आठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता

हवामान सल्ला
हवामान सल्ला

महाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यावर तसेच मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रावर राहील. त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज आहे. ईशान्य पूर्वभागावर १०१० इतका अधिक हवेचा दाब आणि राजस्थानवर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही हा पाऊस होईल. २३ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने सरकून महाराष्ट्राच्या मध्यापासून दक्षिण भागावरील हवेच्या दाबात वाढ होईल आणि तो १००८ हेप्टापास्कल इतका वाढेल. आणि पावसाचे प्रमाण दक्षिण महाराष्ट्रात कमी होईल. २४ सप्टेंबर रोजी हवेचे दाब वाढतील आणि पूर्व गुजरातचा भाग वगळता महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब वाढून पावसात पूर्णपणे उघडीप जाणवेल. मात्र ईशान्य बाजूस वाढलेला हवेचा दाब कायम राहील. २५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील आणि पावसात उघडीप राहील. त्यामुळेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात २४, २५ व २६ सप्टेंबर रोजी पावसात उघडीप राहील. २६ सप्टेंबरपर्यंत हवेचे दाब अधिक राहण्यामुळे पावसात उघडीप राहील. २७, २८ व २९ सप्टेंबर रोजी कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात पाऊस होईल. २२ सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारी भागात निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडून गुजरातच्या पश्‍चिमी भागाकडे सरकेल आणि त्यामुळेच गुजरातमध्येही २३ व २४ सप्टेंबरला पाऊस होईल. या आठवड्यात ईशान्य माॅन्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास आणखी काही कालावधी लागेल. त्यामुळे या आठवड्यात वाऱ्याची दिशाही त्यास तितकी अनुकूल नाही. मात्र काही काळ पाऊस व उघडीप राहील. कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात ३० मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात २० मिलीमीटर व ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १४ मिलिमीटर काही दिवशी पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण कोकणात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० किलोमीटर राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६६ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ५ मिलिमीटर, धुळे जिल्ह्यात ४ मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात ९ मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १९ किलोमीटर राहील. धुळे जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर, जळगाव जिल्ह्यात ताशी १४ किलोमीटर व नंदूरबार जिल्ह्यात ताशी ९ किलोमीटर राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सअस राहील. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ४० ते ४३ अंश सेल्सिअस राहील. जळगाव व नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५१ टक्के राहील. मराठवाडा परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३ ते ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उर्वरित जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किलोमीटर राहील. जालना व बीड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील. उर्वरित जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १२ किलोमीटर राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३१ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना व लातूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित नांदेड जिल्ह्यात २४ अंश लातूर व हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस आणि उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४४ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ पश्‍चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून अमरावती जिल्ह्यात १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किलोमीटर राहील. वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८०ते ८४ टक्के राहील. मध्य विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी २७ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून नागपूर व वर्धा जिल्ह्यांत १३ ते १४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता काही दिवशी आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमटीर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९४ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६० टक्के राहील. पूर्व विदर्भ भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत १३ ते १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ ते ९७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६७ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात काही दिवशी ४५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सातारा व सांगली जिल्ह्यांत २५ ते २८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. पुणे जिल्ह्यात काही दिवशी २० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून सोलापूर व नगर जिल्ह्यांत १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर व सांगली जिल्ह्यांत १३ ते १४ किलोमीटर राहील. सातारा व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० किलोमीटर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ११ किलोमीटर राहील व पुणे जिल्ह्यात तो ताशी ९ किलोमीटर राहील. नगर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ते २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ६६ टक्के राहील. कृषी सल्ला

  • सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या ठिकाणी ६५ मिलिमीटरपर्यंत जमिनीत ओलावा झाला आहे. तेथे करडई व रब्बी ज्वारीची पेरणी करावी. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाल्यास करडई पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच रब्बी ज्वारीची पेरणी या कालावधीत झाल्यास उत्पादन अधिक मिळते.
  • रब्बी हंगामात फळभाज्यांची लागवड करावयाची असल्यास टोमॅटो, वांगी यांची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बियाणे पेरावे. पेरणी पूर्वी बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • पूर्व हंगामी ऊसाची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरट करावी.
  • (ज्‍येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com