agricultural stories in marathi, agrowon, working of micronutrients | Agrowon

सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या वापराचे शास्त्र समजून घ्या...
ज्योती सहाणे, पूजा राऊत, अश्विनी सहाणे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती जमिनीतून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या वापराचे शास्त्र समजून घेण्याची आवश्यकता वाढत आहे.

पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती जमिनीतून पोषक घटकांची उचल अधिक प्रमाणात करतात. परिणामी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या वापराचे शास्त्र समजून घेण्याची आवश्यकता वाढत आहे.

आधुनिक शेतीमध्ये नवनवीन बियाणे, नवीन खते, द्रवरूप खतांचा ठिबक सिंचनातून वापर आता नियमित होत आहे. जमिनीतील पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊन, त्याच्या कमतरता पिकांमध्ये आणि सजीवामध्ये दिसू लागल्या आहेत. मातीच्या परीक्षणानंतर संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होण्याची आवश्यकता आहे. त्यातून जमिनीतील शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांचा पुरवठा भरून निघतो. मात्र, अलीकडील काळामध्ये दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांतील एखादा घटकही कमी असल्यास त्याचे विपरीत परीणाम अन्य अन्नद्रव्यांच्या शोषणामध्ये होतात. एकूणच पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

उदा. लोह हे पोषक द्रव्य चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. बोरॉनची कमतरता हलक्या, उथळ आणि वालुकामय जमिनीत तसेच तांबड्या-लाल जमिनीतदेखील दिसते. प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याची कार्यपद्धती आणि पिकांच्या वाढीमध्ये त्याचे नेमके कार्य याविषयी माहिती घेऊ.

जस्त ः

 • सूक्ष्म अन्नद्रव्याच्या समूहातील सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य म्हणजे जस्त. अलीकडे या अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे.
 • चिकणमातीयुक्त भारी जमिनीमध्ये जस्ताची उपलब्धता अधिक असते, तर हलक्या, उथळ, वालुकामय जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते.
 • जस्त अन्नद्रव्याला चांगला प्रतिसाद देणारी पिके ः मका, भात, ज्वारी, संत्रावर्गीय फळझाडे आणि कांदा इ.
 • या अन्नद्रव्याला कमी प्रतिसाद देणारी पिके ः ओट, मुळा, विविध प्रकारचे गवत आणि चारा, कोबी आणि वाटाणा.
 • विविध पिकांसाठी शिफारस ः जस्त सल्फेट २० ते २५ किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावे. जस्त सल्फेट ( znso४, ७H२o=२३% Znso४, H२०=३५% ), तर जस्त चिलेटेट खते ( Na२ZnEDTA=१४%) उपलब्ध आहेत.
 • जस्त हे जलयुक्त वर्गात मोडत असून, चिकन-मातीवर घट्ट बसण्याची क्षमता देखील खूपच आहे. म्हणून जस्तयुक्त खताची मात्रा केवळ पहिल्या पिकासच लागू न होता त्याचे शेष परिणाम २-३ वर्षापर्यंत पिकांवर थोड्याबहुत प्रमाणात होतात.
 • झिंकटेड युरिया, झिंकटेड सुफला आणि झिंकटेड सुपर फॉस्फेटसारखी नवी खते बनविण्यास सुरवात झाली आहे.

वनस्पतीतील जस्ताचे कार्य ः
जस्त हे अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण, हरितद्रव्य संश्लेषण आणि प्रथिनांची निर्मिती घडून आणण्यात सहभागी असते. संप्रेरकाची निर्मिती पिकांमध्ये असलेल्या जस्ताच्या प्रमाणावर अवलंबून असते. वाढबिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.

कमतरतेची लक्षणे ः जस्ताच्या कमतरतेमुळे पिकांच्या हिरव्या कोवळ्या पानांमध्ये तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पेरांची वाढ बरोबर होत नाही. परिणामी पात्यांचा आकार बदलतो. शिरा स्पष्ट पिवळ्या पडतात. कांड्या-कांड्यातील अंतर कमी होऊन उंची कमी होते. फूल आणि फलधारणा कमी होते.

 लोह

 • भारतीय जमिनीमध्ये एकूण लोहद्रव्याचे प्रमाण २०,००० ते १,००,००० मिलिग्रॅम प्रति किलो माती इतके आहे. मात्र, उपलब्ध लोहाचे प्रमाण अतिशय कमी आहे. उपलब्ध लोहाचे प्रमाण हे जमिनीच्या मूलभूत गुणधर्मांवर अवलंबून असते.
 • फेरोमॅग्नेशिअम खनिजे म्हणजे लोहाचे मूलस्रोत होय. चिकणमातीयुक्त जमिनीत ही खनिजे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. परिणामी एकूण लोहसाठा अधिक दिसून येतो. मात्र, हे लोह पिकांना उपलब्ध स्वरूपामध्ये नसते. लोहाची गरज चुनखडीयुक्त जमिनी भागवू शकत नाहीत. म्हणून पिकांसाठी लोहयुक्त खतांचा वापर करावा लागतो.
 • लोहयुक्त खते ः फेरस सल्फेट (Feso४,७H२०=१९% लोह) अमोनियम सल्फेट (१४% लोह ), लोह चिलेट ( ५-१४% लोह), अमोनिया पॉली सल्फेट (२२% लोह).
 • लोहयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देणारी पिके ः संत्रावर्गीय फळझाडे, द्राक्षे, फुलझाडे आणि अन्य फळझाडे.
 • लोहयुक्त खते चुनखडीयुक्त जमिनीत वापरल्यास पिकांना लागू होत नाहीत. अशा परिस्थितीत लोहयुक्त खते पिकांना फावारणीतून द्यावीत.
 • जमिनीतून २५ ते ५० किलो प्रति हेक्टर लोह सल्फेटच्या रूपाने देता येते. फळझाडे आणि पिकांना ०.५ ते १.० टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन २-३ वेळा करावी. ही फवारणी जमिनीतून दिलेल्या मात्रेपेक्षा सरस ठरते.

