agricultural stories in marathi, crop advice, sunflower plantation | Agrowon

वेळेवर करा रब्बी सूर्यफुलाची लागवड
डॉ. ए. एम. मिसाळ, डॉ. एम. के. घोडके, एस. बी. सूर्यवंशी
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

राज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत सूर्यफुलाची लागवड होते. हे पीक हवामानासाठी काही प्रमाणामध्ये संवेदनशील असल्याने लागवड वेळेवर करणे आवश्यक आहे. 

जमीन व हवामान :

राज्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत सूर्यफुलाची लागवड होते. हे पीक हवामानासाठी काही प्रमाणामध्ये संवेदनशील असल्याने लागवड वेळेवर करणे आवश्यक आहे. 

जमीन व हवामान :

 •  मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी, उत्तम निचरा असणारी व जमिनीचा सामू ६.५ - ८.० असणारी जमीन सूर्यफूल लागवडीसाठी निवडावी. पाणथळ किंवा आम्लयुक्त जमीन लागवडीसाठी टाळावी.
 •  सूर्यफुलाची चांगली वाढ व उत्पादनासाठी, ५०० मि.मी. पर्जन्यमानाची गरज आहे.
 •  सूर्यफूल हे समशीतोष्ण कटिबंधातील पीक असल्याने बियाणे उगवणीसाठी व रोपांची वाढ होण्यासाठी थंड हवामान लागते, तर फूलधारणेपासून पीक येईपर्यंत स्वच्छ प्रकाश व जास्त तापमान आवश्यक आहे.
 •  फूलधारणेच्या अवस्थेत पाऊस व धुके पडल्यास, त्याचा विपरीत परिणाम बीजधारणेवर होतो, त्यामुळे फुलोऱ्याची अवस्था पावसात व धुक्यात सापडणार नाही, याची काळजी घेऊनच पेरणीची वेळ ठरवावी.
 •  तापमान १६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी व ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास परागीकरणावर, उत्पादनावर व तेलाच्या प्रमाणावर परिणाम होतो. साधारणतः २५-३० अंश सेल्सिअस तापमानात सूर्यफूल पिकाची वाढ चांगली होते.

पेरणीची वेळ :
रब्बी हंगामात ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी. यासाठी हेक्टरी ५ किलो बियाणे वापरावे. पाभरीद्वारे पेरणीसाठी हेक्टरी ८-१० कि.ग्रॅ. बियाणे लागते.

पूर्वमशागत ः
वखराच्या दोन पाळ्या देऊन शेत तयार करावे. शेवटच्या वखर पाळीअगोदर हेक्टरी ५-१० टन कुजलेले शेणखत मिसळावे.

बीजप्रक्रिया : प्रतिकिलो बियाणे.
 बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी : कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम
 नत्र व स्फुरदाची उपलब्धता ः अॅझेटोबॅक्टर, पी.एस.बी. प्रत्येकी २५ ग्रॅम.

बियाणे व लागवड पद्धत :

 •  पेरणीचे अंतर : भारी जमिनीत ६० x ३० सें.मी. व मध्यम जमिनीत ४५ x ३० सें.मी अंतरावर लागवड करावी.
 •  पेरणीची पद्धत : पेरणी टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी दोन बिया टोकण कराव्यात. पेरणी पाभरीने केल्यास ६० सें.मी. पाभरीचा वापर करून ८-१० किलो बियाणे प्रतिहेक्टरी पेरण्यास वापरावे.

पीकपद्धती :
क्रमिक पीक :
कोरडवाहू क्षेत्रात : सोयाबीन- सूर्यफूल, मूग, उडीद- सूर्यफूल, सूर्यफूल- हरभरा
बागायती क्षेत्रात : भुईमूग- सूर्यफूल- तीळ, कापूस- सूर्यफूल, तूर- सूर्यफूल व ज्वारी- सूर्यफूल.

 वाण कालावधी (दिवस) तेलाचे प्रमाण (%) सरासरी उत्पादन (क्विं./हे.) वैशिष्ट्ये
सूर्यफुलाच्या सुधारित व संकरीत जाती
सुधारित वाण
लातूर सूर्यफूल ८ ८५-९० ३६-३७ १२-१४ केवडा रोगप्रतिबंधक, कमी उंचीचे व कमी कालावधीत तयार होणारे वाण.
फुले भास्कर ९०-९५ ३६-३७ १५-१६ अधिक उत्पादनक्षम.
एस.एस.- २०३८ (भानू) ९०-९५ ३७-३८ १४-१५ अधिक उत्पादनक्षम, उंच वाढणारा व तेलाचे प्रमाण अधिक.
माॅर्डन ८०-८५ ३३-३५ १०-१२ लवकर तयार होणारा, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य
संकरित वाण
लातूर संकरित सूर्यफूल-१७१ ९०-९५ ३४-३५ १८-२० केवडा रोग प्रतिबंधक, कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य (भारत).
लातूर संकरित सूर्यफूल -३५ ८५-९० ३७-३८ १५-१६ केवडा रोग प्रतिबंधक, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य (महाराष्ट्र).
के.बी.एस.एच.-४४ ९०-९५ ३५-३६ १६-१८ कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य (भारत).
डी.आर.एस.एच.-१ ९२-९८ ३८-४० १४-१६ तेलाचे प्रमाण अधिक व उंच वाढणारे (भारत).
फुले रविराज ९०-९५ ३४-३५ १६-१७ कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी योग्य (महाराष्ट्र).
अकोला संकरित सूर्यफूल – ८५२ ८५-९० ३६-३७ १४-१५ कमी कालावधीत तयार होणारे वाण, कोरडवाहू लागवडीसाठी योग्य (विदर्भ)

 

वाण व जमीन न:स्फु:पा (किलो/हे.) खते देण्याची वेळ
खत व्यवस्थापन (मुख्य अन्नद्रव्ये)
संकरित वाणास ६०:३०:३० पैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद व सर्व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे, तर नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावा.
सुधारित वाणास ४०:३०:३० संपूर्ण मात्रा एकदाच पेरणीच्या वेळी द्यावी.
खोल काळ्या जमिनीत ९०:४५:४५ यापैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद व सर्व पालाश पेरणीच्यावेळी द्यावे, तर नत्र खताचा दुसरा हप्ता पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावा.
 

सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन :

 • २५ किलो गंधक प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळेस दिल्यास बियाण्यात १.५-२.५ टक्के तेलाचे प्रमाण वाढते.
 • पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर २०, ४० व ५० दिवसांनी १५ ग्रॅम युरिया + ५ ग्रॅम डी.ए.पी. खत प्रतिलिटर पाणी फवारणीद्वारे द्यावे.
 •  माती परीक्षणानुसार कमतरता असल्यास, झिंक सल्फेट १० किलो, मॅग्नेशिअम सल्फेट १०-२० किलो व बोरॅक्स ५ किलो प्रतिहेक्टरी पेरणीच्या वेळी द्यावे.

आंतरमशागत ः

 • सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी रोपांची संख्या ५५ हजार ठेवणे महत्त्वाचे आहे. शेतकरी सूर्यफुलाची पेरणी बहुतेक वेळी तिफणीने करतात, त्यामुळे हेक्टरी रोपांची संख्या ही कमी किंवा अधिक होऊन, त्याचा परिणाम उत्पादनावर होतो.
 • पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. एका ठिकाणी फक्त एकच जोमदार रोप ठेवावे. दोन रोपांमधील अंतर ३० सें.मी. राहील असे पाहावे.
 • सूर्यफूल पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. यासाठी २-३ वेळा कोळपणी व खुरपणी करावी.
तणनाशकाचे नाव तणनाशकाचे प्रमाण (प्रति हे.) प्रमाण प्रति १० लि. पाणी

वापरण्याची वेळ (हे. ७५०-१००० लि. पाणी वापरावे)

रासायनिक तणनियंत्रण
पेन्डीमीथॅलीन (३० ई.सी.) २.५०-३.३० लिटर २५-३३ मिलि पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वी.
ऑक्सिफ्लोरफेन (२३.५ ई.सी.) ४२५ मिलि. ४.२५ मिलि. पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी.

पाणी व्यवस्थापन :

 • सूर्यफूल पिकास जमिनीचा प्रकार, हवामान व पिकाच्या कालावधीनुसार ६००-१००० मि.मी. पाणी लागते.
 • पीकवाढीच्या संवेदनशील काळात पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
 1.  कळी धरणे (३०-४० दिवस).
 2.  फूल उमलणे (५५-६५ दिवस)
 3. दाणे भरणे (६५-७० दिवस)

हस्त परागीकरण ः

 • सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिहेक्टरी मधमाश्यांच्या ५ पेट्या ठेवाव्यात. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते.
 • मधमाश्यांचे प्रमाण कमी असल्यास, योग्य परागीकरणासाठी व बी भरण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सूर्यफुलाचे पीक फुलोऱ्यात असताना एक दिवसाआड सकाळी ८-११ या वेळेत एक आठवडा फुलावर मऊ कापडाने हात फिरवावा, त्यामुळे बी भरण्याच्या प्रमाणात २५-३० टक्के वाढ दिसून आली आहे.
 • पीक फुलोऱ्यात असताना शक्यतो कोणतेही कीडनाशक फवारू नये.

संपर्क ः डॉ. ए. एम. मिसाळ, ०७५८८६१२९४३
संपर्क  ः डॉ. एम. के. घोडके, ०९४२३७७७५८५

(गळीत धान्ये संशोधन केंद्र, लातूर)

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...