शेळ्यांच्या विक्री व्यवस्थापनाचे तंत्र

शेळ्यांच्या विक्री व्यवस्थापनाचे तंत्र
शेळ्यांच्या विक्री व्यवस्थापनाचे तंत्र

शेळ्यांच्या विक्रीचे व्यवस्थापन करताना अगोदर अापल्या व्यवसायाचा निश्चित हेतू ठरवावा. व्यवसायातील संधी, उपयुक्तता याचा अाभ्यास करून त्यानुसार व्यवस्थापनात अावश्यक तो बदल करून उत्पादन वाढविता येते. व्यवसाय अार्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी व्यवसायातील संधी, विक्री व्यवस्थापन अाणि व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल माहिती असेल तर विक्रीचे योग्य व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते. शेळीपालन व्यवसायातील विविध संधी

  • मागच्या पाच वर्षांत मटणाच्या किमतीमध्ये ७५ टक्के एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते.
  • सुरवातीची गुंतवणूक कमी.
  • शरीर आकारमान लहान असल्याने गोठ्यासाठी कमी जागा, कमी चारा व एकूण सुरवातीचा खर्च कमी होतो.
  • शेळ्या लवकर वयात येतात (१० ते १२ महिने)
  • विक्री व्यवस्थापनातील संधी ः

  • मांसाची निर्यात.
  • बकरी ईदचे बोकड तयार करण्यासाठी.
  • फक्त मांसासाठी शेळीपालन.
  • दूध व दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी उदा. चीज, साबण, दही, सेंद्रिय खत इ.
  • पैदाशीसाठी, प्रदर्शनासाठी.
  • गटारी, धूलिवंदन, ३१ डिसेंबर, दसरा इ. सणामध्ये मटणासाठी शेळ्यांना चांगली मागणी असते.
  • लेंडीखतासाठी शेळीपालन फायदेशीर ठरते.
  • फायदेशीर शेळीपालनाचा मूलमंत्र

  • सुरवात जास्तीत जास्त २० शेळ्या व १ बोकड.
  • दोन करडे देणारी गाभण स्थानिक शेळी निवडावी.
  • घरचा चारा व योग्य नियोजन.
  • बकरी ईद व पैदास बोकड उत्पादन विक्री नियोजन.
  • बोकडाच्या वजनवाढीवर विशेष लक्ष देणे.
  • नोंदवहीमध्ये नोंदी ठेवणे.
  • नियमित लसीकरण व जंतांचे निर्मूलन.
  • स्वच्छ मटण निर्मिती व निर्यातीवर भर.
  • मोठ्या उद्योगासाठी शेळ्यांचा विमा काढणे.
  • विनाउपयोगी शेळ्या कळपातून काढून टाकणे.
  • स्वतः फार्मवर लक्ष ठेवणे.
  • व्यवसायाची उपयुक्तता

  • शेळ्या व मेंढ्यांमध्ये मटणासाठी वार्षिक कत्तलीचे प्रमाण ३८ ते ४२ टक्के आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेळ्यांच्या संख्येतील वाढ ही १८.८३ टक्के आहे.
  • शेळी हा उत्तम पुनरुत्पादन क्षमता व बहुउद्देशीय प्राणी अाहे.
  • स्वादिष्ट मटण, कधीही कमी न होणारी लोकप्रियता व खाण्यासाठी कोणताही धार्मिक अडसर नाही.
  • हा व्यवसाय सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी, तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांच्यासाठी नवसंजीवनी ठरू शकतो.
  • शेळ्यांमध्ये कमी प्रतवारी असलेल्या चाऱ्याचे वजन वाढण्यामध्ये रूपांतर करण्याचा गुण हा इतर मोठ्या जनावरांपेक्षा चांगला असतो.
  • शेळ्यांमध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती असून, दुसऱ्या जनावरांपेक्षा उष्ण भागात तग धरून राहतात.
  • हा व्यवसाय योग्य तांत्रिक पद्धतीने, कमीत कमी खर्चात व आपल्याकडे उपलब्ध गोष्टींचा उपयोग करून केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
  • उत्तम मांसाची व औषधी गुण असणाऱ्या दुधाची गरज भागवण्यासाठी शेळीपालन उपयुक्त.
  • निर्यातीमधील वाढत्या संधी.
  • पशुपालन व्यवसायाचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील वाटा

  • एकट्या दूधउत्पन्नाचा वाटा जवळपास १,६२,१३६ करोड रु.आहे.
  • निर्यातीमध्ये ८,६५६ करोड रु. वाटा हा पशु व कुक्कुटपालन व ७,६२१ करोड रु. वाटा मत्स्य व तत्सम क्षेत्राचा आहे.
  • ५.८० टक्के लोकांच्या रोजगाराची गरज पशुपालन व मत्स्य क्षेत्रामधून भागविली जाते.
  • पशुपालन क्षेत्राचा वाटा एकूण जीडीपी उत्पन्नाच्या ४.०७ टक्के व एकूण शेती व शेतीपूरक व्यवसाय उत्पन्नाच्या २६.८४ टक्के एवढा आहे.
  • मटन व उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्न २००७-०८ मध्ये ४०,३९९ रु. आहे.
  • संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, 9970832105

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com