मोसंबीसाठी फळपीक विमा योजना

मोसंबीसाठी फळपीक विमा योजना
मोसंबीसाठी फळपीक विमा योजना

मोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, जालना, उस्मानाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड, बीड, नगर, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव या 15 जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यातील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते.

सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पाअंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल. मोसंबी पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमासंरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्‍यामुळे होणाऱ्या संभाव्य पीकनुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमासंरक्षण प्रदान होईल.  

विमासंरक्षण प्रकार (हवामान धोके)  व विमासंरक्षण कालावधी    प्रमाणके (ट्रगर) व नुकसानभरपाई रक्कम (प्रतिहेक्टर रु.) खालील प्रमाणे अवेळी पाऊस (दि. १ नोव्हेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ ) ः

  •  सलग ४ दिवस एकूण ३० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. ११,७०० देय होईल.
  •  सलग ५ दिवसांत एकूण ३५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसानभरपाई रु. १८,७०० देय होईल.
  •  सलग ६ दिवसांत एकूण ४० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस राहिल्यास नुकसानभरपाई रु. २३,३०० देय होईल.
  •  कमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.
  • जास्त तापमान (दि. १ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१८  ) ः

    सलग ३ दिवसांत दैनंदिन तापमान ३९ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास खालीलप्रमाणे नुकसानभरपाई रक्कम देय होईल.

    1.  सलग ३ दिवस रु. ४,६०० देय
    2.  सलग ४ दिवस रु. ९,३०० देय
    3.  सलग ५ दिवस रु. १४,००० देय
    4.  सलग ६ दिवस रु. १८,७०० देय
    5.  सलग ७ दिवस रु. २३,४०० देय     कमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.

    जास्त पाऊस ( दि. १५ ऑगस्ट २०१८ ते १५ सप्टेंबर २०१८) ः 

  • सलग ७ दिवसात १५० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. ८,७५० देय होईल.
  • सलग ७ दिवसात १७५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. १४,६०० देय होईल.
  • सलग ७ दिवसांत २०० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास नुकसानभरपाई रु. २३,३०० देय होईल.
  • कमाल नुकसानभरपाई रक्कम रु. २३,३०० देय होईल.
  • एकूण नियमित विमासंरक्षण रक्कम प्रतिहेक्‍टरी 

  • 70,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 3500 रुपये
  • गारपीटपासून विमासंरक्षण कालावधी दि. 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018
  • प्रतिहेक्‍टर विमासंरक्षण रक्कम ः 23,300 रुपये
  • आणि शेतकऱ्यासाठी विमा हप्ता ः 1,165 रुपये
  • शेतकऱ्याने गारपिटीमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासांत माहिती संबंधित विमा कंपनी/ संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांना कळविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विमा कंपनी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्‍चित करेल.
  • योजनेतील सहभाग ः

  • मोसंबीसाठी पीककर्ज घेतले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्‍यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
  • फळपिकाखालील किमान 20 हेक्‍टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्‍यक असते.
  • विमा कंपनीचे नाव ः  जिल्हे एचडीएफसी - ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी   ः   परभणी, हिंगोली, नागपूर, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद इफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ः  वर्धा, जालना, पुणे बजाज अलयांज जनरल इन्शुरन्स कंपनी   ः बुलडाणा, औरंगाबाद, नगर, अमरावती, नांदेड, बीड

    टीप ः या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससीमार्फत ऑनलाइन अर्ज भरावेत. सोबत 7-12, आधार कार्ड, बॅंक खाते तपशील आवश्‍यक आहे. भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 31 ऑक्‍टोबर 2017. संपर्कः अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग. संकेतस्थळ ः www.krishi. maharashtra.gov.in संपर्क ः विनयकुमार आवटे ः 9404963870 (अधीक्षक कृषि अधिकारी, पुणे विभाग)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com