agricultural stories in marathi, crop advice, KOKAN REGION | Agrowon

कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारी, कलिंगड
डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप, वीरेश चव्हाण
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

सद्यस्थितीचा विचार करता पिकानिहाय खालील प्रकारे नियोजन करावे. 

भात
अवस्था-परिपक्वता
तयार झालेल्या भातपिकाची सकाळी कापणी करून घ्यावी. त्याची लगेच मळणी करावी. भात उन्हामध्ये चांगले वाळवणे.

आंबा

सद्यस्थितीचा विचार करता पिकानिहाय खालील प्रकारे नियोजन करावे. 

भात
अवस्था-परिपक्वता
तयार झालेल्या भातपिकाची सकाळी कापणी करून घ्यावी. त्याची लगेच मळणी करावी. भात उन्हामध्ये चांगले वाळवणे.

आंबा

 • फांदेमर रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून घ्यावे. त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइडची पेस्ट लावावी.
 • आंब्यावरील फांदेमर रोगाच्या नियंत्रणासाठी,
  फवारणी प्रतिलिटर पाणी
  कॉपर ऑक्‍सीक्‍लोराइड ३ ग्रॅम.
 • आंब्यामध्ये रोगट व सुकलेल्या फांद्या, बांडगुळे कापून घ्यावीत. त्या ठिकाणी १ टक्का बोर्डो मिश्रण लावावे.
 • आंबा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे.
  नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
  डेल्टामेथ्रिन (२.६ ईसी) ०.९ मि.ली.
  टीप -फवारणी खोडावर, फांद्यांवर व बागेच्या आजूबाजूच्या रायवळ आंब्यांनासुद्धा करावी.

काजू
काजूवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर पाणी
लॅंबडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के) ०.६ मि.ली.

नारळ/सुपारी

 • नारळाच्या कोंबकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी कुजलेला कोंब साफ करून घ्यावा. त्यामध्ये १ टक्का बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून ओतावे.
 • नारळावरील गेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी, बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यात दर दोन महिन्यांनी शिफारशीत कीडनाशकाचे द्रावण फवारावे.
 • नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी,
 • खोडावर १ मीटर उंचीवर गिरमिटाच्या साहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे छिद्र पाडून, त्यामध्ये २० मिली क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २० मिली नरसाळ्याच्या साहाय्याने ओतावे. छिद्र बंद करून घ्यावे.

भाजीपाला लागवड
रब्बी हंगामासाठी टोमॅटो, वांगी व मिरची यांची रोपे तयार करावीत. रोपांचे जीवाणूजन्य मर या रोगांपासून संरक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर कॉपर ऑक्सिक्‍लोराइड २ ते २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, तसेच वाफ्याच्या बाजूने मुंग्यांच्या बंदोबस्तासाठी शिफारशीत कीडनाशकाचा वापर करावा. पेरणीपूर्वी ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

कलिंगड   
कलिंगडाची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून कुळवून तयार करावी. लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर पाट किंवा सऱ्या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूंस ९० सें.मी. अंतरावर ३० x ३० x ३० सें.मी. आकाराचे खड्डे करून त्यात १ ते १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत व कार्बारील (१० टक्के पावडर) १० ग्रॅम याप्रमाणे मिसळून खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात ३-४ बिया एकमेकांपासून ४-५ सें.मी. अंतरावर व २ ते २.५ सें.मी. खोलीवर लावाव्यात. रुजवा झाल्यानंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी २ चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाला प्रतिहेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याची मात्रा द्यावी. स्फुरद आणि पालाश याची संपूर्ण मात्रा व नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा सम प्रमाणात विभागून १ व २ महिन्यांनी लागवडीनंतर द्यावी.

संपर्क ः
: डॉ. सुभाष चव्हाण, ९४२२४३१०६७
: डॉ. ज्ञानेश्‍वर जगताप, ९४०३९८८१४३
: प्रा. विरेश चव्हाण, ९४२२०६५३४४

(कृषिविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...