वनस्पतीतील कार्य ः
पिकांच्या हिरव्या पानांचा लोह हा घटक नसला तरी अप्रत्यक्षरीत्या प्रकाश संश्लेषण क्रियेत उत्तेजकाचे कार्य करतो. त्यामुळे हरितद्रव्य तयार होण्यास मदत होते. लोह अनेक विकरांचा (एन्झायम्स) घटक असून, इलेक्ट्रॉन स्थलांतर क्रियेत आणि इतर जीव-रासायानिक क्रियेत भाग घेतो. नत्र स्थिरीकरण प्रक्रियेत लोह मदत करतो. लोहद्रव्याच्या कमतरतेमुळे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण घटते. पिकांमध्ये स्फुरदाचे शोषण अधिक झाले तर लोहाच्या शोषणावर प्रतिकूल परिणाम होतो. लोहाचे चलनवलन अगदीच कमी असल्यामुळे मुळ्यामधून वरच्या अवयवापर्यंत द्रव पोचण्यासाठी उशीर लागतो. म्हणून लोह द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे नवीन कोवळी पाने, उमललेल्या कळ्या यावर लवकर दिसतात.

कमतरतेची लक्षणे ः पिकांची कोवळी पाने पिवळी पडतात. पानातील नसांच्या आतील भाग पिवळा होतो. अधिक कमतरता असल्यास पाने पांढरी आणि जर्जर होतात. पाने, कळ्या व वाढबिंदू गळून पडतात. फुले कमी लागतात. वांझ निर्मिती होते.

मॅंगनीज (मंगल)

 • सर्वसाधारणपणे मॅंगनीजची कमतरता व्यापक प्रमाणावर दिसून येत नाही. साधारणतः वालुकामय, उथळ आणि हलक्या जमिनीमध्ये उपलब्ध मॅंगनीज कमी असतो, तर भारी काळ्या बेसाल्टपासून तयार झालेल्या जमिनीमध्ये एकूण आणि उपलब्ध मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळते. तांबड्या-लाल आम्लधर्मीय जमिनीचा सामू ५ पेक्षा कमी असेल तरी मॅंगनीजची अतिउपलब्धता पिकाच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते.
 • चांगला प्रतिसाद देणारी पिके ः बार्ली, लिंबूवर्गीय फळझाडे, वाटाणा, बटाटा, सोयाबीन आणि गहू
 • वापर ः कमतरता असलेल्या जमिनीत सुमारे २५ किलो प्रति हेक्टरी मॅंगनीज सल्फेट हे अन्नद्रव्य दावे. उभ्या पिकांमध्ये कमतरता दिसल्यास ०.५% तीव्रतेच्या मॅंगनीज सल्फेटच्या द्रावणाची फवारणी देखील उपयुक्त ठरते.
 • मॅंगनीज सल्फेट ( Mnso४,३H२o=२६%) मॅंगनीज चिलेट (१२%) याद्वारे आपण मॅंगनीजचा पुरवठा करू शकतो.

वनस्पतीतील कार्य ः
पिकांच्या जैविक आणि जीवासायनिक प्रक्रियांना मॅंगनीज द्रव्य उत्तेजित करण्याचे कार्य करते. काही विकरामध्ये मॅंगनीज हा प्रथिनांचा एक घटक- सहयोगी म्हणून कार्य करतो. प्रकाश संश्लेषण क्रियमध्ये मॅंगनीज कमतरतेमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होते. याशिवाय ऑडीनोसीन ट्राय फॉस्फेटसारख्या ऊर्जाशक्ती पुरविणाऱ्या पदार्थाच्या निर्माणकार्यात मॅंगनीज आवश्यक असते.

कमतरतेची लक्षणे ः
मॅंगनीजच्या कमतरतेमुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. द्विदल धान्याच्या पानावर शिराच्या मधील भागात पिवळ्या रंगाचे पट्टे दिसतात. साधारणतः मॅंगनीजची कमतरता प्रथम कोवळ्या पानावर दिसते. लिबूवर्गीय फळझाडांच्या पानावर तेलकट डाग दिसतात. ज्वारी व बाजरीवर बुरशी येते.

संपर्क ः ज्योती सहाणे, ९१४६१९११९०
(श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड, संगमनेर, जि. नगर.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...