agricultural stories in Marathi, agrowon, white grub control | Agrowon

हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
डॉ. दा. स. पोखरकर, डॉ. पं. वि. पाटील
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यामध्ये खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी इ. पीक, तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशा पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यामध्ये हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळतात.

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यामध्ये खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी इ. पीक, तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशा पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यामध्ये हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळतात.

 •  होलोट्रिकीया सेराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नांदेड, बुलढाणा, नगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यात दिसून येतो.
 •  ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्हाच्या पश्चिम भागात दिसून येतो.
 •  हुमणी किडीच्या प्रादुर्भावावरून तिचे नदी काठावरील व माळरान भागातील अशा दोन गटात वर्गीकरण करता येते. नदीकाठी आढळणारी हुमणी ल्युकोफोलीस जातीची असून, नदीकाठापासून दूर म्हणजेच माळ भागात आढळणारी हुमणी ही होलोट्रोकीया या जातीची आहे.
 •  बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भावही वाढत आहे.

 जीवनक्रम
 अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते. संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी आहे.

नियंत्रणाचे उपाय
 हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

अ) भुंगेऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त
 पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. राॅकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.
 
ब) हुमणी अळीचा बंदोबस्त  

 •  पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन राॅकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
 •  आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात.
 •  पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतील.
 •  हुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांचे रोपे उपटावीत. मुळांशेजारील अळ्यांचा नाश करावा.

क) जैविक नियंत्रण

 •  हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत.
 •  पक्षी : बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी त्यांचा फडशा पाडतात.
 •  प्राणी : मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
 •  जिवाणू (बॅसीलस पाॅपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.
 •  मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक २० किलो/हेक्टरी या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून बुंध्यापाशी द्यावी. त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.  

ड) रासायनिक नियंत्रण
 कीटकनाशक हे बुंध्याभोवती जमिनीत मिसळून, पिकांस हलके पाणी द्यावे.

पीक........कीटकनाशक........मात्रा
ऊस........फिप्रोनील (०.३ टक्के दाणेदार)........३३ किलो हेक्टर किंवा
ऊस........फिप्रोनील (०.३ टक्के) + इमिडाक्लोप्रीड (४० टक्के डब्ल्यू.जी.)........प्रती हेक्टर ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यात मिसळून नोझल काढलेल्या पंपाने ऊस लागवडीमध्ये ओळीत सोडावे. (ड्रेंचिंग)

डॉ. दा. स. पोखरकर, ९९२३७३५००२
डॉ. पं. वि. पाटील, ७५८८९२११९६

(डॉ. पोखरकर हे कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख असून, डॉ. पाटील हे संशोधन सहयोगी (क्राॅपसॅप), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...