंश, धुळे व जळगाव जिल्ह्यांत 27 ते 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव व धुळे जिल्ह्यांत 48 ते 56 टक्के, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यांत 62 ते 77 टक्के राहील. दुपारची आर्द्रता नाशिक जिल्ह्यात 28 टक्के, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत 9 ते 11 टक्के राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात 16 कि.मी. व उर्वरित जिल्ह्यांत 21 ते 27 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
  • 3) मराठवाडा ः

  • कमाल तापमान नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत 46 अंश, परभणी जिल्ह्यात 45 अंश, उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत 44 अंश, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत 43 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत 30 अंश, परभणी जिल्ह्यात 29 अंश, लातूर जिल्ह्यात 26 अंश, औरंगाबाद जिल्ह्यांत 25 अंश, बीड व जालना जिल्ह्यांत 24 अंश, उस्मानाबाद जिल्ह्यात 22 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता जालना जिल्ह्यात 69 टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात 42 टक्के, उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत 30 ते 39 टक्के राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत मात्र सकाळची सापेक्ष आर्द्रता 27 टक्के इतकी कमी राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता 9 ते 11 टक्के, जालना जिल्ह्यांत 19 टक्के इतकी कमी राहिल्यामुळे हवामान कोरडे राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग परभणी व हिंगोली जिल्ह्यांत 29 कि.मी., तर जालना जिल्ह्यात 34 कि.मी., बीड जिल्ह्यात 31 कि.मी., औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत 21 ते 23 कि.मी., लातूर व नांदेड जिल्ह्यांत 12 ते 14 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
  • 4) पश्‍चिम विदर्भ ः

  • कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात 45 अंश, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 46 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात 31 अंश, तर उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत 30 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात 55 टक्के, अकोला जिल्ह्यात 40 टक्के, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत 35 ते 37 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 18 टक्के इतकी कमी राहिल्याने हवामान कोरडे राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग अकोला जिल्ह्यात 22 कि.मी., वाशीम जिल्ह्यात 20 कि.मी., अमरावती जिल्ह्यात 18 कि.मी. आणि बुलडाणा जिल्ह्यात 10 कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.
  • 5) मध्य विदर्भ ः

  • कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात 47 अंश, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत 46 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान या सर्वच जिल्ह्यांत 30 ते 31 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता 39 ते 42 टक्के राहील, तर दुपारची आर्द्रता 12 ते 15 टक्के राहील. हवामान कोरडे राहील.
  • वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहणार असून, वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात 17 कि.मी.व उर्वरित जिल्ह्यांत 6 ते 10 कि.मी. राहील.
  • 6) पूर्व विदर्भ ः

  • कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात 47 अंश, भंडारा जिल्ह्यात 46 अंश, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत 45 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान 29 ते 31 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात 75 टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत 40 ते 50 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 12 ते 23 टक्के राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग 5 ते 8 कि.मी. राहील व वाऱ्याची दिशा भंडारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
  • 7) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः

  • कमाल तापमान सोलापूर व नगर जिल्ह्यात 43 अंश, पुणे जिल्ह्यात 41 अंश, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यात 37 ते 39 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत 24 ते 27 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
  • सकाळची सापेक्ष आर्द्रता सातारा जिल्ह्यांत 81 टक्के, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 63 टक्के, नगर जिल्ह्यांत 68 टक्के, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत 48 ते 51 टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत 31 ते 33 टक्के, सांगली जिल्ह्यात 21 टक्के, सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत 11 ते 16 टक्के राहील.
  • वाऱ्याचा ताशी वेग नगर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत 24 ते 28 कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यांत 11 ते 18 कि.मी. राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.
  • कृषी सल्ला ः 1) कोकणात वादळी वारे व पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन पाड लागलेले आंब उतरवून सुरक्षित स्थळी ठेवावेत. 2) कोकणातील तयार असलेला भाजीपाला काढणी करून बाजारात विक्रीसाठी पाठवावा. 3) उन्हाळी भुईमुगाची व मुगाची काढणी योग्य वेळी करून माल सुरक्षित स्थळी साठवावा. तसेच पावसाची शक्‍यता असल्याने उन्हात वाळत घातलेले धान्य सुरक्षित स्थळी हलवावे. 4) पूर्वमशागतीच्या कामांना वेग द्यावा. 5) जमिनीचे सपाटीकरण व बांधबंदिस्तीची कामे करावीत. 6) हळद व आले लागवड पूर्ण करावी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com