agricultural stories in Marathi, Importance of sorghum in human health | Agrowon

आहारात असावी आरोग्यदायी ज्वारी
जी. बी. देसाई
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत.

ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत.

ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग भाकरीसाठीच होतो. काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थांसाठी केला जातो. ज्वारीची भाकरी गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक पांढऱ्या रंगाची असते.

ज्वारीचे फायदे  

  • ज्वारीची भाकरी ही पचण्यास सोपी आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही.
  • ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ॲसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खावी, त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांच्या आहारात ज्वारीची भाकरी असली पाहिजे.  
  • ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज घटकांमुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो.
  • ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
  • सध्या  रक्तदाब आणि  हृदयासंबंधित आजारांच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत.
  • ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आहारात चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी खावी.
  • सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
  • ज्वारी शरीरातील  इन्शूलिनची पातळी प्रमाणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी अत्यंत गुणकारी ठरते.

ज्वारीतील घटक  
आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यांत ओलावा (आर्द्रता) आठ ते दहा टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतुमय घटक १.२ ते १.६ टक्के, खनिजद्रव्ये १.० ते १.६ टक्के, उष्मांक ३४९ किलो कॅलरीज, कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम, किरोटीन (प्रो-व्हिटॅमिन ए) ४७, थायमिन ३७ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅममध्ये आढळतात. ज्वारीमध्ये लायसीन व मिथिलोअमाईन ही आवश्‍यक अमिनो ॲसिड्‌स मर्यादित प्रमाणात आढळतात. पांढऱ्या ज्वारीमध्ये टॅनिन नावाचा ऍण्टी न्यूट्रिशनल (अपायकारी) घटक आढळत नाही, तो लालसर ज्वारीत भरपूर प्रमाणात असतो.

 - जी. बी. देसाई ,  : ९८८१८४२५२५
(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

इतर कृषी प्रक्रिया
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य...विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना...
अंकुरित धान्यांपासून बेकरी उत्पादनेअंकुरलेल्या धान्यामध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात....
अन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...
प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...
कांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थअंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक...
डाळिंबापासून अनारदाना, अनाररबडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
मोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...
कच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...
मार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...