agricultural stories in Marathi, information about hydroponix fodder technology | Agrowon

हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणा
रणजित शानबाग
सोमवार, 13 मे 2019

दुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे गरजेचे आहे. यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन फायद्याचे ठरते. गेल्या दोन वर्षांपासून कमी खर्चाच्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाबाबत विज्ञान आश्रमामध्ये प्रयोग करण्यात येत आहेत. या प्रयोगाचे चांगले निष्कर्ष हाती आले आहेत.

दुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे गरजेचे आहे. यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन फायद्याचे ठरते. गेल्या दोन वर्षांपासून कमी खर्चाच्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाबाबत विज्ञान आश्रमामध्ये प्रयोग करण्यात येत आहेत. या प्रयोगाचे चांगले निष्कर्ष हाती आले आहेत.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मातीचा उपयोग न करता फक्त पाण्याच्या सहाय्याने उभ्या मांडणीत ट्रेमध्ये चारा उत्पादन घेतले जाते. या पद्धतीमध्ये कमी पाणी, कमी जागा आणि कमी खर्चात हिरवा चारा उत्पादन करता येते. यामध्ये गहू, मका, बार्ली या चाऱ्याचे उत्पादन घेता येते. या पद्धतीत एक किलो बियाण्यापासून ६ ते ७ किलो चारा ८ ते १० दिवसात तयार होतो.

हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन

  • हायड्रोपोनिक्स चाऱ्यासाठी मुख्य करून बियाण्यांची उगवण आणि वाढ योग्य होण्यासाठी तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे योग्य प्रमाण गरजेचे असते, यासाठी फारश्या महागड्या यंत्र सामग्रीची गरज नाही.
  • बियाण्यांनी भरलेल्या प्लॅस्टिकच्या ट्रे साठीची मांडणी ही बांबू किंवा युपीव्हीसी पाइपचा उपयोग करून बनवता येते. हायड्रोपोनिक्स चाऱ्यासाठी  खास ट्रे घेण्याचीही गरज नाही. बाजारात उपलब्ध प्लॅस्टिकचे साधे ट्रे घ्यावेत. ट्रे मधील जादा झालेले पाणी गळून जाण्यासाठी योग्य प्रमाणात छिद्रे  करावीत.
  • पाण्याच्या फवाऱ्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा ठिबक सिंचन संच विक्रेतांकडे उपलब्ध असते. शेतकरी सहजरित्या त्याची जोडणी करू शकतात. पाण्याचा पंप स्वयंचलित असल्याने फायदा होतो. हा पंप बाजारात सहजरीत्या उपलब्ध होते.
  • युपीव्हीसी पाइपचा उपयोग मांडणीसाठी केला तर पंचवीस हजारापर्यंत खर्च येतो. या मांडणीमध्ये  प्रती दिन २० किलो चारा उत्पादन करता येते. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील  जनावरांची संख्या लक्षात घेऊन गरजेनुसार हायड्रोपोनिक्स संच आधी तयार करावा. त्यानंतर मोठ्या संचाचा विचार करावा.
  • तापमान आणि आर्द्रता नियंत्रण ः हायड्रोपोनिक्स चाऱ्यासाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि  ५० ते ७० टक्के आर्द्रता असणे खूप महत्त्वाचे असते. हिवाळ्यामध्ये तापमान  कमी असल्याने नियोजित वेळेत चाऱ्याची योग्य वाढ होत नाही. कडक उन्हाळ्यात तापमान खूप  वाढून त्रास होतो. हिरव्या रंगाची ५० टक्के शेडनेट वापरता येते. पण, हिवाळ्यामध्ये  तापमान कमी होण्याच्या समस्येवर ही शेडनेट उपयोगी पडत नाही. उन्हाळ्यात शेडनेटमध्ये आर्द्रता कमी पडते. हे लक्षात घेऊन पॉलीहाउस शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या प्लॅस्टिकचा उपयोग करता येतो. पण तापमान वाढल्यास ते कमी करण्यासाठी स्वयंचलित (सेंन्सर) तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करणारी यंत्रणा बसवावी लागेल. ही यंत्रणा विज्ञान आश्रमात विकसित करण्याच्या प्रयत्न केला आहे.
  • हायड्रोपोनिक्स चारा तयार करतानाची एक प्रमुख अडचण म्हणजे बी उगवण आणि वाढीच्या अवस्थेतील बुरशीचा प्रादुर्भाव. हायड्रोपोनिक्स चाऱ्यामध्ये मुख्य करून ॲस्परजीलस बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन रोग विरहित बियाण्यांची निवड करावी. जुन्या उगवण क्षमता कमी झालेल्या किंवा कीड लागलेल्या बियाण्यांना बुरशीचा प्रादुर्भाव प्रथम होतो आणि ही बुरशी नंतर चांगल्या बियांवर पसरते हे लक्षात घेऊन अशा बियाण्यांचा वापर टाळावा.
  • निवडलेल्या बियाणे २० टक्के मिठाच्या पाण्यात टाकून वरती तरंगणारे बियाणे बाजूला करावे. पाण्यात बुडलेले बियाणे चारानिर्मितीसाठी वापरावे. त्यानंतर हे बियाणे १ टक्के पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणामध्ये १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर चारानिर्मितीसाठी ट्रे मध्ये पसरावे. हे ट्रे मांडणीमध्ये ठेवावेत.
  • प्रत्येक चारा काढणीनंतर ट्रे स्वच्छ पाण्याने धुऊन उन्हामध्ये वाळवून परत वापरावा. हायड्रोपोनिक्सनिर्मितीच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी.

 - रणजित शानबाग, ९५७९७३४७२०
(विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे)

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...
शेतकऱ्यांना मिळाले क्षारपड जमिनी...उत्तर प्रदेश राज्यात हरदोई जिल्ह्यातील संताराहा...
विहीर, कूपनलिका पुनर्भरण करा, भूजल साठा...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
कृत्रिम प्रकाशासाठी सोडियम दिव्यांच्या...परदेशाप्रमाणेच आपल्याकडे शेवंतीसह विविध पिकांच्या...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरलेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे,...
महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे रोटरी टोकण यंत्र हे उभ्याने ढकला पद्धतीने...
ट्रॅक्टरचलित न्युमॅटिक प्लॅंन्टरउच्च गुणवत्तेच्या बियाण्यांचा वापर केल्याने...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...