agricultural stories in Marathi, market trande in NCDEX,MCX | Agrowon

मका, हळद, कापसाचा तेजीकडे कल
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत.

देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मॉन्सून सरासरी एवढाच होण्याची शक्यता वर्तवली आहे. रब्बीची आवक आता सुरू होत आहे. पुढील महिन्यात ती वाढणार आहे. त्यामुळे यापुढे कापसाखेरीज इतर वस्तूंची मागणी कमी होणार आहे व पुरवठा वाढणार आहे. त्याचा परिणाम यापुढे किमती नरम राहण्यावर होणार आहे. कापसातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
 या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता इतर सर्व पिकांचे भाव घसरले. (आलेख १पहावा). गव्हाची अजून मोठी आवक सुरू झालेली नाही. कापसाच्या किमतींत अजूनही तेजी आहे. गेल्या सप्ताहात त्यांनी उच्चांक गाठला होता. या सप्ताहात भाव काहीसे उतरले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यात रब्बी आवकेमुळे मक्याचे भाव घसरतील. इतरांचे मात्र वाढतील. (आलेख २ पहावा)

गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार
मका

  • रब्बी मक्याच्या (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. १,५७० ते रु. १,८००).  
  • या सप्ताहात त्या २.६ टक्क्याने घसरून रु. १,८६१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. १,९८१ वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता)
  •  बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमी भावाच्या आसपास राहतील.

साखर
साखरेच्या (मे २०१९) किमती मार्चमध्ये व्यवहार नसल्याने रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१४६ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  

सोयाबीन  
सोयाबीन फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात रु. ३,६९५ व रु. ३,८२६ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या रु. ३,७२८ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८३४ वर आल्या आहेत.  हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). २३ एप्रिल रोजी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,७७५, ३,८०७, ३,८४०, ३,८००, ३,५९० व ३,४९३ भाव होते.  

हळद
हळदीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात घसरत होत्या (रु. ६,४९२ ते रु. ६,०९२). गेल्या सप्ताहात त्या रु. ६,३८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. ६,३७६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,३८६ वर  आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५६६). आवक वाढू लागली आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. पण मागणीसुद्धा वाढत आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२५२ ते रु. ४,४९०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ४,३४८ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३७० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती २.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४६४). खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,१८६ ते रु. ४,४००). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. ४,४१९ वर आल्या आहेत स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३१३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जुलै २०१९ मधील फ्युचर्स किमती ५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५२९). मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मे २०१९) किमती मार्च महिन्यात वाढत होत्या. (रु. २१,२०० ते रु. २१,९६०). गेल्या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी वाढून रु. २२,५२० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी घसरून रु. २२,३३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २२,२५१ वर आल्या आहेत.  जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २२,८६० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. निर्यात मागणी अजून तरी वाढत आहे. आंतर-राष्ट्रीय किमतीसुद्धा वाढत आहेत. वाढीचा कल यापुढे टिकण्याचा संभव आहे.

(टीप ः सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी).        

  - arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...