agricultural stories in Marathi, dipak patil cotton farmer's management | Agrowon

नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी व्यवस्थापनातून कपाशी यशस्वी
चंद्रकांत जाधव
शनिवार, 25 मे 2019

शेतकरी - दीपक माणिक पाटील
माचले, ता. चोपडा, जि. जळगाव
संपर्क - ९७६४९५६०६२

माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित कपाशी पीक आहे. गेल्या सहा वर्षापासून दीपक कपाशी पिकाचे नियोजन व्यवस्थापन करतात. त्यांनी लागवडीसह सिंचनाच्या पद्धतीत बदल केले आहेत. तापमान घटल्यानंतर लागवड, ठिबक सिंचन आणि गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी डिसेंबरमध्येच पीक काढणी असे नियोजन बसवले आहे. एकरी किमान १३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात.

शेतकरी - दीपक माणिक पाटील
माचले, ता. चोपडा, जि. जळगाव
संपर्क - ९७६४९५६०६२

माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक पाटील यांच्याकडे वडिलोपार्जित कपाशी पीक आहे. गेल्या सहा वर्षापासून दीपक कपाशी पिकाचे नियोजन व्यवस्थापन करतात. त्यांनी लागवडीसह सिंचनाच्या पद्धतीत बदल केले आहेत. तापमान घटल्यानंतर लागवड, ठिबक सिंचन आणि गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी डिसेंबरमध्येच पीक काढणी असे नियोजन बसवले आहे. एकरी किमान १३ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात.

दीपक व त्यांचे काका भाईदास यांची संयुक्त २४ एकर शेती आहे. कराराने सुमारे १० ते १२ एकर शेतीदेखील करतात. कापसाची दरवर्षी १२ एकरात लागवड करतात. कापूस लागवडीसाठी केळी पिकाच्या रिकाम्या झालेल्या क्षेत्राची निवड करतात. कारण केळी पिकाचे बेवड कापूस व अन्य पिकांसाठी उत्तम असते. सिंचनासाठी पाच कूपनलिका आहेत. या हंगामात सुमारे १४ एकरात कापूस लागवडीचे नियोजन. यातील पाच ते सहा एकर क्षेत्रात देशी कापसाची लागवड करणार आहे. तर उर्वरित १० एकरात बीटी वाणांची निवड करणार आहे.

 • लागवडीसाठी नियोजित क्षेत्रात खोल नांगरणी व रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घेतात.
 • सिंचनासाठी ठिबकचा वापर करतात. ठिबकच्या नळ्या शेतामध्ये पसरून घेतात. हलक्‍या जमिनीत पाच बाय दीड फूट अंतरावर, तर काळ्या कसदार जमिनीत पाच बाय दोन फुटांवर लागवड करतात.
 • लागवडीपूर्वी ठिबकमधून पाणी सोडतात. चांगला वाफसा झाल्यानंतर लागवड करतात.
 • साधारणपणे तापमान ४२ अंश किंवा यापेक्षा कमी झाल्यानंतर सुमारे २५ मे नंतर लागवडीचे नियोजन असते.
 • लागवडीनंतर आठ-नऊ दिवसांनंतर नांग्या भरून रोपांची संख्या योग्य ठेवतात.
 • मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर संयुक्त खत देतात. सुरवातीला डीएपी प्रतिएकर एक गोणी देतात. पीक सुमारे दीड महिन्याचे झाल्यानंतर खतांची दुसरी पाळी पूर्ण करतात. त्यात एकरी एक गोणी १०.२६.२६ व युरिया देतात.
 • पिकाला पाते, फुले येताच गुलाबी बोंड अळीचा धोका लक्षात घेऊन मागील दोन वर्षांपासून एकरी सहा कामगंध सापळे लावतात.
 • सप्टेंबरपर्यंत कीड व रोगनियंत्रणासाठी साधारणपणे चार फवारण्या कराव्या लागत असल्याचा अनुभव आहे. सुरवातीच्या तीन फवारण्यांमध्ये रसशोषक व इतर किडींना रोखण्यासह पिकाच्या निकोप वाढीसाठी संप्रेरकांचा उपयोग करतात. अंतिम फवारणीला गुलाबी बोंड अळीसाठी प्रतिबंधात्मक कीडनाशकाचा वापर करतात.
 • सप्टेंबरनंतर ड्रीपमधून विद्राव्य खते देतात. खतांसाठी एकरी पाच हजार आणि फवारणीसाठी एकरी सुमारे पाच हजार रुपये खर्च त्यांना येतो. फक्त दोनदाच बेसल डोस म्हणून रासायनिक खते देतात.
 • पाण्याचा अतिवापर कटाक्षाने टाळतात. अतिपावसात काळ्या कसदार जमिनीत कापसाचे पीक पिवळे पडून मररोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाचे प्रमाण व्यवस्थित असले तर कापूस जोमात असतो.
 • वेचणी पोळा सणानंतर म्हणजेच सप्टेंबरअखेरीस सुरू होते. पोळा सणापर्यंत एकरी दीड ते दोन क्विंटल कापूस घरात येतो. त्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी तो स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवून घेतात. कापूस वेचणीसाठी डिसेंबरपर्यंत प्रतिकिलो पाच रुपये खर्च येतो. डिसेंबरच्या अखेरीस पीक काढून ते त्यात कलिंगड, गहू, बाजरी आदी पिके पेरणीचे नियोजन करतात.
   

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...