agricultural stories in Marathi, Human wastewater valuable to global agriculture, economics | Agrowon

शहरी सांडपाण्यातून मिळवता येतील खते
वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मानवी टाकाऊ घटकांचा समावेश असलेल्या सांडपाण्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश अशा पोषक घटकांचा पुनर्वापर खते म्हणून कृषी उत्पादकता वाढीसाठी करणे शक्य असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

मानवी टाकाऊ घटकांचा समावेश असलेल्या सांडपाण्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश अशा पोषक घटकांचा पुनर्वापर खते म्हणून कृषी उत्पादकता वाढीसाठी करणे शक्य असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाण्याच्या प्रमाणामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत खराब होत असून, प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी मानवी विष्ठेचा समावेश असलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी नवे प्रारूप विकसित केले आहे. या पाण्यातील नायट्रोजन, पोटॅशिअम आणि फॉस्फरस वेगळे करून त्याचा वापर कृषी क्षेत्रामध्ये पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी करता येईल.

स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रा. जेरेमी गेस्ट यांनी सांगितले, की पिकाच्या वाढीसाठी आपण खतांचा वापर करतो. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश अशा मूलद्रव्यांचा समावेश असतो. ही सारी मूलद्रव्ये मानवी विष्ठेसह सांडपाण्यामध्ये असतात. सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामध्ये वेगळी करणे शक्य आहे. या एकरेषीय स्रोत प्रवासाचे अभियांत्रिकीद्वारे पोषक घटकांच्या चक्रामध्ये रूपांतर शक्य असून, त्यातून अनेक संधी तयार होतील. त्याचा पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि कृषीक्षेत्राला फायदा होईल.

  • संशोधकांच्या गटाने सहा खंडातील ५६ मोठ्या शहरांचा अभ्यास केला. तेथील सांडपाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात विचार केला. त्यात वाहतुकीचे अंतर, लोकसंख्या, पिकाची घनता, पिकाची पोषक घटकांची गरज यांचा समावेश होता.
  • सांडपाण्याचा सरळ शेतीसाठी वापर करण्यामध्ये आरोग्याच्या सुरक्षिततेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पाण्यावर योग्य प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. ज्या शहरांच्या शेजारी शेती आहे, अशा ठिकाणी प्रक्रिया केलेल्या पाण्यांचा वापर शक्य आहे. अशी ठिकाणी आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची वाहतूक करण्याची गरज आहे, तिथे ते थोडेसे आव्हानात्मक ठरते. कारण, पाण्याच्या एकूण प्रमाणाच्या तुलनेमध्ये त्यात पोषक घटकांचे प्रमाण कमी असते.
  • काही शहरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीव्र उत्पादनांची निर्मिती करावी लागते. त्यामुळे दीर्घ अंतरापर्यंत वाहतूक करणे परवडू शकेल. ही उत्पादने सध्याच्या स्फटिकरूपी खतांप्रमाणेच असतील.
  • सध्या अनेक विकसनशील देशांना खते आयात करावी लागतात. त्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग व्यापला जातो. या नव्या प्रकल्पांमुळे हा खर्च वाचून आर्थिक स्वयंपूर्णतेला चालना मिळू शकते.
  • ट्रीमर म्हणाले, की इजिप्त येथील कैरो शहराचे उदाहरण घेता येईल. येथील सांडपाण्यातील नत्र वेगळा करून वापरणे शक्य झाल्यास सध्या आयात केल्या जाणाऱ्या खतांमध्ये अर्ध्याने बचत होऊ शकते. हीच बाब सब सहारण आफ्रिकेतही शक्य आहे.
  • मात्र, अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि बोस्टनसारखी शहरे शेतीक्षेत्रापासून खूप दूर आहेत. त्याऐवजी मध्यपश्चिमेतील शिकागो शहरामध्ये हे प्रारूप चांगल्या प्रकारे कार्यरत होईल, असे वाटते.
  • गेस्ट यांनी सांगितले, की जागतिक पातळीवर अनेक देशांतील शहरांचे या संशोधनामध्ये विश्लेषण केले असले तरी प्रत्येक शहराचा पुन्हा वेगळेपणाने अभ्यास करावा लागेल. त्यातील सांडपाण्याचे प्रकल्प, त्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण याचे विश्लेषण करून रणनिती ठरवावी लागेल.

इतर ताज्या घडामोडी
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...