राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत १३० सामूहिक शेततळी

यंदा पाऊस कमी असल्यामुळे विहिरीला पाणी नाही, परंतु कालव्याच्या पाण्यावर ९० लाख आणि ६० लाख लिटर पाणीसाठवण क्षमतेची शेततळी पाण्याने भरून घेतली. त्यामुळे सात एकरावरील केळी पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. - विलास नादरे, शेतकरी, गिरगाव, ता. वसमत, जि. हिंगोली.
गिरगाव, जि. हिंगोली ः राष्ट्रीय फलोत्पादन अभियनांतर्गत गिरगाव शिवारात घेण्यात आलेले सामूहिक शेततळे.
गिरगाव, जि. हिंगोली ः राष्ट्रीय फलोत्पादन अभियनांतर्गत गिरगाव शिवारात घेण्यात आलेले सामूहिक शेततळे.

  राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांत १३० सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. अस्तरीकरण करण्यात आलेल्या या शेततळ्यांतील पाणीसाठ्यावर जिल्ह्यात यंदा उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना फळबागा जोपासण्यासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

लोखंडे म्हणाले की, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यात १३० सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण झाली आहेत. या शेततळ्यांना प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शेततळ्याची कामे पूर्ण करण्यावर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्राधान्य दिले. शेतकऱ्यांनी देखील सहकार्य केले. विहिरी, कूपनलिका आटल्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही, परंतु सामूहिक शेततळ्यांतील पाणीसाठ्यावर शेतकऱ्यांना संत्रा, मोसंबी, केळी, हळद आदी पिकांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. सामूहिक शेततळ्यांच्या कामांवर २ कोटी ७० लाख  रुपये निधी खर्च झाला. सध्या हिंगोली (३०), कळमनुरी (३), वसमत (३०), औंढा नागनाथ (३७), सेनगाव (३०) या तालुक्यांत सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com