agricultural stories in Marathi, kadvanchi watershed development work through villagers | Agrowon

कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच यशाचे सूत्र
संतोष मुंढे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर त्यामागे गावकऱ्यांनी जल, मृद संधारणासाठी केलेले श्रमदान, शेतशिवाराची बांधबंदिस्ती, पाण्याचा काटेकोर वापर आणि एकमेकांना केलेली मदत कारणीभूत आहे. शेती विकासाबाबत गावचे माजी सरपंच प्रभाकर क्षीरसागर यांनी मांडलेले मत...

कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर त्यामागे गावकऱ्यांनी जल, मृद संधारणासाठी केलेले श्रमदान, शेतशिवाराची बांधबंदिस्ती, पाण्याचा काटेकोर वापर आणि एकमेकांना केलेली मदत कारणीभूत आहे. शेती विकासाबाबत गावचे माजी सरपंच प्रभाकर क्षीरसागर यांनी मांडलेले मत...

गावात पाणलोटाचे काम होण्यापूर्वी शेतीतून उत्पन्न कमी होतेच, शिवाय प्यायला पाणीही नव्हतं. या दरम्यान खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून १९९५पासून तंत्रज्ञान प्रसाराचे काम सुरू झाले. याच दरम्यान मी गावचा सरपंच (१९९२ ते १९९७) होतो. जेमतेम भुसार पिके, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांची लागवड गाव शिवारात असायची. कृषी विज्ञान केंद्राने कडवंची गावाची पाणलोट कामासाठी निवड केली. गावकऱ्यांनीही प्रतिकूल परिस्थिती बदलासाठी चांगले सहकार्य केले. पीक बदलामध्ये कृषी विज्ञान केंद्राने रेशीम शेतीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला. काही शेतकऱ्यांनी रेशीम शेती सुरू केली. पण पुढे पाण्याचा प्रश्न उभा राहिला. इंडो-जर्मन प्रकल्प राबविताना गावकऱ्यांनी अपेक्षेपेक्षाही जास्त श्रमदान केले. पाणलोट कामात अडीअडचणी आल्या, पण सर्वांच्या संमतीने त्या दूर केल्या. समजा आठ महिने निसर्गातून पाणी मिळाले तरी चार महिने काढायचे कसे? हा प्रश्न होता. पाण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे पाणलोटाचे चांगले काम झाले.

शेतशिवारात पाणी जिरविले. कमी पाण्यावर कोणते पीक येईल याचा अभ्यास झाला. डाळिंब, ऊस, मोसंबी आदी पिकांचा अभ्यास केल्यानंतर काटेकोर पाण्यात चांगला आर्थिक नफा देणाऱ्या द्राक्षाची निवड आम्ही केली.  द्राक्ष शेतीकडे वळलो त्या वेळी माझ्याकडे १९ एकर २० गुंठे शेती होती. द्राक्ष दीड एकरावर होते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने द्राक्ष लागवड वाढवत गेलो. सध्या ३८ एकरापैकी २५ एकरावर द्राक्ष बाग आहे. संरक्षित पाण्यासाठी तीन शेततळी आहेत. संरक्षित पाणी असेल तरच उत्तम शेती शक्य होते. त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांनी हमखास पावसाच्या भरवशावर न राहता जल, मृद संधारण करत पडलेला पाऊस शेतशिवारात जिरवला. उन्हाळ्याच्या काळात संरक्षित पाण्यासाठी शेततळी तयार केली. शेतीमध्ये ठिबक सिंचन, यांत्रिकीकरणावर भर दिला. यामुळे पिकामध्ये शाश्वता आली, विकासाची दिशा दिसली. आता आम्ही द्राक्षाच्या बरोबरीने पेरू, पपई आणि सीताफळाकडे वळलो आहोत.
-  प्रभाकर क्षीरसागर, ९७६५३४५४८५

इतर यशोगाथा
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...
अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदलवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे...नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला...
दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक... कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...