agricultural stories in Marathi, agrowon,importance of water | Agrowon

समजून घ्या पाण्याचे महत्त्व
डॉ. उमेश मुंडल्ये
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

पाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी योग्य काम करण्याची गरज आहे. हे समजून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. हा गोंधळ दूर व्हावा, वास्तवाबद्दल योग्य जाणीव व्हावी, समस्येचे योग्य, दूरगामी फायदा देणारे शाश्वत उपाय योजले जावेत, यासाठी विचार आणि कृती करायला प्रवृत्त करणे, हा लेखमालेचा उद्देश आहे. या लेखमालेमध्ये आपण टप्याटप्याने जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेणार आहोत.

पाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी योग्य काम करण्याची गरज आहे. हे समजून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. हा गोंधळ दूर व्हावा, वास्तवाबद्दल योग्य जाणीव व्हावी, समस्येचे योग्य, दूरगामी फायदा देणारे शाश्वत उपाय योजले जावेत, यासाठी विचार आणि कृती करायला प्रवृत्त करणे, हा लेखमालेचा उद्देश आहे. या लेखमालेमध्ये आपण टप्याटप्याने जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेणार आहोत.

गेली कित्येक वर्ष आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचतो किंवा पाहतो, अनेक लोक सांगतात की, पाणी वाचवा, पाणी जपून वापरा. आपण ते वाचतो, ऐकतो आणि बरेचदा सोडूनही देतो. जोपर्यंत आपल्या घरी नळाला पाणी येत असते, तोपर्यंत आपण निर्धास्त असतो. हे विशेषतः शहरांत दिसतं. पण एक दिवस पाणी पुरवठा बंद झाला की, आपल्यापैकी बरेच जण लगेच अस्वस्थ होतात? सरकारच्या नावाने खडे फोडतात. साधा पाइपलाइनमध्ये बिघाड असला तरी आधी नळ आणि लगेच लोकांच्या तोंडचे पाणी पळते. पण तेही तात्पुरतं. पुरवठा परत सुरू झाला की आपण पाणीटंचाई लगेच विसरूनही जातो. हे एवढं सार्वत्रिक आणि जुनं आहे की “तहान लागली की विहीर खणणे” ही म्हण देखील माणसाच्या याच प्रवृत्तीवर तयार झाली असणार.

वाढता पाणी प्रश्न ः

सध्याच्या काळात कुठेही पाहिलं तरी पाणीटंचाई दिसते. मग ते शहर असो की खेडं. पाण्याचा प्रश्न सगळीकडेच आहे. शहरात तो पटकन दिसतो, कारण लोकसंख्या एका जागी केंद्रित झाली आहे. पाण्याची गरज आणि आवश्यकता रोज जाणवत असल्याने तो सर्वत्र जिव्हाळ्याचा विषय होतो. त्यामुळे अनेकदा, बहुसंख्य लोकांमध्ये बुद्धीपेक्षा भावना जास्त प्रबळ ठरते आणि आणखी गोंधळ निर्माण होतो. आणखी एक गोंधळ निर्माण करणारी बाब म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये असलेले गैरसमज. क्रिकेट, राजकारण, पाणी, पर्यावरण आणि शेती या विषयांमध्ये सगळ्यांना सगळं कळतं, या गैरसमजामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि आहेत त्या क्लिष्ट झाल्या आहेत.

