agricultural stories in Marathi, gauva yashkatha, Mohan Igale, Savarde tal. Tasgaon, Dist. Sangali | Agrowon

द्राक्ष पट्ट्यात बसवले पेरूचे गणित
अभिजित डाके
बुधवार, 29 मे 2019

सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथील मोहन इरळे यांनी द्राक्ष पट्ट्यामध्ये पेरूची लागवड करत वेगळी वाट चोखाळली आहे. पाणी कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. दर्जेदार पेरू उत्पादनामुळे किरकोळ व्यापारी स्वतः शेतातून पेरू तोडून नेतात. खर्च कमी होतानाच बाजारपेठेएवढा दर मिळल्याने पेरू विक्रीचेही गणितही बसविण्यात त्यांना यश आले आहे.

सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथील मोहन इरळे यांनी द्राक्ष पट्ट्यामध्ये पेरूची लागवड करत वेगळी वाट चोखाळली आहे. पाणी कमतरतेवर मात करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. दर्जेदार पेरू उत्पादनामुळे किरकोळ व्यापारी स्वतः शेतातून पेरू तोडून नेतात. खर्च कमी होतानाच बाजारपेठेएवढा दर मिळल्याने पेरू विक्रीचेही गणितही बसविण्यात त्यांना यश आले आहे.

तासगाव तालुका हा द्राक्ष आणि बेदाणा उत्पादनासाठी राज्यभर ओळखला जातो. तासगावापासून दहा कि.मी. अंतरावरील सावर्डे गावही निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांचे, तर कुस्तीचा सांस्कृतिक वारसा सांगणारे पैलवानांचे गाव. येथील मोहन परशुराम इरळे यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यासोबतच त्यांच्या चुलत्यांची तीन एकर शेतीही ते कसतात. त्या विषयी माहिती देताना मोहन इरळे म्हणाले, की १६ चुलतभावांसह एकूण ६० जणांचे आमचे कुटुंब होते. एकत्रित असताना वडिलांच्या काळात द्राक्ष बागेच्या लागवडीतून घराची उन्नती झाली. पुढे प्रत्येकाचे व्यवसाय वाढल्याने साधारण पंधरा वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाले असले तरी व्यवसायात एकमेकांची भागादारी तशीच आहे. कोणतेही काम एकमेकांच्या सल्ल्याने केले जाते. त्यात मोठे काका रंगराव इरळे यांचे शेती आणि व्यवसायातील नियोजनासाठी नेहमीच मार्गदर्शन मिळते.

द्राक्ष शेतीमुळे आर्थिक संपन्नता आली असली तरी द्राक्ष शेतीमध्ये अडचणीही वाढल्या आहे. त्यात पाणीटंचाई, वाढता उत्पादन खर्च यांमुळे काही प्रमाणात तरी अन्य फळबागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला. कमी पाण्यावर येणाऱ्या डाळिंब आणि पेरू यापैकी प्रथम डाळिंबाची निवड करत चार एकरवर लागवड केली. मात्र, येथील वातावरण डाळिंबासाठी पोषक नाही. डाळिंबाची अपेक्षित फुगवण होत नसल्याने पुन्हा पेरू लागवडीचा निर्णय घेतल्याचे मोहनराव यांनी सांगितले.
पेरू लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर भिलवडी येथील चितळे यांच्या बागेत जाऊन माहिती घेतली. ते आमच्याकडून पॅकिंगसाठी बॉक्स घेत असल्याने परिचय होताच त्याचा फायदा झाला. नगर जिल्ह्यातून उत्तम दर्जाची रोपे आणून लागवड केली. या भागात पेरू लागवड कमी असल्याने पेरूच्या विक्रीचा प्रश्न होता. मात्र, आमच्या सांगली, कवलापूर, कळंबी येथील पाहुण्यांनी व्यापाऱ्यापर्यंत आमच्या पेरूची जाहिरात केली. त्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊ लागले. पेरू तोडणे, वाहतूक हे खर्च वाचले. परिणामी, बाजारापेक्षाही अधिक दर मिळाला.

इरळे यांची शेती

सहा एकर - पेरु
३.५ एकर - द्राक्ष
उर्वरित क्षेत्रामध्ये ज्वारी, भुईमूग अशी कोरडवाहू पिके घेतात.

