agricultural stories in Marathi, agrowon,animal husbundry advice | Agrowon

पशू सल्ला
निकिता सोनवणे, डॉ. मनीष सावंत
रविवार, 16 डिसेंबर 2018

शेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा असावा जेणेकरून त्यांना ऊर्जेची कमतरता भासणार नाही. या काळात शेळ्या - मेंढ्यांची वाढ चांगली होत असते आणि वजनवाढीसाठी हा उत्तम ऋतू आहे, कारण हिवाळ्यात ऊर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांचा खुराक वाढतो व त्याचा सकारात्मक परिणाम वजनवाढीवर दिसून येतो. परंतु, जर कमी होणाऱ्या तापमानाकडे लक्ष दिले नाही, तर शेळ्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढू शकते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात शेळ्यांचे विण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे करडांची संख्या या काळात वाढू शकते. कमी तापमानात करडे दगावण्याची शक्यता जास्त असते.

शेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य आहे, यासाठी त्यांचा आहार जास्त ऊर्जा पुरविणारा असावा जेणेकरून त्यांना ऊर्जेची कमतरता भासणार नाही. या काळात शेळ्या - मेंढ्यांची वाढ चांगली होत असते आणि वजनवाढीसाठी हा उत्तम ऋतू आहे, कारण हिवाळ्यात ऊर्जा कायम ठेवण्यासाठी त्यांचा खुराक वाढतो व त्याचा सकारात्मक परिणाम वजनवाढीवर दिसून येतो. परंतु, जर कमी होणाऱ्या तापमानाकडे लक्ष दिले नाही, तर शेळ्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढू शकते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात शेळ्यांचे विण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे करडांची संख्या या काळात वाढू शकते. कमी तापमानात करडे दगावण्याची शक्यता जास्त असते. थंडीमुळे करडांना सर्दी, निमोनिया यासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात करडांकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते.   

कमी तापमानात शेळ्या -मेंढ्यांची काळजी

 • हिवाळ्यात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते. गोठ्यातील जमीन थंड पडते म्हणून गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा जेणेकरून गोठ्यातील तापमान कमी होणार नाही. गोठ्यातील जमिनीत चुनखडीचा किंवा मुरुमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो आणि जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो.
 • शेळ्या व मेंढ्या जेव्हा ओल्या जमिनीच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या शरीराची कातडी बाह्य तापमानानुसार स्वतःचे तापमान बदलते व त्यामुळे शरीराचे काही अवयव जसे की पायांचे खूर किंवा कान यात रक्तप्रवाहाला अडचण येऊ शकते .
 • गोठा नेहमी पूर्व पश्चिम दिशाला असावा. जेणेकरून सूर्यप्रकाश आत येण्यास मदत होईल व हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात तापमान कमी झाल्यावर तापमानाच्या समस्या उद्भवणार नाहीत.
 • थंडीमध्ये रोग लवकर पसरतात कारण आजाराचे जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतूनाशकाने आठवड्यातून २ ते ३ वेळा धुवून घ्यावा. शक्य असल्यास शेड गरम पाण्याने स्वच्छ करावे.
 • दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुली ठेवावीत जेणेकरून हवा खेळती राहील व रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
 • जर शेळ्या- मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल तर, त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादे बंदिस्त शेड जरूर बांधावे. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या व मेंढ्या तेथे जाऊन बसतील व त्यांना थंडीपासून स्वतःचे संरक्षण करता येईल.
 • करडांना शेडमध्ये खाली गवताचे किंवा गोणपाटाचे बेडींग द्यावे ज्यामुळे शरीरात उब टिकून राहील.
 • गोठ्यामध्ये रात्रीच्या वेळी जास्त व्होल्टेज व प्रकाश देणारे विद्युत दिवे लावावेत. कारण असे बल्ब जास्त ऊर्जा निर्माण करतात व त्यामुळे वातावरणातील तापमान वाढते. बल्बची उंची जमिनीपासून ४ ते ५ फूट उंचीवर ठेवावी.
 • बल्ब लावणे शक्य नसल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी व उब निर्माण करावी, परंतु त्याच्या धुराचा शेळ्यांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्यावे, कारण असा धूर श्वासात गेल्यास धोकादायक ठरतो व त्यामुळे न्यूमोनिया सारखे आजार देखील होऊ शकतात.
 • निरोगी शेळ्यांपासून आजारी शेळ्यांना वेगळे करावे. कारण हिवाळ्यात रोग लगेच पसरतात व त्यामुळे मरतूक वाढते.
 • शेळ्या व मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे शेळ्यांना वजनाच्या अर्धा टक्के किंवा १०० ते २५० ग्रॅम खुराक देणे गरजेचे आहे.  
 • शेळ्यांना ओला व सुका चारा दोन्हीही देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते.
 • शेळ्यांना पिण्यासाठी कोमट व स्वच्छ पाणी द्यावे, कारण हिवाळ्यात शेळ्या जास्त पाणी पित नाहीत, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते म्हणून पाणी शक्यतो कोमट करूनच द्यावे.
 • शेळ्या मेंढ्यांना आणि लहान करडांना सकाळच्यावेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातुन उब मिळेल.

 ः निकिता सोनवणे, ९५५२८२०८२८
(पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन विस्तार विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

इतर कृषिपूरक
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...