पाण्याचे जैव विविधतेच्यादृष्टीने महत्त्व ः

१) जगातील सर्वात मौल्यवान पदार्थ म्हणजे पाणी. पृथ्वीवर जीवन सुरू झालं ते पाण्यापासूनच, मग ते प्राणी असोत किंवा वनस्पती. पाणी हा जीवनासाठी आवश्यक घटक.
२) पृथ्वीवर पाणी आणि तेही गोड पाणी नसतं तर जीवसृष्टी अस्तित्त्वात आली नसती. पृथ्वीच्या साधारण ७२ टक्के भागात पाणी आहे. मानवी शरीराच्या दृष्टीने, अन्नपचन आणि इतर सर्वच शारीरिक चयापचय क्रियांमध्ये पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. सर्व पेशी आणि अवयवांचं कार्य नीट चालू राहावं यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी असणे अत्यावश्यक बाब आहे.
३) पाणी हे जसं शरीराला आवश्यक गोष्टी वेगवेगळ्या अवयवांपर्यंत पोचवायला आवश्यक असते. तसंच ते शरीरातील टाकाऊ गोष्टी बाहेर टाकण्यासाठीही खूप आवश्यक असते. त्यामुळे, पाण्याची कमतरता किंवा अनुपलब्धता कोणत्याही जीवाला हानिकारक असते. म्हणून पाण्याला जीवन म्हटले जाते.
४) पाणी हा पृथ्वीवरचा असा एकमेव पदार्थ आहे की, जो सगळीकडे सर्वसाधारणपणे नेहमीच्या तापमानात द्रव स्थितीत मिळतो. पाणी हे उत्तम द्रावक आहे. त्यामुळे जीवनाला आवश्यक बरीचशी द्रव्ये त्यात विरघळतात. पृथ्वीवरील सर्वच जीवांना जगण्यासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. वनस्पती आणि प्राणीसृष्टी या दोन्ही वर्गांना पाणी अनिवार्य आहे.
५) आपल्या आजूबाजूचा परिसर आणि सर्व सृष्टी हिरवीगार ठेवण्यासाठी पाणी हा अत्यावश्यक घटक आहे. पाणी नसेल किंवा कमी असेल तर या हिरवाईवर वाईट परिणाम होतो आणि प्रदूषण वाढून त्याचा सर्व जीवसृष्टीला धोका तयार होतो.
६) जीवसृष्टीचा एक मोठा घटक समुद्राच्या पाण्यात आहे. आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी केवळ समुद्राच्या पाण्यात अंदाजे २,२०,००० जीव शोधून काढलेत. यामध्ये समुद्रातील वनस्पतीसृष्टी धरलेली नाही. अजूनही सुमारे ९० लाख सजीव समुद्रात आहेत ज्यांची ओळख अजून पटलेली नाही.
७) पाणी आहे म्हणून शेती आहे, जंगल आहे. ते आहे म्हणून मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी यांना अन्न आहे, पाणी आहे, दूध आणि इतर पदार्थ आहेत, मासे आणि इतर गोष्टी आहेत.

पाण्याचे स्राेत, उपलब्धता आणि वास्तव ः

जगात आढळणारे पाणी हे तीन रूपात आढळते.
वायू ः ढग, धुके आणि वाफ.
द्रव ः पाऊस, झरे, ओढे, नद्या, तलाव, धरण, पाणथळ जागा, खाडी, समुद्र.
घन ः हिमवृष्टी, हिमनग, गोठलेले पाणी.

पाण्याचे स्राेत ः

झरे ः हे सर्वात जुने स्राेत आहेत. पूर्वी माणूस फक्त हाच स्राेत वापरत असे.
तलाव ः हे बहुतांश मानवनिर्मित असतात. पावसाचे पाणी साठवून ते वर्षभर वापरता यावे म्हणून मानवाने तलावांची निर्मिती केली.
नद्या ः माती संपृक्त झाल्यामुळे किंवा खाली कठीण दगड असल्यामुळे पाणी जमिनीत न मुरता, पृष्ठभागावरून उताराच्या दिशेने वहायला लागते तेव्हा ओढा, नाला, नदी यांची निर्मिती होते. हे पाणी वाहते असेल आणि माणसाने प्रदूषित केलं नसेल तर पिण्यायोग्य असते. जिथे पाणी मुबलक होते तेथे मानवी संस्कृती समृद्ध झाली. म्हणूनच, नद्यांच्या खोऱ्यांमध्ये संस्कृती फुलल्या.
समुद्र आणि महासागर ः जरी हे पाण्याचे मोठे स्राेत असले तरी क्षारयुक्त पाण्यामुळे याचा आपल्याला थेट उपयोग होत नाही. परंतु, पृथ्वीवरील जलचक्र सुरळीत राहण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. तसंच, पृथ्वीचं तापमान कायम राखण्यासाठीही समुद्र, महासागर उपयुक्त आहेत.

संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०
( लेखक जल-मृद संधारणातील अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...