agricultural stories in Marathi, management of Mango and Cashew crop | Agrowon

आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला
डॉ. ए. वाय. मुंज,डॉ. बी. एन. सावंत
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला मोहोर आल्याचे दिसून येत आहे. तसेच काही बागांमध्ये सध्या फळधारणा सुरू झाली असून, फळे मोहरी अवस्थेत आहेत.

सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला मोहोर आल्याचे दिसून येत आहे. तसेच काही बागांमध्ये सध्या फळधारणा सुरू झाली असून, फळे मोहरी अवस्थेत आहेत.
    डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळला नाही. मात्र सध्या थंडी कमी होत असल्यामुळे काही बागांमध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. सध्याचे हवामान तुडतुड्यांच्या वाढीस पोषक आहे. तसेच काही भागात मोहोर खाणाऱ्या अळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दव पडत असल्यामुळे मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. करपा रोगामुळे मोहोर करपल्यासारखा दिसतो.

मोहोरावर अन्नद्रव्यांची फवारणी
फळधारणा झालेल्या कलमांमध्ये फळगळ कमी होऊन फळे पोसण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या आम्रशक्ती सूक्ष्मअन्नद्रव्य घटकाची (घटक ः नत्र, स्फुरद, पालाश, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम) फवारणी करावी. साधारणपणे २५ लिटर पाण्यात १ लिटर आम्रशक्ती सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण मिसळावे. हे द्रावण चार मोहोरलेल्या कलमांसाठी पुरते. केवळ मोहरावरच फवारणी करावी.

नियंत्रण उपाय

 • फवारणी ः  प्रतिलिटर पाणी
 • तुडतुडे नियंत्रण
 •  डेल्टामेथ्रिन (२.८  इसी) ः ०.९ मि.लि.
 • फुलकिडे
 •  स्पीनोसॅड (४५ एससी) ०.२५ मिलि
 • करपा रोग
 •  हेक्झाकोनॅझॉल ( ५ इसी) ः ०.५ मिलि
 • भुरी रोग
 •  गंधक (८० टक्के पाण्यात विरघळणारे ) २ ग्रॅम

काजू

कीड नियंत्रण
फवारणी  ः प्रमाण प्रति लिटर पाणी

टी मॉस्किटो
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.६ मि.लि.

बी आणि बोंडू पोखरणाऱ्या अळी
प्रोफॅनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि.

खोडकिडा

 •  खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडातून भुसा येताना दिसल्यास त्वरित नियंत्रणाचे उपाय करावेत.
 • खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्यास पाने पिवळी पडतात. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो.
 • पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावीत साल काढून अळीस बाहेर काढून मारून टाकावे.
 • क्लोरपायरीफॉस (२० इसी) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून साल काढलेला भाग चांगला भिजवावा.
 • थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळच्या वेळी काजू बागेत पालापाचोळ्याच्या शेकोट्या पेटवून धूर करावा. त्यामुळे बागेतील तापमान १ ते २ अंशांनी वाढ होऊन नुकसान पातळी कमी करता येते.

- डॉ. ए. वाय. मुंज, ९४२१९१६९४७  

- डॉ. बी. एन. सावंत, ९४२२४३६११७
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

फोटो गॅलरी

इतर फळबाग
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...
थंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...
केळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...
आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...
संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...
गारपीटग्रस्त संत्रा, मोसंबी बागांचे...वादळी पाऊस आणि गारपीटच्या माऱ्यामुळे संत्रा /...
डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...
ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी,...सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
हिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...
थंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....
थंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...
भुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...
नियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...
फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...
मोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे...  मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...
निरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...
डाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...