agricultural stories in Marathi, agrowon,inter culturing operations in rabbi crops | Agrowon

ज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर मशागत
डॉ. आदिनाथ ताकटे
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई आणि सूर्यफूल ही पिके घेतली जातात. कोरडवाहू क्षेत्रामध्ये उपलब्ध ओलावा टिकवण्याच्या उद्देशाने आंतरमशागत योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्याचा उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.

रब्बी ज्वारी

रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई आणि सूर्यफूल ही पिके घेतली जातात. कोरडवाहू क्षेत्रामध्ये उपलब्ध ओलावा टिकवण्याच्या उद्देशाने आंतरमशागत योग्य पद्धतीने केली पाहिजे. त्याचा उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.

रब्बी ज्वारी

  • पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी.
  • पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत.
  • जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी ज्वारीच्या पिकाला तीन कोळपण्या द्याव्यात. पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली, पाचव्या आठवड्यात दुसरी; तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी. त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषतः शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे.
  • तणांच्या उपद्रवानुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हेक्टरी पाच टन काडीकचरा/धसकटे, सरमाड पिकाच्या दोन ओळीत पसरावे. या आच्छादनामुळे जमिनीत ओल चांगली टिकून राहण्यास मदत होते.

हरभरा

  • पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत. दाट पेरणी झाली असल्यास विरळणी करून दोन रोपांतील अंतर १० सें.मी ठेवावे.
  • पेरणीपासून चार आठवड्यांच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी देणे आवश्यक आहे. परिणामी, तणांचा नायनाट होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते.
  • रासायनिक तणनियंत्रणासाठी, पेरणी करताना वापशावर पेंडीमेथिलीन हे तणनाशक २.५ लिटर प्रतिहेक्टर प्रमाणे ५०० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

करडई
या पिकाची विरळणी उगवणीनंतर १० दिवसांनी किंवा पेरणीपासून २० दिवसांनी करावी. मध्यम जमिनीत दोन रोपांत साधारणतः २० सें.मी., तर भारी जमिनीत ३० सें.मी. ठेवावे. जरुरीप्रमाणे एखादी निंदणी करावी. दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे. पहिली कोळपणी ३ ऱ्या आठवड्यात फ्तीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासच्या कोळप्याने व तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

सूर्यफूल
पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे. विरळणी करताना मध्यम जमिनीत २० सें.मी, तर भारी जमिनीत ३० सें.मी अंतर ठेवावे.
पिकास १५ दिवसांच्या अंतराने एक–दोन कोळपण्या, तसेच एक खुरपणी देऊन शेत तणविरहित ठेवावे.
दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाच्या पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यास हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
रब्बी पिकांमध्ये वरीलप्रमाणे योग्य वेळी आंतरमशागत करावी. तणांचे नियंत्रणासह जमिनीतील हवा खेळती राहते. उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो, परिणामी उत्पादनात भरीव वाढ होते.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
०२४२६-२४३३३८
(प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे ), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...