तुरीवरील शेंगा पोखरणारी अळीचे नियंत्रण
चांगदेव वायळ
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

किडीचे सामाईक नाव ः घाटे अळी/ हिरवी अमेरिकन बोंडअळी
शास्त्रीय नाव ः Helicoverpa armigera (Hubner)
गण : Lepidoptera
कूळ : Noctuidae

किडीचे सामाईक नाव ः घाटे अळी/ हिरवी अमेरिकन बोंडअळी
शास्त्रीय नाव ः Helicoverpa armigera (Hubner)
गण : Lepidoptera
कूळ : Noctuidae

नुकसानीचा प्रकार ः पिकाच्या कळी, फुलोऱ्यापासून काढणीपर्यंत या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी तूर पिकाचे सर्वाधिक नुकसान या किडीमुळे होते. लहान अळी सुरवातीस तुरीची कोवळी पाने खाते. फुलोरा लागल्यावर प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव कळी व फुलांवर होतो. नंतरच्या अवस्थेतील अळ्यांचा प्रादुर्भाव शेंगांवर होतो. त्या शेंगा भरताना शेंगातील कोवळे दाणे खातात.

नुकसानीची लक्षणे ः या किडीची अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून, अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील अपरिपक्व आणि परिपक्व दाणे खाते. एक अळी साधारणतः २०-२५ शेंगांचे नुकसान करते. तुरीच्या प्रतिझाड एक अळी असल्यास उत्पादनात हेक्‍टरी १३८ किलो इतकी घट येते. लहान अळ्या कळ्या, फुलांना छिद्रे पाडून खातात. फूलगळीचे हे मुख्य कारण ठरते.

प्रादुर्भावास अनुकूल हवामान व परिस्थिती ः या किडींचा प्रादुर्भाव पीक रोपावस्थेत ते काढणीदरम्यान आढळून येतो. कोरड्या, उष्ण व दमट हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पीक कळ्या, फुलांवर आल्यापासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मादी पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यास सुरवात करतो.

किडींची आर्थिक नुकसानकारक पातळी ः १० अळ्या प्रति १० झाडे फुलोऱ्याच्या अवस्थेत किंवा २-३ अंडी प्रतिझाड किंवा ५ टक्के शेंगांचे नुकसान.

किडीच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजना ः

  • सर्वेक्षणासाठी हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.
  • शेताच्या बांधावरील तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची पर्यायी खाद्यतणे उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी ही वेळोवेळी काढून नष्ट करावीत.
  • शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी मचाण, इंग्रजी टी आकाराचे पक्षिथांबे ५०-६० प्रतिहेक्‍टर उभारावेत.
  • प्रतिहेक्टर एचएएनपीव्ही (HaNPV) ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क १ मिलि प्रतिलिटर पाणी (१ x १० चा ९ घात तीव्रता) या प्रमाणात फवारणी करावी. विषाणूंच्या फवारणीची कार्यक्षमता अतिनील किरणांत टिकून राहण्यासाठी अर्ध्या लिटर पाण्यात ५० ग्रॅम निळ टाकावी.

(फवारणी प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)
पहिली फवारणी ः पिकास फूलकळी येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडिरेक्‍टीन ०.०३ टक्के (३०० पीपीएम) ५ मिलि.

दुसरी फवारणी ः पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (५०० एलई) १ मिलि किंवा बॅसीलस थुरीन्जिएन्सीस २ ग्रॅम.

तिसरी फवारणी ः दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी,
इंडोक्‍झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.७ मिलि किंवा
इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के दाणेदार) ०.४ ग्रॅम किंवा
क्‍लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के प्रवाही) ०.२५ मिलि.

टीप ः

  • पहिल्या फवारणीनंतर विलंब झाल्यास व बारीक अळ्या दिसू लागल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी     क्विनॉलफॉस (२० टक्के प्रवाही) २ मिलि.
  • मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा बंदोबस्त करावा. अळ्यांचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यास तुरीच्या झाडाखाली पोते अंथरून तुरीचे झाड हलवावे व पोत्यावर पडलेल्या अळ्या जमा करून त्यांचा नाश करावा.

संपर्क ः चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६
(तूर कीटकशास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...