मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण, पाण्याची सोय आवश्यक

कमी खर्चात तयार केलेली बारदानाची गव्हाण.
कमी खर्चात तयार केलेली बारदानाची गव्हाण.

मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करावी. चारा खाण्यासाठी योग्य उंचीची गव्हाण आवश्यक आहे. ज्यामुळे जनावरांना चारा व्यवस्थित खाता येतो,तसेच चारा वाया जात नाही.

गव्हाण

  •  कमी खर्चात गव्हाण करण्यासाठी काही शेतकरी लाकडाचा वापर करतात तर काही शेतकरी बारदानाच्या पोत्याचा वापर करून गव्हाण करतात.
  •  १० गाईंना सर्वसाधारणपणे ४० फूट लांबीची गव्हाण आवश्यक आहे. अशी बारदानाच्या पोत्याची ४० फूट गव्हाण करण्यासाठी जुनी १० ते १२ पोती लागतील. एका पोत्याचा खर्च सर्वसाधारणपणे ४० रुपये असल्यास एकूण ४०० रुपयांची पोती लागतील.
  • अशी गव्हाण करताना ४० फुटाची दोन लाकडे लागतात. या लाकडांना जमिनीपासून २.५ ते ३ फुटावर ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येक ५ फुटावर आधार देण्यासाठी ४ फुटाची १६ लाकडे लागतील. या सर्वांचा जर खर्च पाहिला तर तो २०० रुपये एवढा येईल. म्हणजे १० जनावरांसाठी ४० फुटाची बारदानाची गव्हाण करण्यासाठी सर्वसाधारणपणे रुपये ८०० एवढा खर्च येईल.
  •   खरारा करण्यासाठी ग्रुमिंग ब्रश          गव्हाणीप्रमाणेच गोठ्यामध्ये कमी खर्चात ग्रुमिंग ब्रश तयार करता येतो.     जनावरांना खरारा केल्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण चांगले राहते. एक ६ ते ८ इंच जाड लाकडी ८ फूट डांब घेऊन तो मुक्त संचार गोठ्यामध्ये रिकाम्या जागेत घट्ट बसवावा. त्याला मधोमध काथ्या गुंडाळावा. अशाप्रकारे कमी खर्चात ब्रश तयार होईल. त्याचा जास्तीत जास्त फायदा गाईंना होऊन दूध उत्पादन व जनावराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये डांब २०० रुपये, काथ्या ५० रुपये प्रमाणे एकूण २५० रुपये खर्च येतो.

    पाणी व्यवस्थापन

  • जनावरांना त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यावेळेस पाणी देता आले पाहिजे. यासाठी एक ३०० लिटर क्षमतेची सिमेंटची गोलाकर टाकी  गोठ्यात बसवावी.जिची किंमत सर्वसाधारणपणे ६०० रुपयांच्या आसपास आहे.
  •  सिमेंटची टाकी वापरल्याने त्यातील थोडेफार पाणी झिरपते. त्यामुळे बाहेर आलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होण्यासाठी आतील पाण्याची
  • ऊर्जा वापरल्याने भर उन्हात टाकी ठेऊनसुद्धा त्यातील पाणी थंड राहते. जनावर असे थंड पाणी पितात.
  • अशाप्रकारची एक टाकी दहा जनावरांसाठी पुरेशी होते.  या टाकीला पाइपलाइनच्या साह्याने मुख्य टाकीला जोडले  आणि त्यास पाणी नियंत्रण करण्यासाठी प्लॅस्टिक बॉल बसविला तर वारंवार टाकी भरावी लागणार नाही. जसे पाणी संपेल तसे पाणी या नियंत्रकाच्या साह्याने त्या छोट्या ३०० लिटरच्या टाकीत सोडले जाते.
  • सर्व खर्चाचा विचार केला तर आपणास कमी खर्चात १० गाईंच्या मुक्तसंचार गोठ्याची निर्मिती करण्यासाठी निवारा ८,५४० रुपये, कुंपणासाठी ७,००० रुपये, तसेच ग्रुमिंग ब्रशसाठी २५० रुपये खर्च येतो. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ६०० रुपये व चारा खाण्यासाठी गव्हाणीचा खर्च ८०० रुपये येतो. वरील सर्व खर्चाचा विचार केला तर असा गोठा तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे १७,१९० रुपये एवढा खर्च येतो.
  •     - डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६ - २२१३०२ (लेखक गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्  प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com