अशी आहे लागवड

पहिली लागवड - २०१२ या वर्षी
आठ फूट बाय पाच फूट अंतावर तीन एकर
नऊ फूट बाय पाच फूट अंतरावर - दोन एकर
एका एकरात ९०० ते १००० रोपे बसतात.
गेल्या वर्षी नऊ फूट बाय पाच फूट अंतरावर एक एकर क्षेत्रावर पुन्हा पेरू लागवड केली.
एकरी उत्पादन खर्च ः ५० ते ६० हजार रुपये

असा असतो हंगाम

छाटणी - एप्रिल

  • तीन वेळा घेतला जाते बहर
  • पेरूची लागवड केल्यानंतर ११ किंवा १२ व्या महिन्यात काढणीस येतात.
  • छाटणी नंतर १० दिवसात प्रतिझाड झिंक २०० ग्रॅम, बोरॉन ५० ग्रॅम, पोटॅश २५० ग्रॅम, मॅग्नेशिअम १०० ग्रॅम, एसएसपी ५०० ग्रॅम या प्रमाणे खताचे नियोजन करतात. कळी येतेवेळी १३ः४०ः१३ या ग्रेडची खते दिली जाते.
  • फवारणी आठ दिवसांतून एकदा
  • शेंडे कट करून झाडाची उंची सहा ते सात फुटापर्यंत मर्यादित ठेवली जाते. त्यामुळे पेरू सहज काढता येतात.
  • सकाळी सहा वाजता व्यापारी शेतात येऊन आठपर्यंत पेरू काढणी पूर्ण होते.
  • कृषी प्रदर्शनात भाग घेतल्यामुळे पेरूसाठी नवीन व्यापारी, ग्राहक मिळवणे शक्य झाले.

एकरी उत्पादन

सन २०१३....अडीच टन....२० रुपये प्रतिकिलो
सन २०१४....सहा टन.....२५ ते ३५ रुपये प्रतिकिलो
सन २०१५....दहा टन....२५ ते ३५ रुपये प्रतिकिलो
सन २०१६....दहा टन ....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो
सन २०१७....दहा टन....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो
सन २०१८...सहा टन ....२५ ते ३० रुपये प्रतिकिलो (पाणीटंचाईमुळे उत्पादन कमी झाले.)

पाण्यासाठी पाच गावे आली एकत्र

पाण्याची कमतरता ही मोठीच समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी परिसरातील सावर्डे, आरवडे, चिंचणी, लोढे आणि कौलगे अशा पाच गावांनी एकत्र येत पाणी संस्था स्थापन केली आहे. लोढे तलावातून पाणी उचलून शेततळ्यात साठवतो. यासाठी आवश्यक ती पाणीपट्टी शेतकरी देतात. मात्र, गेल्यावर्षी पाऊस न झाल्याने पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे.

पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॉक्सची निर्मिती

सन १९९० मध्ये सांगली शहरात पॅकिंग बॉक्स निर्मितीचा पहिला कारखाना उभारला. त्यानंतर इंगळे बंधूंचे बॉक्सनिर्मितीशी संबंधित लॅमिनेशन, प्रिटिंग सह एकूण पाच कारखाने सांगली परिसरात आहेत. यामध्ये द्राक्ष, पेरू अशा शेतीमालासह अन्य उद्योगांसाठी लागणारे सर्व प्रकारचे बॉक्स तयार केले जातात.

मिनाक्षी यांचे शेतीकडे लक्ष

इंगळे कुटुंबामध्ये आई श्रीमती लक्ष्मीबाई, पत्नी मिनाक्षी, मुलगा मयुर यांचा समावेश आहे. स्वतः मोहन यांचे शिक्षण अकरावी झाले असून, मयूर हा पुणे येथे स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करत आहे. सौ. मिनाक्षी यांचे शेतीमध्ये सतत लक्ष असते. बागेचा ताण, कळ्या येण्याची स्थिती, पाण्याचे नियोजन अशा अनेक बारकावे त्यांनी जाणले आहेत. पतीच्या अनुपस्थितीमध्येही शेतातील कोणतेही काम अडत नाही.

मोहन परशुराम इरळे, ९९२१११५१६१

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...
देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने...इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका...