सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळी व त्यामुळे झालेले नुकसान
सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळी व त्यामुळे झालेले नुकसान

सोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

शेंग पोखरणारी अळी : शास्त्रीय नाव : Spodoptera litura 

अन्य नावे ः हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी.

पिके ः ही कीड बहुभक्षी असून तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी इ. कडधान्यांवर मोठ्या प्रमाणात आढळते; तर कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाकू, सूर्यफूल, करडई इ. पिकांवरही येते.

नुकसान : सुरवातीस अंडीतून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुले खाते. नंतर शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून आत शिरते. शेंगेतील अपरिपक्व; तसेच परिपक्व झालेले दाणे खाऊन टाकते. वातावरण ढगाळ असताना या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण होतो.

नियंत्रण

  • पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.
  • शेतात ठिकठिकाणी पिकांच्या उंचीपेक्षा साधारणपणे एक ते दीड उंचीचे पक्षी थांबे उभारावेत. त्यावर पक्षी बसून अळ्यांना टिपतात.
  • शेतात हेक्‍टरी किमान ५- १० कामगंध सापळे लावावेत. सापळ्यांमध्ये प्रतिदिन ८-१० पतंग सतत २-३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी. सापळ्यात जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
  • फवारणी बॅसीलस थुरीन्जिएन्सीस (सीरोटाईप एच-३९, ३ बी स्ट्रेन झेड- ५२) १.५ ग्रॅम प्रतिलिटर.आवश्‍यकता भासल्यास १० ते १२ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

    टीप ः फवारणीचे द्रावण फुले, कळ्या व शेंगापर्यंत पोचेल, याची काळजी घ्यावी. संपर्क : डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com