agricultural stories in marathi, crop advice | Agrowon

रब्बी हंगाम कृषी सल्ला
डॉ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत, डॉ.एस. जी. पुरी
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

रब्बी हंगामातील पिकांना तणनियंत्रणासाठी कोळपणी, आवश्‍यकतेनुसार सिंचन व पीकसंरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी सिंचन व वेळेवर काढणी याबाबत व्यवस्थापनावर भर द्यावा.

रब्बी ज्वारी :

रब्बी हंगामातील पिकांना तणनियंत्रणासाठी कोळपणी, आवश्‍यकतेनुसार सिंचन व पीकसंरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनवाढीसाठी सिंचन व वेळेवर काढणी याबाबत व्यवस्थापनावर भर द्यावा.

रब्बी ज्वारी :

 • रब्बी ज्वारीची पेरणी (बागायती) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केली असेल आणि नत्राचा हप्ता दिला नसेल, तर प्रति हेक्टरी ४० किलो नत्र युरियाद्वारे पेरणीच्या एक महिन्यानंतर द्यावे.
 • उशिरा पेरलेल्या ज्वारीच्या पिकात निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
 • बागायती जमिनीतील ओल कमी झाली असल्यास पीक पोटरीच्या अवस्थेत असताना पिकास पाणी द्यावे.
 • रसशोषक किडींमुळे ज्वारीच्या पिकावर चिकटा येण्याची शक्यता आहे.
 • या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  डायमेथोएट १ मि.लि.
 • काही ठिकाणी खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी शिफारशीप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.  
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
 • पाण्याचा ताण पडल्यास केओलीन ६ टक्के (६० ग्रॅम प्रतिलिटर) किंवा पोटॅशिअम नायट्रेट १.५ टक्क्याची (१५ ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी.शक्य असल्यास आच्छादन करावे.

करडई :

 • करडई पिकाची निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचा बंदोबस्त करावा.
 • करडई पिकाच्या जमिनीतील ओलावा कमी झाला असल्यास पाणी द्यावे. पीक एक फुलावर असताना एक सरी आड हलके पाणी द्यावे.
 • पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी अॅसिफेट (७५ टक्के) १.५ ग्रॅम किंवा डायमेथाेएट १.३ मि.लि.
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी मॅन्कोझेब २.५ ग्रॅम

हरभरा :

 • हरभरा पिकाची निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
 • बागायती हरभरा पीक फुलोऱ्यात असताना व घाटे भरते वेळी पिकास हलके पाणी द्यावे. तसेच पिकांत जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
 • पिकावर अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी    इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा क्विनाॅलफॉस (२५ ई.सी.) २ मि.लि.
 • शक्यतो एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. अळीच्या नियंत्रणासाठी पक्षीथांबे हेक्टरी ५० व कामगंध सापळे हेक्टरी ५ या प्रमाणे शेतात बसवावे.
  फवारणी प्रति लिटर
  निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (३००० पीपीएम) ५ मि.लि.

कापूस :
कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे डिसेंबरपूर्वी वेचणी पूर्ण करावी. खोडवा पीक घेणे टाळावे. पिकांचा पालापाचोळा व इतर अवशेषांचा (उदा. पऱ्हाट्या) लवकरात लवकर शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी.

तूर :
बी.एस.एम.आर-८५३, बी.एस.एम.आर-७३६ या जास्त कालावधीच्या तुरींना फुलोऱ्यात असताना एक पाण्याची पाळी द्यावी. तसेच शेंगांमध्ये दाणे भरतेवेळी एक पाण्याची पाळी द्यावी. या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी दिल्याने  उत्पादनामध्ये चांगली वाढ होते.
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
१) निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझाडिरॅक्टीन (३००० पीपीएम) ५ मि.लि.
२) रासायनिक नियंत्रणासाठी, इमामेक्टीन बेन्झोएट ०.४ मि.लि.
या अवस्थेत शेंगमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे फवारणी करावी.

रब्बी सूर्यफूल :

 • सूर्यफूल पिकाची निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचा बंदोबस्त करावा.
 • सूर्यफूल पेरणीनंतर एक महिन्याने प्रति हेक्टरी ३० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
 • पिकास बोंड लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या पाळ्या चुकवू नयेत.
 • केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास अंडीपुंज व अळ्यांसहित पाने तोडून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवावीत.
 • केसाळ अळी नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
 • सायपरमेथ्रीन (१० टक्के) ०.९ मि.ली. किंवा क्विनालफॉस २ मि.ली.
 • पानावरील काळे ठिपके (अल्टरनेरिया) हा रोग आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
  मॅन्कोझेब २.५ ग्रॅम.

 ः डी. डी. पटाईत, ०२४५२-२२९०००
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...