द्राक्ष सल्ला
डॉ. एस. डी. सावंत
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस कमी-जास्त प्रमाणामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये कमी-जास्त प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. पाऊस कमी-जास्त प्रमाणामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.

 • सांगली विभागामध्ये शुक्रवारपासून पाच सहा दिवस चांगला पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. कवठेमहांकाळ, पळशी, खानापूर, विटा, तासगाव या सर्व भागामध्ये हा पाऊस आठवडाभर चालेल.
 • सोलापूर विभागामध्ये सोलापूर, नानज, काटी, कारी, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर या सर्व भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
 • पुणे विभागामध्ये जुन्नर, नारायणगाव व जवळपासचा भाग शनिवारपासून तीन चार दिवस पावसाची शक्यता आहे. यवत, उरुळी कांचन, पारगाव, पाटस, बारामती या भागामध्ये गुरुवारपासूनच पुढील आठवडाभर हलक्या ते चांगल्या पावसाची शक्यता आहे.
 • नाशिक विभागामध्ये शनिवार, रविवारनंतर पावसाची शक्यता आहे. पिंपळगाव बसवंत, ओझर, वणी, निफाड या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दोन तीन दिवसानंतर वाढू शकेल.

उपाययोजना ः

 • पावसाची शक्यता पाहिल्यानंतर ज्यांच्या छाटण्या झालेल्या नसतील, त्यांनी बागेतील छाटण्या सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यास हरकत नाही. येत्या आठवड्यामध्ये असलेला पाऊस सर्व साधारणपणे सप्टेंबरच्या पहिला पंधरवडा संपेपर्यंत चालू राहील. त्यानंतरचा पाऊस अधूनमधून व हलका राहण्याची शक्यता आहे. म्हणून सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये छाटणी केलेल्या बागेमध्ये नवीन फुटी व पोंगा स्थिती येण्यास ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपेल. त्यानंतर पाऊस संपूर्णपणे थांबण्याची शक्यता असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव व फुलोऱ्यातील गळ ही समस्या राहणार नाही.
 • सांगली विभागातील पलुस, येळावी आणि वाळवा हे भाग व नाशिकच्या दिंडोरी, वणी भागामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. इथून पुढे येणाऱ्या पावसामध्ये तांबेरा वाढण्याची शक्यता आहे. तांबेरा नियंत्रणासाठी पावसाच्या दिवसामध्ये बोर्डो मिश्रण अर्धा टक्के सर्वात चांगले काम करेल. ज्या बागांमध्ये वाढत्या फुटी आहेत, किंवा कोवळी पाने आहेत अशा बागांमध्ये तांबेरा नियंत्रणासाठी ट्रायअझोल वर्गातील बुरशीनाशके चांगले काम करू शकतील.
  (फवारणी प्रति लिटर पाणी)
  टेब्युकोनॅझोल अर्धा मि.लि. किंवा
  ट्रायफ्लॉक्सिस्ट्रॉबीन अधिक टेब्युकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) अर्धा मि.लि.
 • पावसाळी वातावरणामध्ये जैविक नियंत्रण वापरल्यास त्याचे सर्वात जास्त चांगले परिणाम मिळू शकतील. सध्याच्या पावसात न छाटलेल्या बागामध्ये डाऊनी व पावडरी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रति लिटर किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणीसाठी वापरल्यास चांगले परिणाम मिळतील.
 • छाटणीपूर्व काळामध्ये ट्रायकोडर्मा व बॅसिलस सबटिलीस ठिबकद्वारे प्रति एकर एक लिटर प्रमाणात सोडल्यास छाटणीनंतर फुटणाऱ्या फुटी रोगास चांगला प्रतिकार करू शकतील. हे छाटणीपूर्व काळामध्ये उपयुक्त ठरेल.

संपर्क ः डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

 

इतर कृषी सल्ला
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
आंतरपीक म्हणून फ्लॉवर ठरते फायद्याचेशेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
ठिबक, खत नियोजनाने होते गहू उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
जमिनीतील क्षारांचे व्यवस्थापनमीठ (क्षार) यांच्या वापरामुळे होणारे दीर्घकालीन...
जिरायती भागात वेळेवर करा पेरणी जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, काही भागात...हिंदी महासागराच्या ५ अक्षांश उत्तर विषुववृत्तीय...
शेतीमध्ये मीठ-क्षारांच्या वापराचे...मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने...
योग्य वेळेत करा रब्बी पिकांची पेरणी रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य...
पावसाच्या स्थितीनुसार करा द्राक्ष छाटणीसर्व द्राक्ष विभागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पाऊस...
केळी पीक सल्ला सद्यःस्थितीत जून-जुलै महिन्यांतील केळीची मृगबाग...
भेंडी पीक सल्लासद्यस्थितीत भेंडी या पिकावर तुडतुडे, पांढरी माशी...
अॅझोला ः एक उत्तम पशुखाद्यजनावरांच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी घरच्या...
कृषी सल्ला : खरीप कपाशी, रब्बी ज्वारी,...हवामानाचा संक्षिप्त अंदाज ः पुढील पाच दिवस...
कपाशीवरील फूलकीड, कोळी किडीचे नियंत्रणफूलकिडे ः आर्थिक नुकसान संकेत पातळी ः ...
आठवडाभर चांगल्या पावसाचा अंदाजमहाराष्ट्रातील हवेचा दाब कमी होत असून, आठवडाभर...
निसवणीनंतर भातावरील रोगांचे व्यवस्थापनसद्यस्थितीत बहुतांश ठिकाणी भात पीक निसवणीच्या...
मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीरजमिनीत चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा...
भातावरील करपा रोगाचे नियंत्रणकरपा ः रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae...