जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
कृषी सल्ला
पानाफुलांची जाळी करणाऱ्या अळ्या पाने, फूलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ तयार करतात. त्यात लपून पाने, फूलकळ्या आणि शेंगा खातात. त्यामुळे मोठे नुकसान होते.
पानाफुलांची जाळी करणारी अळी
किडीचे सामाईक नाव ः मरुका
इंग्रजी नाव ः Spotted pod borer
शास्त्रीय नाव ः Maruca Vitrata
नुकसानाचे प्रकार ः
- पीक फुलोऱ्यापासून या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
- कमी कालावधीत येणाऱ्या जाती, जास्त आर्द्रता व मध्यम तापमान असलेल्या भागात किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
- अळ्या पाने, फूलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ तयार करून त्यात लपून बसतात. त्या पाने, फूलकळ्या आणि शेंगा खातात.
किडींची आर्थिक नुकसानकारक पातळी ः 5 अळ्या प्रति 10 झाडे किंवा 5 टक्के शेंगांचे नुकसान.
नुकसानाची लक्षणे ः
- झाडाचे वाढणारे कोवळे शेंडे, पाने, फूलकळ्या व शेंगा एकमेकांना चिकटून मुख्य खोडाची वाढ खुंटते. शेंगांची वाढ होत नाही.
- प्रादुर्भाव झालेल्या झाडाची पाने, फूलकळ्या, फुले व शेंगा एकमेकाला चिकटलेल्या असतात. तेथील फुले निस्तेज झालेली असतात. त्या ठिकाणी भुसा पडलेला असतो.
प्रादुर्भावास अनुकूल, हवामान व परिस्थिती ः
- सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अनुकूल हवामानात किडीचे पुनरुत्पादन जलद होते.
- जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
उपाययोजना ः (प्रतिलिटर पाणी)
पहिली फवारणी ः
1) फूलकळी येताना ः
अझाडिरेक्टिन 0.03 टक्के (300 पीपीएम) 5 मिलि.
दुसरी फवारणी ः
पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना ः
एच.ए.एन.पी.व्ही. (500 एलई) 1 मिलि. किंवा
बॅसीलस थुरिन्जेंसीस 2 ग्रॅम.
तिसरी फवारणी ः
दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी ः
इंडोक्झाकार्ब (14.5 टक्के प्रवाही) 0.7 मिलि. किंवा
इमामेक्टिन बेंझोएट (5 टक्के दाणेदार) 0.4 ग्रॅम किंवा
क्लोरऍट्रानिलिप्रोल (18.5 एस सी)0.25 मिलि.
संपर्क ः चांगदेव वायळ, 9975541967
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
फोटो गॅलरी
- 1 of 30
- ››