agricultural stories in marathi, grape advice, Dr. sawant | Agrowon

पावसाची शक्यता; डाउनी नियंत्रणाकडे लक्ष द्या
डॉ. एस. डी. सावंत
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सध्या कोणत्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र, नाशिक भागामध्ये शुक्रवार (ता. ६) संध्याकाळपासून पाच सहा दिवस सर्व भागामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पांढुर्ली, देवळाली व जवळपासच्या भागामध्ये एक दोन चांगले पाऊस होण्याची शक्यता आहे; तर ओझर, पिंपळगाव बसवंत, पानखेड, धोंड गव्हाणवाडी, देवाची वाडी, निफाड, खडकमाळेगाव, उगाव या भागामध्ये दोन ते तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे,

सध्या कोणत्याही द्राक्ष विभागामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र, नाशिक भागामध्ये शुक्रवार (ता. ६) संध्याकाळपासून पाच सहा दिवस सर्व भागामध्ये पावसाळी वातावरण होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या पांढुर्ली, देवळाली व जवळपासच्या भागामध्ये एक दोन चांगले पाऊस होण्याची शक्यता आहे; तर ओझर, पिंपळगाव बसवंत, पानखेड, धोंड गव्हाणवाडी, देवाची वाडी, निफाड, खडकमाळेगाव, उगाव या भागामध्ये दोन ते तीन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे,

  • पुणे विभागामध्ये नारायणगाव जुन्नर कळंब, पुणे शहर, लोणी, उरळी कांचन, राहू, यवत, पाटस, पारगाव, बारामती, लोटी, बोरी या भागामध्ये शुक्रवारपासून बुधवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • सांगली भागामध्ये रविवारनंतर पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता आहे. यामध्ये खानापूर, विटा, तासगाव, पळशी, पलुस व जवळपासच्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकेल.
  • सोलापूर विभागामध्ये नानज, बार्शी, काटी कारी, पांगरी, वैराग, उस्मानाबाद, लातूर, तुळजापूर या भागामध्ये रविवार व त्यानंतर पाच सहा दिवस पाऊस होईल.

उपाययोजना

  • या पावसाच्या परिस्थितीमध्ये छाटणी झालेल्या बागांमध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्या बागा पाच ते सहा पानांच्या पुढे आहेत, तिथे डाउनी मिल्ड्यू नियंत्रणासाठी विशेष काळजी घ्यावी. ज्या बागांमध्ये सध्या डाउनीचा प्रादु्र्भाव आहे, अशा ठिकाणी गुरुवार- शुक्रवारी पाऊस सुरू होण्याआधी खुल्या वातावरणामध्ये डायमिथोमॉर्फ १ ग्रॅम प्रतिलिटर किंवा इप्रोव्हॅलीकार्ब अधिक प्रोपीनेब (रेडी मिक्स) ३ ते ३.२५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. पाऊस सुरू होण्याआधी खुल्या वातावरणामध्ये फवारणी झालेली असल्यास बुरशीनाशक चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होऊन घडापर्यंत पोचू शकते. पावसाच्या दिवसामध्ये घड रोगापासून संरक्षित राहतो. ऐन पावसामध्ये बुरशीनाशके फवारल्यास अपेक्षित रोगनियंत्रण मिळत नाही. आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी निरभ्र वातावऱणामध्ये झालेली असल्यास ऐन पावसाच्या दिवसामध्ये किंवा सकाळच्या वेळी पडणाऱ्या दवामध्ये फक्त बाह्यस्पर्शी बुरशीनाशकांचा (मॅन्कोझेब किंवा प्रोपीनेब प्रत्येकी २ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणत) फवारणी करावी.
  • पावसाच्या दिवसामध्ये बुरशीनाशकांच्या नियंत्रणाला जोर देण्यासाठी बॅसिलस सबटिलिस फवारल्यास रोगाचा प्रसार वेगाने होणार नाही. वर दिलेली आंतरप्रवाही बुरशीनाशके शक्यतो छाटणीनंतरच्या ३५ दिवसांनंतर फवारू नयेत; अन्यथा त्याचे रेसिड्यू एमआरएलपेक्षा कमी असले तरी डिटेक्ट होण्याची शक्यता असते. या बुरशीनाशकाऐवजी छाटणीनंतर ३५ दिवसांनंतर फळधारणेपर्यंत फोसेटिल एएल किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड ही स्वतंत्रपणे २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणात किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर यासोबत मिसळून वापरावीत. पावसामुळे निर्माण झालेल्या आर्द्रतेमध्ये पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड आंतरप्रवाही होऊ शकते. पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड जास्त प्रमाणात पानांमध्ये गेल्यास डाऊनी मिल्ड्यूच्या बुरशीचे चांगल्या नियंत्रणासोबतच झाडांची आंतरीक प्रतिकारशक्ती वाढवण्यात उपयुक्त ठरते.
  • ज्या बागामध्ये छाटणी झालेली नाही, तिथे छाटणी पूर्व काळामध्ये ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिलिटर फवारणीद्वारे व एक लिटर प्रतिएकर या प्रमाणात ड्रीपमधून द्यावे. त्यामुळे छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होईल.

 संपर्क : डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१,  
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

इतर कृषी सल्ला
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...
भाजीपाल्यास द्या गरजेइतकेच पाणीभाजीपाला पिकास योग्य प्रमाणात पाणी मिळण्यासाठी...
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
कृषी सल्ला : रब्बी भुईमूग, मोहरी, आंबा...भुईमूग ः  रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
फळपीक सल्ला : मोसंबी, पेरु, केळीमोसंबी : नवीन लागवड केलेल्या फळझाडांना...
गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण...गहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा...
जाणून घ्या जमिनीचे जलधारणाविषयक गुणधर्मशेतीमध्ये पाण्याची उपलब्धता आणि योग्य वापर अत्यंत...
डाळिंब सल्लाहस्त बहर बागांचे व्यवस्थापन : छाटलेल्या,...
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी निवडा योग्य...उन्हाळी हंगामासाठी योग्य शिफारशीत भुईमूग जातींची...
क्रॅकिंग टाळण्यासह भुरी नियंत्रणाकडे...सध्या सर्वच द्राक्ष विभागांमध्ये थंडीची लाट आलेली...
कमी तापमानातील द्राक्षबागांचे नियोजनसध्या द्राक्षबागेत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था...
उसावरील तांबेरा,तपकिरी ठिपके रोगांचे...गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा प्रभाव...