agricultural stories in Marathi, fodder and water management for animals in free range system | Agrowon

मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण, पाण्याची सोय आवश्यक
डॉ. एस. पी. गायकवाड
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करावी. चारा खाण्यासाठी योग्य उंचीची गव्हाण आवश्यक आहे. ज्यामुळे जनावरांना चारा व्यवस्थित खाता येतो,तसेच चारा वाया जात नाही.

 

गव्हाण

मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता करावी. चारा खाण्यासाठी योग्य उंचीची गव्हाण आवश्यक आहे. ज्यामुळे जनावरांना चारा व्यवस्थित खाता येतो,तसेच चारा वाया जात नाही.

 

गव्हाण

  •  कमी खर्चात गव्हाण करण्यासाठी काही शेतकरी लाकडाचा वापर करतात तर काही शेतकरी बारदानाच्या पोत्याचा वापर करून गव्हाण करतात.
  •  १० गाईंना सर्वसाधारणपणे ४० फूट लांबीची गव्हाण आवश्यक आहे. अशी बारदानाच्या पोत्याची ४० फूट गव्हाण करण्यासाठी जुनी १० ते १२ पोती लागतील. एका पोत्याचा खर्च सर्वसाधारणपणे ४० रुपये असल्यास एकूण ४०० रुपयांची पोती लागतील.
  • अशी गव्हाण करताना ४० फुटाची दोन लाकडे लागतात. या लाकडांना जमिनीपासून २.५ ते ३ फुटावर ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येक ५ फुटावर आधार देण्यासाठी ४ फुटाची १६ लाकडे लागतील. या सर्वांचा जर खर्च पाहिला तर तो २०० रुपये एवढा येईल. म्हणजे १० जनावरांसाठी ४० फुटाची बारदानाची गव्हाण करण्यासाठी सर्वसाधारणपणे रुपये ८०० एवढा खर्च येईल.

  खरारा करण्यासाठी ग्रुमिंग ब्रश    
    गव्हाणीप्रमाणेच गोठ्यामध्ये कमी खर्चात ग्रुमिंग ब्रश तयार करता येतो.
    जनावरांना खरारा केल्यामुळे त्यांचे रक्ताभिसरण चांगले राहते. एक ६ ते ८ इंच जाड लाकडी ८ फूट डांब घेऊन तो मुक्त संचार गोठ्यामध्ये रिकाम्या जागेत घट्ट बसवावा. त्याला मधोमध काथ्या गुंडाळावा. अशाप्रकारे कमी खर्चात ब्रश तयार होईल. त्याचा जास्तीत जास्त फायदा गाईंना होऊन दूध उत्पादन व जनावराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये डांब २०० रुपये, काथ्या ५० रुपये प्रमाणे एकूण २५० रुपये खर्च येतो.

पाणी व्यवस्थापन

  • जनावरांना त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यावेळेस पाणी देता आले पाहिजे. यासाठी एक ३०० लिटर क्षमतेची सिमेंटची गोलाकर टाकी  गोठ्यात बसवावी.जिची किंमत सर्वसाधारणपणे ६०० रुपयांच्या आसपास आहे.
  •  सिमेंटची टाकी वापरल्याने त्यातील थोडेफार पाणी झिरपते. त्यामुळे बाहेर आलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होण्यासाठी आतील पाण्याची
  • ऊर्जा वापरल्याने भर उन्हात टाकी ठेऊनसुद्धा त्यातील पाणी थंड राहते. जनावर असे थंड पाणी पितात.
  • अशाप्रकारची एक टाकी दहा जनावरांसाठी पुरेशी होते.  या टाकीला पाइपलाइनच्या साह्याने मुख्य टाकीला जोडले  आणि त्यास पाणी नियंत्रण करण्यासाठी प्लॅस्टिक बॉल बसविला तर वारंवार टाकी भरावी लागणार नाही. जसे पाणी संपेल तसे पाणी या नियंत्रकाच्या साह्याने त्या छोट्या ३०० लिटरच्या टाकीत सोडले जाते.
  • सर्व खर्चाचा विचार केला तर आपणास कमी खर्चात १० गाईंच्या मुक्तसंचार गोठ्याची निर्मिती करण्यासाठी निवारा ८,५४० रुपये, कुंपणासाठी ७,००० रुपये, तसेच ग्रुमिंग ब्रशसाठी २५० रुपये खर्च येतो. पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ६०० रुपये व चारा खाण्यासाठी गव्हाणीचा खर्च ८०० रुपये येतो. वरील सर्व खर्चाचा विचार केला तर असा गोठा तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे १७,१९० रुपये एवढा खर्च येतो.

    - डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६ - २२१३०२
(लेखक गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्  प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

टॅग्स

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....